पोलिस भरती 2020 ची तयारी करताना

 महाराष्ट्र पोलिस भरती 2019 साठी झाला मोठा बदल 

 

 जाहिरात

पोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परिक्षा द्यावी लागेल. नवीन Gr काय आहे, नक्की वाचा…!

MPSC English Grammar Free Mock Test -1
 https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-english-grammar-mock-test-1.html

मराठी व्याकरण ॅनलाईन Free Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/marathi-Vyakran-mock-test-1.html 

मराठी व्याकरण ॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html

MPSC Combine Sarav Paper Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-combine-sarav-paper-1.html

पोलिस भरतीची प्रक्रिया साधारणपणे 45 ते 60 दिवसांत पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही नियोजनपूर्वक अभ्यास करा तरच यश मिळू शकते. सर्वप्रथम गणित, बुद्धीमापन व मराठी हे विषय पक्के झालेत का बघा. या विषयात पैकीच्या पैकी गुण घेता येतात. सामान्य ज्ञानावरती अधिक भर न देता चालू घडामोडी घटकावरती भर द्या. प्रत्येक घटकासाठी एकच संदर्भ पुस्तक वापरा. मराठी – बाळासाहेब शिंदे, गणित – Master of Maths, बुद्धीमापन – अंकलगी, सामान्यज्ञान – सुरज शेख किंवा नवनीत जनरल नॉलेज.
तुमचे सकाळी शारीरिक तयारी झाल्यानंतर सकाळच्या सत्रात यापूर्वी झालेला पोलिस भरतीचा प्रश्‍न सोडवा. 100 पैकी किती गुण पडतात बघा व कुठे चुकले ते बघा. संध्याकाळच्या सत्रात सराव पेपर एक सोडवा. सध्या जास्तीत जास्त भर प्रश्‍नपत्रिका सोडविण्यावर द्या. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहात, त्या जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करा.

जितका अधिक सराव कराल तेवढे यश तुमचेच असेल. सराव वेळ लावून करा. प्रश्‍नाची उत्तरे चुकल्यास तत्काळ संदर्भ काढून पहा व मगच पुढची प्रश्‍नपत्रिका सोडवा. प्रश्‍न सोडवत असताना चारी पर्यायांचा विचार करा व अधिकाधिक चिंतन करा. यातील तांत्रिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र पोलिस भरतीचे अर्ज निघाले असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची अंतिम तारीख 2019 अशी आहे.

Police bharti recruitment 2019

शैक्षणिक पात्रता : 1) किमान उच्च माध्यमिक परीक्षा  – 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 2) उमेदवार माजी सैनिक असल्यास शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल, 3) पोलिस बँड पथकासाठी 10 वी उत्तीर्ण वयोमर्यादा – सर्वसाधारण गटासाठी 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय – 18 ते 33 वर्षे, माजी सैनिक – सैन्यात भरतीचे वय सैन्यातील एकूण सेवा 3 वर्षे, प्रकल्प व भूकंपग्रस्तासाठी – 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय 5 वर्षे शिथिल.
शारीरिक चाचणीत 50 टक्के गुण प्राप्त करणार्‍या उमेदवारांना लेखी परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येते. दररोजचा सराव योग्य वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. 80 गुणांपेक्षा कमी गुण घेऊ नका.
लेखी परीक्षा : 100 गुणाची व 90 मिनिटांची. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. तुम्ही 2014 पासून पोलिस भरतीची तयारी करत असणार यात शंका नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सरावाला महत्त्व द्या.
अंकगणित (25 गुण) : यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरळव्याज सरासरी, टक्केवारी, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ इ. घटकांचा समावेश असतो.
बुद्धीमत्ता चाचणी (25 गुण) : यामध्ये अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, बेन आकृती, सहसंबंध, दिशा, कूटप्रश्‍न इ. घटकांचा समावेश.
मराठी व्याकरण (25 गुण) : मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, शब्दसिद्धी, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्धलेखन यांचा समावेश असतो.
सामान्यज्ञान व चालू घडामोडी (25 गुण) : यामध्ये महाराष्ट्र, भारत व जगाच्या भूगोलाचा तसेच समाजसुधारक, इतिहास, पंचायत राज, राज्यघटना, चालू घडामोडी व जिल्हा यावर प्रश्‍न अपेक्षित असतात.