पोलिस भरतीची तयारी करताना

पोलिस भरतीची प्रक्रिया साधारणपणे 45 ते 60 दिवसांत पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही नियोजनपूर्वक अभ्यास करा तरच यश मिळू शकते. सर्वप्रथम गणित, बुद्धीमापन व मराठी हे विषय पक्के झालेत का बघा. या विषयात पैकीच्या पैकी गुण घेता येतात. सामान्य ज्ञानावरती अधिक भर न देता चालू घडामोडी घटकावरती भर द्या. प्रत्येक घटकासाठी  संदर्भ पुस्तक वापरा.

पेपरचा सराव :  तुमचे सकाळी शारीरिक तयारी झाल्यानंतर सकाळच्या सत्रात यापूर्वी झालेला पोलिस भरतीचा प्रश्न  सोडवा. 100 पैकी किती गुण पडतात बघा व कुठे चुकले ते बघा. संध्याकाळच्या सत्रात सराव पेपर एक सोडवा. सध्या जास्तीत जास्त भर प्रश्नभपत्रिका सोडविण्यावर द्या. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहात, त्या जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करा.

सराव : जितका अधिक सराव कराल तेवढे यश तुमचेच असेल. सराव वेळ लावून करा. प्रश्नाधची उत्तरे चुकल्यास तत्काळ संदर्भ काढून पहा व मगच पुढची प्रश्न्पत्रिका सोडवा. प्रश्ने सोडवत असताना चारी पर्यायांचा विचार करा व अधिकाधिक चिंतन करा.

शैक्षणिक पात्रता:

  • किमान उच्च माध्यमिक परीक्षा  – 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • उमेदवार माजी सैनिक असल्यास शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल,
  • पोलिस बँड पथकासाठी 10 वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा – सर्वसाधारण गटासाठी 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय – 18 ते 33 वर्षे, माजी सैनिक – सैन्यात भरतीचे वय सैन्यातील एकूण सेवा 3 वर्षे, प्रकल्प व भूकंपग्रस्तासाठी – 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय 5 वर्षे शिथिल.
शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणीत 50 टक्के गुण प्राप्त करणार्यास उमेदवारांना लेखी परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येते. दररोजचा सराव योग्य वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. 90 गुणांपेक्षा कमी गुण घेऊ नका.

लेखी परीक्षा : 100 गुणाची व 90 मिनिटांची. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. तुम्ही 2014 पासून पोलिस भरतीची तयारी करत असणार यात शंका नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सरावाला महत्त्व द्या.

अंकगणित (25 गुण) : यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरळव्याज सरासरी, टक्केवारी, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ व इतर. घटकांचा समावेश असतो.

बुद्धीमत्ता चाचणी (25 गुण) : यामध्ये अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, बेन आकृती, सहसंबंध, दिशा, कूटप्रश्नक व इतर. घटकांचा समावेश.

मराठी व्याकरण (25 गुण) : मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, शब्दसिद्धी, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्धलेखन यांचा समावेश असतो.

सामान्यज्ञान व चालू घडामोडी (25 गुण)  : यामध्ये महाराष्ट्र, भारत व जगाच्या भूगोलाचा तसेच समाजसुधारक, इतिहास, पंचायत राज, राज्यघटना, चालू घडामोडी व जिल्हा यावर प्रश्न अपेक्षित असतात.

आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
Maharashtra Police %2B