स्पर्धा परिक्षेला विचारले जाणारे चर्चित - देश - राज्य - शहर



पाटणा देवी (चाळीसगाव) :
  • गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे.

सातारा :
  • महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे स्थापन करण्यात येत आहे.

अरुणाचल प्रदेश :
  • हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. 
  • या अगोदर सिक्किम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड हे पाच राज्य हागणदारीमुक्त ठरले आहे.

चंदिगढ़ :
  • सैन्य साहित्य महोत्सव-2018’ चे आयोजन चंदिगड या शहरात करण्यात आले होते

गांधीनगर रेल्वे स्टेशन (जयपुर) :
  • भारतातील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले या अगोदर मुंबईतील माटुंगा हे ‘ संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले होते परंतु ते सब-अर्बन (उप-नगरीय) ररेल्वे स्टेशन आहे.

तामिळनाडू :
  • राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला. असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले.

केरळ :
  • केरळ देशातील ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले भारतातील पहिले राज्य आहे. 
  • कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.

पूर्वी गोदावरी (आंध्र प्रदेश ) :
  • भारतातील १००% एलईडी स्ट्रीट लाइटिंग असणारा पहिला जिल्हा

फगवाडा (पंजाब) :
  • पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली.

चर्चित शहर  देश  राज्य यांची माहिती

मुंबई :
  • केंद्र शासन, राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला.

बुडापेस्ट :
  • 2023 या वर्षामध्ये आईएएएफ (IAAF) विश्व अथॅलेटिक्स चॅपियनशिप ची स्पर्धा पार पडणार आहे.

उत्तर प्रदेश :
  • या राज्यात विद्युत चोरी बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हात एंटी पॉवर थेफ्ट पुलिस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

राजस्थान :
  • राष्ट्रीय जैव इंधन धोरण (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान ठरले.

भोपाळ :
  • भारतातील पहिला वैश्विक कौशल (Mutti-Skill) पार्क स्थापन होत आहे. 

सिंगापुर :
  • 6 सप्टेंबर , 2018 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने सिंगापुर येथे आशियातील पहिले डेटा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली.

दंतेवाड़ा :
  • अटल बिहारी वाजपेयी एजुकेशन सिटी छत्तीगढ़ मध्ये दंतेवाड़ा या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे.

तेलंगाना :
  • या राज्य सरकार ने बायोटेक आणि बायोफार्मा क्षेत्रासाठी ‘बी. हब’ स्थापित करण्याचा निर्णय घेतला.

गुरुग्राम :
  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले.

झारखंड :
  • या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे. 

चर्चित शहर  देश  राज्य यांची माहिती

गुवाहाटी :
  • हे रेल्वे स्टेशन भारतातील पहिले सौर ऊर्जा संचालित स्टेशन ठरले.

महाराष्ट्र :
  • डीजीटल स्वाक्षरी असलेले ७/१२ देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

सूरत (गुजरात) :
  • भारतातील १०० % सौरऊर्जा ने संचालित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र (पीएचसी) असणारा पहिला जिल्हा.

फरीदाबाद :
  • भारतातील पहिले पॅरालंपिक भवन येथे स्थापित केले जात आहे.

तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर) :
  • भारतातील पहिले कीटक संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे.

कर्नाटक :
  • या राज्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ‘शक्तिस्थल’ स्थापन करण्यात आले.

कलकत्ता :
  • भारतातील पहिल्यांदा तरंगता बाजार म्हणजेच 'फ्लोटिंग मार्केट' पश्चिम बंगाल येथील कलकत्ता येथे सुरु करण्यात आला आहे

बुंदेलखंड एक्सप्रेस-वे :
  • 21 ऑगस्ट 2018 रोजी उत्तरप्रदेश सरकाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बुंदेलखंड एक्सप्रेस-वे चे नाव ‘अटल पथ’ असे केले


दिल्ली :
  • भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय दिल्लीच्या लुटियन भागात बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्य इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. 
  • पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments