आधुनिक भारताचा इतिहास माहिती history of modern India

आधुनिक भारताचा इतिहास माहिती

वास्को द गामा यांनी 1498 मध्ये कालिकत येथे प्रवेश केला. तेथून पुढे युरोपियन लोकांचा भारतात वावर सुरू झाला. गोव्यामध्ये पोर्तुगीज लोकांनी 16 व्या शतकात आपली वसाहत स्थापन केली. युरोपातून त्यापुढील शतकात खूप प्रवाशांनी भारतास भेटी देणे सुरू केले. त्यात इटालियन, इंग्रज, फ्रेंच आणि डच होते. जे व्यापारी होते, ते व्यापारानिमित्त ये-जा करू लागले. काही धाडसी होते, काही साहसी होते, तर काही दर्यावर्दी भारताला भेटी देत असत. याच दरम्यान ब्रिटिश, फ्रेंच, नेदरलॅंड आणि डेन्मार्कमधील लोकांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 17 व्या शतकात या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी या सर्वांवर मात करून भारतात प्राबल्य मिळवून ते एकमेव भारताचे सत्ताधीश झाले. ब्रिटिशांनी दोन शतके भारतात सत्ता गाजवली आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले.

history of modern India

ब्रिटिशांनी भारतात साम्राज्य पक्के केल्यानंतर ते भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीचे मालक बनून त्याचा आर्थिक फायद्यासाठी व्यापार करू लागले. व्यापारी वृत्तीने आर्थिक लाभ उठवू लागले. त्याच वेळी भारतातील गरीब लोक त्यांचे मजूर म्हणून काम करू लागले. त्यातूनच ब्रिटिश साम्राज्यशाहीची दहशत वाटू लागली. धाकधपटशाने ब्रिटिश भारतातील संपत्ती परदेशात नेऊ लागले. या त्रासाला भारतीयही त्रासून गेले. सन 1857 च्या युद्धानंतर सहा दशके म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंतचा काळ हा ब्रिटिश सत्तेचा उच्चांकीचा कालावधी ठरला. यानंतर देशभक्तांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीला विरोध करण्यास सुरवात करून आंदोलनांना सुरवात केली.
मध्यमवर्गीय भारतीयांनी सन 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केली. त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना, राष्ट्रीयता, राष्ट्रभक्तीचा प्रचार सुरू झाला. लोकांचा देशाभिमान जागा झाला. राष्ट्रीय कॉंग्रेसद्वारे ब्रिटिशांच्या वागणुकीत सुधारणा व्हावी असा प्रयत्न सुरू झाला. महात्मा गांधीचे 1915 मध्ये भारतात पुनरागमन झाल्यानंतर ही चळवळ सार्वजनिक बनली आणि त्या चळवळीने सार्वजनिक रूप धारण केले.
मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांचा काळ 1869 ते 1948 असा होता. आफ्रिकेमध्ये गांधीजी असताना त्यांनी ब्रिटिश राजवटीचा बराच त्रास सोसलेला होता, त्यामुळे गांधीजींना आपल्या भूमीत ब्रिटिशांनी चालवलेली सत्ता आणि त्यामुळे देशातील गरिबी या बाबी निपटावयाच्या होत्या, त्यासाठी भारत देशास स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते.

आधुनिक भारताचा इतिहास

1757 – प्लासीचे युद्ध – सिराजउद्‌दौलाहचा पराजय ब्रिटिशांनी केला.

1760 – वंदीवास युद्ध – फ्रेंचांवर ब्रिटिशांनी विजय मिळवला.

1761 – पानिपतचे तिसरे युद्ध झाले.
1764 – मीर कासिमचा ब्रिटिशांनी पराभव केला, बॉक्‍सरचे युद्ध
1765 – ब्रिटिशांना बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क प्राप्त झाले.
1767 ते 1769 – म्हैसूरचे पहिले युद्ध झाले.
1772 – वॉर्न हॉस्टिंगची बंगालचे गर्व्हनर म्हणून नेमणूक झाली.
1773 – ब्रिटिश पार्लमेंटमध्ये नियम आणि फायदे यांना मंजुरी
1775 ते 1782 – पहिले अँग्लो – मराठा युद्ध झाले.
1780 ते 1784 – म्हैसूरचे दुसरे युद्ध झाले, त्यात हैदरअलीचा ब्रिटिशांनी पराभव केला.
1784 – पिट्टस भारतीय कायदा अस्तित्वात आला.
1790 ते 1792 – तिसरे म्हैसूरचे युद्ध टिपू सुलतानबरोबर झाले.
1793 – ब्रिटिशांनी बंगालमध्ये कायमस्वरूपी सत्ता प्रस्थापित केली.
1799 – चौथे म्हैसूरचे युद्ध टिपू सुलतानबरोबर झाले, त्यात टिपू सुलतानचा पराभव केला.
1802 – बास्सेनबरोबर तह केला.
1803 ते 1805 – दुसरे अँग्लो – मराठा युद्ध झाले.
1814 ते 1816 – अँग्लो – गुरखा युद्ध झाले.
1817 ते 1818 – पिंदारी युद्ध झाले.
1824 ते 1826 – पहिले बरमेसे युद्ध झाले.
1829 – सती पद्धतीस विरोध आणि ती पद्धत थांबवण्याचे प्रयत्न झाले.
1831 – म्हैसूरचे सर्व प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपूर्द झाले.
1833 – ईस्ट इंडिया कंपनीत सुधारणा करण्याचे धोरण व बदल करण्याविषयी प्रयत्न झाले.
1833 – गुलामगिरीचा अस्त करण्याचा ब्रिटिश साम्राज्यात प्रयत्न झाला.
1838 – शहा-सुजा, रणजितसिंह आणि ब्रिटिश हे त्रिदल करार करून तीन पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला.
1839 ते 1842 – पहिले अफगाण युद्ध झाले.
1843 – ग्वाल्हेरचे युद्ध झाले.
1845 ते 1846 – पहिले अँग्लो – शीख युद्ध झाले.
1848 – लॉर्ड डलहौसी हे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
1848 ते 1849 – दुसरे अँग्लो – शीख युद्ध झाले.
1852 – दुसरे बरमेसे युद्ध झाले.
1853 – रेल्वे आणि टेलिग्राफ लाइनची सुरवात झाली.
1857 – भारतीय स्वातंत्र्यासाठीचे पहिले युद्ध झाले.
1857 – स्वातंत्र्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी बंड केले. स्वातंत्र्यासाठी धडपड आणि झगडणे घडले.
1858 – भारतीय सत्तेत ब्रिटिश राजवटीचा मुकुट, राज्याभिषेक आणि पाच शिलिंगाची नाणी सुरू
1877 – भारताची राणी म्हणून इंग्लंडच्या राणींचा घोषणा करण्यात आली.
1878 – व्हर्म्याक्‍युलर प्रेसचा कायदा अस्तित्वात आला.
1881 – फॅक्‍टरी ऍक्‍ट (कायदा) अस्तित्वात आला.
1885 – पहिली राष्ट्रीय कॉंग्रेसची सभा झाली.
1897 – प्लेगची साथ मुंबईमध्ये पसरली. फॉमीन कमिशनची स्थापना करण्यात आली.
1899 – लॉर्ड क्रूझ हे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल बनले.
1905 – बंगालची फाळणी दोन भागांत करण्यात आली. पूर्व व पश्‍चिम बंगाल म्हणून ते अस्तित्वात आले.
1906 – मुस्लीम लिगची स्थापना झाली.
