MPSC स्पर्धा परिक्षेचा पेपर सोडवताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात?

आपण वर्षभर अभ्यास करतो, ह्या अभ्यासचे मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी होते. बरेचदा खूप अभ्यास असून पण मार्कस येत नाहीत. कारण कळत नकळत खूप चुका होतात. याची किंमत म्हणजे पुढील वर्षाच्या जाहिरातीची वाट पाहावी लागते  किवा मनासारखी पोस्ट न मिळणे mpsc मुख्य परीक्षा ३ दिवस असते. ह्या काळात आपण खूप शांत, composed  राहिले पाहिजे.

◆ साधारणतः होणाऱ्या चुका :

  • वेळेचे नियोजन – विशेषकरून language objective  , written paper . दोन्ही मिळून १०-१५ मार्कांचा फटका बसू शकतो.
  • अर्धे वाक्य वाचून लगेच गोल करणे.
  • सत्य नाहीत,असत्य नाही असे वाचण्यात चुकणे
  • बऱ्याचदा प्रश्न मधील वाक्यात a) b) c) d), ni पर्याय १,२,३,४ पण a,b,c,d वरूनच गोल करने.
  • एखादा प्रश्न अवघड आला तर आत्मविश्वास कमी करून घेणे. मग पुढील  सोपे प्रश्न  पण चुकणे.
  • परिक्षेच्या अगोदर 3 दिवसांचे नियोजन नसणे.
  • २ पेपर मधील time मध्ये पेपर कसा गेला हे discuss करत बसणे,काही प्रश्नांची बरोबर चूक उत्तरे याबाबत वादविवाद करणे. तसेच चहा, कॉफी वर गप्पा मारत बसणे.
  • पेपर मधील तीन दिवस पुरेशी झोप न घेणे.परीक्षेच्या काळात जागरण करणे.

आता वरील ज्या चुका झाल्या त्यासोडून पण आपण इतर चुका करत असतो. ह्या चुकांचे मूल्यमापन स्वतः पेक्षा कोणीही चांगले करू शकत नाही.

◆  लँग्वेज चे वेळेचं नियोजन कसे कराल ?

  •  ५-६ objective कोऱ्या कागदावर सोडवून पाहणे.
  • त्यात trial and error करणे. म्हणजे passage सुरुवातील का शेवटी
  • माझा क्रम मराठी पूर्ण, इंग्लिश passage,mag व्याकरण. ( passage सोपा असतो ,जर time ch नाही मिळाला तर सोप्या प्रश्नांचे मार्कस जातात).
  • त्यात वेळ divide करणे,मराठी २०-२५ मिनिट व इंग्लिश ३५ minutes . माझे असे MGMT होते.तुमचे वेगळे राहू शकते. काही essay Che framework करुन गेलात .तर तिथे time वाचतो.

वाक्य पूर्ण वाचल्यावर च circle fill करणे. आपल्याकडे वेळ असतो.ओळखीचा शब्द पाहून लगेच cirlcle fill करण्याची घाई नका करू.

गडबड कमी करा. test solve करून अश्या चुका कमी करता येतात. त्या वेळी पूर्ण concentration  paper मध्ये असू द्या.
practice ne आपण consciously read करण्याची सवय लावून घेतो

acts  मधील लास्ट year ३ questions sub sections var होते. खूप अवघड प्रश्न आपण सोडून देऊ शकतो कारण १५० solve करणे गरजेचे नाही. आपण चांगला आणि योग्य दिशेने अभ्यास  करून जर पेपर अवघड वाटत असल्यास इतरांना पण पेपर अवघड असणार आहे. त्यामुळे स्वतः वर विश्वास ठेवून कॉन्फिडन्स ने इतर questions la सामोरे जा.तुम्ही असे questions skip करु शकता.

किंवा पेपर solve करतांना काही बदल करा. history avgahd जातेय तर पेपर १ geography ne सुरू करा(६० नंतरचे प्रश्न). मग confidence वाढला की history Che selective solve Karu शकता( difficulty nusar)

◆ तीन दिवसाचे नियोजन कसे कराल?
म्हणजे कोणते बुक्स वापरनार आहात, की नोट्स असतील तर त्याच स्कॅन करणार आहात का. पेपर वरून आल्यानंतर किती वेळ वाचणार आहात. त्याचबरोबर  दोन पेपर मधल्या वेळेमध्ये त्या पेपर चां कोणता भाग पूर्ण करणार आहात. यावर लक्ष देणे फार महत्वाचे ठरते.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार नियोजन करू शकता?
स्वतः ला परीक्षा मध्ये sincere ठेवणे गरजेचे आहे. सध्यातरी १-६ पॉइण्ट वर भर देऊ शकता. त्यामुळे silly mistakes कमी होऊन मार्कस मध्ये छोटीसी का होईना निश्चितच भर पडेन.

आशिष बारकुल ( उपजिल्हाधिकारी २०१८)