महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया

 महाराष्ट्र पोलिस भरती 2019 साठी झाला मोठा बदल

पोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परिक्षा द्यावी लागेल. नवीन Gr काय आहे, नक्की वाचा…!

 

पोलीस भरती निवड प्रक्रिया

अ) पाञता

  • उमेदवार इ.१२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
  • माजी सैनिकासाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल असते.
  • पोलिस बँड पथकासाठी इ.१० उत्तीर्ण आवश्यक.
  • नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांसाठी इ.७ वी उत्तीर्ण.

ब)वयोमर्यादा

  • सर्वसाधारण उमेदवार (Open)-१८ ते २५
  • मागासवर्गीय उमेदवार (OBC/SC/ST/NT-VJ)-१८ ते ३० वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रत – उमेदवार १८ ते ३५ वर्षे
  • माजी सैनिक उमेदवार – सैन्यदलातील सेवा + ३ वर्षे.

क) शारीरिक पाञता

  • पुरूष – उंची १६५ से.मी.
  • छाती न फुगवता -७९ से.मी.,फुगवुन ५ से.मी.
  • स्त्री – उंची १५५ से.मी., वजन ४८ कि.ग्र.

शारीरिक पात्रतेतील सवलत

1] नक्षलग्रस्त भागासाठी

  • उंची २.५ से.मी. पुरूष व महिला यांना सवलत .
  • छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही .

2] पोलिस बँड पथक

  • उंची २.५ से.मी. पुरूष व महिला यांना सवलत .
  • छाती २ से.मी. न फुगवता व फुगवुन १.५ से.मी.
  • खेळाडूला – उंचीत महिला व पुरूषांना २.५ से.मी. उंचीची सवलत.

ड) आरक्षन

  • SC 13%,ST 7%,VJ-A 3%,NTB 2.5%,NTC 3.5%
  • NTD 2%,SBC 2%,OBC 27%

विशेष आरक्षन
माजी सैनिक १५%,अपंग व्यक्ती ३%,महिला ३०%, प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रत ५%,खेळाडु ५%,होमगार्ड ५%.

★ पोलीस भरती निवड ★
अ) शारीरिक चाचणी (मैदानी) १०० गुण
ब) लेखी परीक्षा १०० गुण
——–
२00 गुण
क) मुलाखत घेतली जात नाही.

अ] शारीरिक चाचणी ( पुरूष उमेदवारासाठी )
१) १६०० मी. धावणे
( वेळ अंदाजे ६ मीनीटे, फिक्स नाही.) २० गुण.
२) १०० मी. धावणे
* ११.५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागल्यास २० पैकी २० गुण.
*१७.५० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागल्यास ० गूण.
३) गोळा फेक(७.२६० कि.ग्र. वजनाचा गोळा)
* ८.५० मी. फेकल्यास २० पैकी २० गुण.
* ३.१० मी. पेक्षा कमी फेकल्यास ० गुण.
४) लांब उडी
* ५ मी. किंवा जासत गेल्यास २० गुण.
* २.५० मी.पेक्षा कमी गेल्यास ० गुण.
५)पुलप्स ( पाय न वाकवता न झगडता पुलप्स काढल्यास )
* १० पुलप्स काडल्यास २० गूण.
* ५ पेक्षा कमी पुलप्स काढल्यास ० गुण.
महिला उमेदवारांसाठी
१) १६०० मी. धावणे
( वेळ अंदाजे ६ मीनीटे, फिक्स नाही.) २५ गुण.
२) १०० मी. धावणे
* १४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागल्यास २५ पैकी २५ गुण.
*२० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागल्यास ० गूण.
३) गोळा फेक(४ कि.ग्र. वजनाचा गोळा)
* ६ मी. फेकल्यास २५ पैकी २५ गुण.
* ४ मी. पेक्षा कमी फेकल्यास ० गुण.
४) लांब उडी
* ३.८० मी. किंवा जासत गेल्यास २५ गुण.
* १.७० मी.पेक्षा कमी गेल्यास ० गुण.

निवड प्रक्रियेतील टप्पे
अ) शारीरिक पात्रताः प्रथम उमेदवाराची उंची/वजन/छाती मोजन्यात येते.( पहिला टप्पा )
ब) प्रमाणपत्र तपासणी ( दुसरा टप्पा ) उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरल्यास त्याच्या मुळ प्रमाणपत्राची तपासणी होते.
क) मैदानी चाचणी १०० गुण (तिसरा टप्पा )
ड) लेखी परीक्षा १०० गुण ( चौथा टप्पा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here