1911 – बंगालच्या फाळणीनंतर बंगाल प्रेसिडेन्सी अस्तित्वात आली.
1912 – कलकत्त्याहून दिल्ली येथे राजधानी हलवण्यात आली.
1913 – भारत सरकार शैक्षणिक कायदा अस्तित्वात आला.
1916 – संयुक्त नियमावली बनवून महिला विद्यापीठाची स्थापना पुणे येथे केली.
1919 – रोबलॅट ऍक्‍ट रिव्होक्‍स प्रोटेस्ट, जालियनवाला बाग हत्याकांड झाले.
1920 – खिलाफत मूव्हमेंटची सुरवात आणि असहकाराची चळवळ सुरू झाली.
1921 – मुस्लीम सेन्सस ऑफ इंडिया.
1922 – दिवाणी, मुलकी अवज्ञा करणे सुरू झाले, चौरी-चौरा जोर वाढून दंगली सुरू झाल्या.
1925 – समिती नेमून पुन्हा चौकशी अहवाल तयार झाले.
1927 – भारतीय नौदलाचा कायदा अस्तित्वात आला. सायमन कमिशनची नेमणूक झाली. आकाशवाणीची सुरवात.
1928 – सायमन कमिशन भारतात आले; परंतु सर्वांनी त्यास विरोध दर्शवला आणि बहिष्कार टाकला. कोणताही संबंध ठेवला नाही.
1929 – लॉर्ड इरवीन यांनी ट्रेड युनियनचे तुकडे केले.
1930 – मिठाचा सत्याग्रह, पहिली परिषद भरवण्यात आली.
1931 – लॉर्ड इरवीन आणि गांधी यांचा दुसऱ्या परिषदेत करार झाला.
1932 – लॉर्ड इरवीन आणि गांधी यांची तिसरी परिषद पुणे येथे झाली, त्याला पुणे करार असे संबोधले जाते.
1934 – मुलकी आणि दिवाणी खात्यांनी अवज्ञा करणे सुरू केले आणि तशी चळवळ सुरू झाली. त्याच वर्षी बिहारला भूकंपाचा मोठा धक्का बसला.
1937 – प्रांतिक स्वायत्तता देण्याची घोषणा केली.
1939 – राजकीय पेच निर्माण होऊन कॉंग्रेस मंत्र्यांनी राजीनामे दिले.
1942 – भारत छोडो आंदोलनाची सुरवात, भारतीय राष्ट्रीय आर्मीची स्थापना, क्रिप्स – मिशन.
1944 – गांधी आणि जीना यांची पाकिस्तानबाबतची बोलणी थांबली.
1946 – अंतर्गत सरकारची स्थापना, मतदारसंघनिहाय उमेदवारांची निवड आणि त्यांची असेंब्ली अस्तित्वात आली.
1904 ते 1947 – भारतीय झेंड्याचा इतिहास
3 जून 1947 – लॉर्ड माऊन्ट बॅटन यांचा भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न.
15 ऑगस्ट 1947 – हिंदुस्थानचे पाकिस्तान आणि भारत असे भाग आणि स्वातंत्र्याची सुरवात.
आधुनिक भारताचा इतिहास थोडक्‍यात मुद्देसूद देण्याचा हा प्रयत्न केला आहे. प्रश्‍न पद्धती वस्तुनिष्ठ असल्याने त्यावर अनेक प्रश्‍न तयार होऊ शकतात. वस्तुनिष्ठ प्रश्‍न पद्धतीनुसार प्रश्‍नांचे अचूक उत्तर अपेक्षित असते, त्यानुसार उमेदवारांनी तयारी करणे क्रमप्राप्त आहे. या व्यतिरिक्त आणखी मुद्देसूद या विषयावरील इतर संदर्भित पुस्तकांतील माहितीचा अभ्यास गरजेचा राहणार आहे.
वस्तुनिष्ठ प्रश्‍नांसाठी जास्तीत जास्त अभ्यासाची आणि केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याची गरज असते. त्यानुसार या बाबींचे वाचन पुन:पुन्हा होणे गरजेचे आहे, त्याशिवाय ही माहिती आठवणीत ठेवणे शक्‍य नसते. त्यामुळेच चांगल्या तयारीची गरज राहणार असून, तसे प्रयत्न गरजेचे आहेत. morden%2Bhistory%2Bof%2Bindia%2Bempsckida