बंगालची फाळणी बद्दल संपूर्ण माहिती

 •  बंगाल प्रांत मोठा असल्या कारणाने त्याचा राज्यकारभार पाहणे शक्य नव्हते.
 • लॉर्ड कर्झन हा मोठ्या तडफेचा गवर्नर होता.
 • इंग्रजी राज्याशी दिवसेदिवस शत्रुत्व करणाऱ्या सुबुद्ध बंगाली लोकांचे ऐक्य भंग पावणार होते. हा एक राज्यकर्त्यांचा कुटील डाव होता. खेळण्याचे लॉर्ड कर्झनने ठरविले.
 • सन १९०३ च्या प्रारंभास बंगालचा गवर्नर सर आंड्र्यू फ्रेझर याने कर्झनच्या आदेशाने फाळणीची योजना तयार केली. कर्झनने सर्वसाधारण अनुमती देवून योजना तयार केली.
 • मे १९०५ मध्ये लंडनच्या standard या वर्तमानकाळात फाळणीस विलायत सरकारने मान्यता दिली हे प्रथम छापले.
 • हिंदुस्तान सरकारने हि योजना ७ जुलै १९०५ मध्ये सिमल्याहून प्रसिद्ध केली.
 • बंगाल प्रांतापासून चितगाव, डाक्का, व राजेशाही विभाग व माल्डा जिल्हा प्रदेश तोडून ते आसाम प्रांतास जोडले जातील. दार्जीलिंग बंगालमध्येच राहील.
 • या नव्या प्रांताचे नाव पूर्व बंगाल व आसाम असे राहील. डाक्का हि त्याची राजधानी राहील. त्याचा कारभार ले गवर्नर पाहिलं.
 • बंगाल प्रांताच्या पश्चिमेकडील काही प्रदेश व छोटा नागपूर भागातील पाच हिंदू संस्थाने बंगालपासून अलग केली जातील.
 • बंगाल प्रांतापासून  झालेल्या नव्या पूर्व बंगाल प्रांतास मुसलमान बहुसंख्य होते. खुद्द बंगाल प्रांतात हिंदूची संख्या ४ कोटी व बंगाली हिंदूची संख्या १ कोटी ८० लाख होती.
 • सुरेंद्रनाथ बनर्जी यांनी आपल्या ‘ The Bengalee ‘ या पत्रातून त्याच दिवशी बंगालमध्ये अभूतपूर्व लढा सुरु झाला. व ५० हजाराच्या सभा घेतल्या.
 • जो पर्यंत बंगालची फाळणी रद्द होत नाही, तो पर्यंत बहिष्कार चळवळीस सरकारविरुद्ध पाठींबा व्यक्त करण्यात आले.
 • बकिमचंद्र यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वन्दे मातरम हे गीत सगळ्यांच्या ओठावर होते.
 • दोन बंगालमधील बंगाली लोकांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून ‘ फेडरेशन हॉल ‘ या भव्य इमारतीची पायाभरणी झाली.
 • शेवटी हि फाळणी रद्द करण्याचा त्यांना निर्णय घ्यावा लागला. १२ डिसेंबर १९११ रोजी दिल्ली भव्य दरबार भरून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. आणि हिंदी राष्ट्रवादी चळवळीचा हा पहिला विजय होता.

लॉर्झ कर्झन हा साम्राज्यावादी व स्वसमूह श्रेष्ठत्व सिध्दान्तांचा कट्टर पुरस्कर्ता होता.

1903 सर अ‍ॅन्डयू फ्रेझरने कर्झनचा आदेश मानून फाळणीची योजना तयार केली.

ब्रिटिश सरकारची मान्यता मिळाल्याने मे 1905 मध्ये लंडनच्या स्टॅंर्डट वर्तमानपत्राने प्रथम जाहीर केली.

बिहार व ओरिसा विस्ताराने मोठा प्रदेश असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी फाळणी करण्यात आली.

परंतु प्रत्यक्षात तेथील राष्ट्रवादी चळवळ नष्ट करणे आणि हिंदु मुसलमान यांच्यात भेदनीतीचे राजकारण करणे हाच उद्देश बंगालच्या फाळणीचा असावा.

पूर्व बंगाल व आसाम प्रदेश एकत्र आणि पश्चिम बंगालचा प्रदेश असे विभाजन केले.

फाळणी विरोधी बंगालमध्ये वंगभंग आंदोलन सुरु झाले. कोलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये प्रचंड सभा घेऊन निषेध केला.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी दि बंगाली वृत्तपत्रातून आंदोलनाचा इशारा दिला 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस राष्ट्रीय शोक दिन जाहिर करुन याच दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम केला.

गुरुदेव टागोर यांनी हमारा सोनार बंगला हे काव्य रचले वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले बंगाली ऐक्याचे प्रतीक म्हणून आनंद मोहन बोस यांनी फेडरेशन हॉल चे भूमिपूजन केले.

फाळणी रद्द होत नाही तोपर्यत लढा चालू ठेवण्या बाबत निर्णय घेतला.
राष्ट्रीय कॉग्रसचे कार्य :

1905-1916 बंगालच्या फाळणीमुळे वंगभंग आंदोलन सुरू झाले.

त्या वेळी मवाळ जहाल एकत्र आले 1905 च्या बनारस अधिवेशनाच्या अध्यक्ष पदावरून गोखले यांनी र्लॉड कर्झनवर टीका करून चतु:सूत्री कार्यक्रम स्वीकारून आंदोलनाला पाठिंबा दिला.

1906 च्या कोलकत्ता अधिवेशनात दादाभाई नौरोजीने चतु:सुत्रीचा ठराव मंजूर केला आणि कॉग्रसमध्यील संघर्ष टाळला 1907 च्या सुरत अधिवेशनात कॉग्रसमध्ये फूट पडून जहाल-मवाळ गट झाले.

या फुटीचा इंग्रजांनी फायदा घेऊन जहालवादी चळवळ मोडण्यासाठी अनेक नेत्यांना शिक्षा ठोठावली 1914 ला टिळकांची सुटका झाली.

1916 च्या लखनौ अधिवेशनात दोन्ही गट एकत्र येऊन अखंड कॉग्रेस पुन्हा निर्माण झाली. तसेच मुस्लीम लीग व कॉग्रेस यांच्यात करार झाला त्यास लखनौ करार म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here