राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटना प्रमुख असतो. राष्ट्रपती देशाचे नाममात्र शासक प्रमुख असतात. राष्ट्रपती पदासाठी किमान वय 35 वर्ष असावे लागते. राष्ट्रपती चा कार्यकाल हा 5 वर्षाचा असत.

भारताच्या राष्ट्रपती बद्दल माहिती

Constituitions

राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती कडे देत असतो. राष्ट्रपती पदासाठी च्या उमेदवारासाठी 15000 अनामत रक्कम भरावी लागते. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नामांकन पत्रावर निर्वाचक गणातील किमान 50 जणांच्या सह्या सूचक म्हणून व दुसऱ्या 50 जणांच्या सह्या अनुमोदक म्हणून आवश्यक असतात. राष्ट्रपती च्या निर्वाचक गणात लोकसभा, राज्यसभा व सर्व विधानसभांचे निर्वाचित सदस्य यांचा समावेश होतो.

राष्ट्रपती च्या निर्वाचक गणात दिल्ली व पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्यसभा लोकसभा विधानसभा यामधील नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत. विधान परिषदेतील सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत.

राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास त्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालय करते. राष्ट्रपतीला पदाची शपथ सर न्यायाधीश देता राष्ट्रपतीला दरमहा पाच लाख रुपये वेतन मिळते

राष्ट्रपती भवन व शासकीय निवासस्थाने :

  • राष्ट्रपती भवन – दिल्ली (शिल्पकार एडविन ल्युटेंन्स)
  • राजभवन – शिमला
  • निलायम – हैदराबाद

राष्ट्रपती चे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो. राष्ट्रपतीला घटना अभंग आरोपाखाली महाभियोग पद्धतीद्वारे पदावरून काढता येते. देशाचे अंदाजपत्रक अर्थमंत्री राष्ट्रपतीच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या वतीने सादर करतो. कलम 74 (1) नुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक राहील. (42 वी घटनादुरुस्ती 1976) मध्ये झाली राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर्वोच्च प्रमुख असतो.

राष्ट्रपती द्वारे होणाऱ्या नेमणुका :

  • पंतप्रधान
  • केंद्रीय मंत्री
  • महान्यायवादी
  • महालेखापाल
  • संरक्षण दलाचे प्रमुख
  • सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश
  • लोकसभेत दोन ऍग्रो इंडियन सदस्य
  • राज्यसभेत 12 सदस्य
  • केंद्र लोकसेवा आयोग

तसेच निवडणूक आयोग, वित्त आयोग, भाषा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग इत्यादींचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नेमणुका राष्ट्रपती करत असतात.