राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पास होण्यासाठी काय करावे? – जनार्दन कासार (उपजिल्हाधिकारी)

मित्रांकडून सध्या एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय तो म्हणजे “योग्य attempt किती असावा?” येथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही संख्या निश्चित अशी सांगता येणे शक्य नाही तर ती अनेक बाबींवर  अवलंबून असते.

janardhan%2Bkasar%2Bdeputu%2Bcollector

प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी :
ही दरवर्षी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे जर काठीण्यपातळी कमी असेल तर attempt जास्त असावा आणि काठीण्यपातळी जास्त असेल तर attempt माफक असावा.

विषय :
विषयानुसार attempt ची संख्या बदलते. साधारणपणे GS2, GS3 (काठीण्यपातळीनुसार), इकॉनॉमिक्स आणि भूगोल या विषयावर गेल्या काही वर्षात विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेतल्यास लक्षात येईल की या विषयांमध्ये attempt जास्त असणे फायदेशीर ठरते, तर हिस्टरी, विज्ञान व तंत्रज्ञान यावर विचारले जाणारे प्रश्न बऱ्यापैकी अवघड असल्याने यामध्ये लिमिटेड attempt ठेवणे योग्य असते नाहीतर यात जास्त निगेटिव्ह मार्किंग होण्याची शक्यता असते.

तुमची अभ्यासाची पातळी :
attempt किती असावा हे निश्चित करणारी ही सर्वात महत्वाची बाब आहे. कारण आपण देत असणारी परीक्षा ही बहुपर्यायी परीक्षा आहे आणि यात आपल्याला उत्तराच्या स्वरूपात अनेक पर्याय दिलेले असतात. यात आपल्याला सर्वच पर्याय योग्य किंवा अयोग्य हे जरी ओळखता आले नाही तरी जर आपला अभ्यास चांगला असेल तर त्यातील काही पर्याय हे चूक की बरोबर हे आपण ओळखू शकतो आणि त्याआधारे लॉजिक लावून योग्य उत्तरापर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी जास्त attempt करायला हरकत नाही.

तुमचं लॉजिक  स्किल :
जास्त attempt करायचा असेल तर तुमचं लॉजिक स्किल चांगलं असणं आवश्यक आहे. येथे सर्वात महत्वाची एक बाब लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे परफेक्ट माहिती नसतात. अनेक प्रश्न हे आपल्याला लॉजिक लावून सोडवावे लागतात. लॉजिक लावून सोडवणे म्हणजे किमान एखादा पर्याय माहित असेल तर त्यावरून योग्य उत्तरापर्यंत येणे.

पण तरीही ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, ज्यांनी यापूर्वी मुख्य परीक्षा देऊनही पोस्ट मिळाली नाही किंवा ज्यांचा यापूर्वी स्कोर कमी आल्याने क्लास 2 पोस्ट मिळाली किंवा मनासारखी पोस्ट मिळाली नाही त्यांनी मागील दोन तीन वर्षांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की चांगली रँक येण्यासाठी आपला attempt जास्त असणे आवश्यक आहे.

उदा. 2018 च्या राज्यसेवा परीक्षेत GS 2 मध्ये 120 गुण मिळवणारा टॉपर आहे तसेच टॉप आलेल्या अनेक जणांना 100+ गुण आहे. आता एवढे गुण हवे असतील तर attempt सुद्धा तितकाच जास्त असावा लागतो.

2018 च्या मुख्य परीक्षेत माझा attempt मराठी/इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह साठी 95+, GS1 आणि; GS4 साठी 135+ तर GS2 व GS3 साठी 145 च्या आसपास होता…

आता यापैकी सर्वच उत्तरे काही मला परफेक्ट माहिती होती असे नाही, तर यापैकी अनेक उत्तरे मी मुद्दा क्रमांक 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे लॉजिक लावून काढली आणि मला असं वाटतं स्कोरिंग करणाऱ्या प्रत्येकाला असं करावंच लागतं कारण सर्वच उत्तरे परफेक्ट माहिती असणं शक्य नाही.

सर्वात महत्वाचे कुठला प्रश्न attempt करावा :
प्रत्येक प्रश्नाला उत्तरामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी किमान दोन पर्याय आपल्याला माहित असतील तर साधारणपणे तो प्रश्न सोडवला तर उत्तर बरोबर येण्याची शक्यता 50% असते त्यामुळे असा प्रश्न सोडवायलाच हवा.

जर दिलेल्या 4 पैकी केवळ एकच पर्याय योग्य की अयोग्य हे माहित असेल आणि इतर 3 पर्याय योग्य की अयोग्य हे माहित नसेल तर असा प्रश्न सोडवावा का? मी स्वतः असेही प्रश्न attempt केले आहेत कारण असा प्रश्न बरोबर येण्याची probability  1/3 असते. म्हणजे जर आपण अशा प्रकारचे 9 प्रश्न सोडवले तर त्यापैकी 3 प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते. आणि इतर 6 प्रश्न जरी चुकले तरी त्याचे 1/3 नेगेटिव्ह मार्किंग प्रमाणे 2 गुण वजा झाले तरी 1 गुण आपल्या हाती पडतो. ही झाली गणितीय मांडणी पण मला असं वाटतं की जरी इतर 3 पर्याय योग्य की अयोग्य याबाबत आपल्याला सुचत नसेल तरी जेव्हा आपण तो प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्या पूर्वज्ञानाचा वापर करून काही ना काही तरी लॉजिक त्या पर्यायावर लावतोच आणि त्यामुळे 9 पैकी फक्त्त तीनच नाही तर 4 5 प्रश्न सुद्धा बरोबर येवू शकतात आणि मला हा अनुभव आलेला आहे. आपला attempt वाढवन्यासाठी हे लॉजिक तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.