नागपूर जिल्हा माहिती मराठी

नागपूर म्हटले की आठवते ती नागपूरची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथील जगप्रसिध्द संत्री. सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर पूर्वीच्या मध्य प्रांताची राजधानी होते. विदर्भातील महत्त्वाचे शहर अशी आज नागपूरची ओळख आहे. नाग नदीवरून नागपूर शहराचे नाव पडले. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे. शेती, संशोधन, विज्ञान, पर्यावरण या क्षेत्रांशी संबंधित राष्ट्रीय राज्य स्तरावरील अनेक संस्था नागपूरमध्ये आहेत. याही दृष्टीने नागपूर एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र आहे.
Nagpur%2BMap
महाराष्ट्राच्या उपराजधानीत दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. राज्याचा प्रमुख भाग असलेल्या विदर्भाचा विकास व्हावा, त्या भागातील प्रश्र्न ऐरणीवर यावेत यासाठी नागपूरचे हे अधिवेशन भरवले जाते.
 
इतिहास :
..१८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस मॉडेल मिल होतभारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉँग्रेसची दोन अधिवेशने नागपुरात झाली असहकार आंदोलन नागपूरच्या १९२०च्या अधिवेशनापासून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस बेरार भारतातील एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली नागपूरला या राज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला. १९५६च्या राज्य पुनर्रचना आयोगाने नागपूरसह वर्हाड(बेरार) बॉम्बे(मुंबई) प्रान्त राज्यात घातला. कालांतराने मे .. १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली वर्हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. एके काळी देशाच्या भौगोलिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 
 
पर्यटन
रामटेक
नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक  येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी कथा आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात आले असून प्राचीन साहित्य, शास्त्र यांचा अभ्यास संशोधन करण्यासाठी कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. येथील रामसागर, अंबाला तलाव प्रसिध्द आहे.
 

नागपूर – 

हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असून येथील सीताबर्डीचा किल्ला प्रेक्षणीय आहे. येथील दीक्षाभूमीवर  १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार केला. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. नागपूर हे बौध्द धर्मीयांचे आदराचे स्थान असून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  भव्य स्मारक   बौद्ध स्तूप उभारण्यात आला आहे. अदासा येथील गणपतीचे जागृत पुरातन देवस्थानअंबोला येथील  चैतन्येश्वर मंदिर आणि श्री हरिहर स्वामींची  समाधी, काटोलमधील भवानी मंदिर ही जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. तसेच धापावाडा येथे श्री कोतोबा स्वामींचा मठ असून येथील विठ्ठल मंदिरामुळे हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिध्द आहे.

कामठीमध्ये

भव्य ड्रॅगन प्लॅनेट टेंपल आहे. येथील बुध्द मूर्ती जपानतर्फे भेट मिळाली असून मूर्ती पूर्ण चंदनाची  ८६४ किलो वजनाची आहे. जिल्ह्यातील नागार्जुन टेकडी हा  आयुर्वेदीक औषध वनस्पतींनी संपन्न असलेला परिसर आहे. तसेच जिल्ह्यातील पारशिवनी  येथील शिवगड हा किल्ला प्रसिध्द आहे. मराठीतील लोकप्रिय नाटककार राम गणेश गडकरी यांचे खिंडसी (तालुका सावनेरयेथे १९१९ मध्ये निधन झालेयेथेच त्यांचे स्मारक विकसित करण्यात आले आहे.
 

पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान – (व्याघ्र प्रकल्प, पेंच ,नागपूर.) 

पवनी गावापासून २० कि.मी. अंतरावर हा व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी विशाल धरण बांधण्यात आले आहे. या  २५७. ९८ चौ. कि.मी. क्षेत्राच्या उद्यानास १४ नोव्हेंबर, १९९० मध्ये पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले. उद्यानात  वाघ, बिबळ्या, रानगवे, रानम्हशी, रानडुकरे, अस्वले इत्यादी हिंस्र प्राणी पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यानातील काही वन्यजीव आढळतात. तसेच  बोर येथील  अभयारण्याने जिल्ह्याचा काही भाग व्यापला आहे. जिल्ह्यात  सेमीनरी हिल रामटेक येथेही  वनोद्याने आहेत
 
जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था :
  • दिनांक ४ ऑगस्ट , १९२३ रोजी स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठाचे पुढील काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. सुमारे ४४२ महाविद्यालये संलग्न असणारे हे विद्यापीठ देशातील जुन्या विद्यापीठांपैकी एक होय. महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठानंतर स्थापन झालेले हे दुसरे विद्यापीठ होय. 
  • राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग , राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, इंडियन स्टँडर्डस इन्स्टिट्यूट (आय. एस. आय), रमण विज्ञान केंद्र, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांसारख्या अनेक संस्थांमुळे तसेच राज्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठामुळे नागपूर हा राज्यातीलच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचा जिल्हा बनला आहे
  • केंद्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था  – १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे नाव प्रथम केंद्रीय सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संशोधन संस्था असे नाव होते. मानवी आरोग्य, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन यांविषयी प्रथम संशोधन कार्य चालायचे, पर्यावरणाविषयीच्या जाणीवा जागृत झाल्यामुळे या विषयाचा आवाका वाढत गेल्यामुळे १९७४ मध्ये या संस्थेचे रुपांतर छएएठख   मध्ये करण्यात आले. ही संस्था कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (उडखठया संस्थेची घटक म्हणून कार्य करते. छएएठख  चे मुख्यालय नागपूर येथे असून, देशपातळीवर काम करणार्या या संस्थेची विभागीय कार्यालये चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकता मुंबई येथे आहेत. प्रामुख्याने पर्यावरण शास्त्र अभियांत्रिकी या विषयांचे संशोधन विकासात्मक अभ्यास या संस्थेच्या माध्यमातून केला जातो.
  • रमण विज्ञान केंद्र – नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेले हे केंद्र आहे. वैज्ञानिक तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी ही संस्था कार्य करते. विविध प्रदर्शने, सायन्स पार्क, अँनिमल पार्क, वैज्ञानिक माहिती देणारा लाईट अँड साऊंड शोथ्री डी (त्रिमिती) चित्रपटगृह तारांगण या सर्व घटकांच्या माध्यमातून ही संस्था वैज्ञानिक प्रबोधन करते. या संस्थेचे फिरते विज्ञान प्रदर्शन देखील आहे. याच्या माध्यमातून तसेच प्रश्र्नमंजुषा स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने या माध्यमातून रमण विज्ञान केंद्र प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात कार्य करते.
शून्य मैल दगड :नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड. हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहरात शून्य मैलाचा (झिरो माईल) दगड ब्रिटिशांनी उभारला असून येथूनच देशातील सर्व अंतरे मोजली जातात.  भौगोलिकदृष्ट्या नागपूर शहर देशाच्या मध्यभागात असल्याने हे स्थान निर्माण करण्यात आले आहे.
 
बुटीबोरी औद्योगिक वसाहत :
महाराष्ट्राची  उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. आग्रेय व मध्यपूर्व आशियातील सामान वाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा येथे बनणार आहे. या वसाहतीत आतापर्यत ५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. येथे मिहान आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प साकारला जात आहे.