ladki bahin.maharashtra.gov.in e-KYC मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना KYC कशी करावी?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ladki bahin.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ladki bahin.maharashtra.gov.in e-KYC योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

ladki bahin.maharashtra.gov .in mpsckida
ladki bahin.maharashtra.gov.in mpsckida

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना KYC कशी करावी?

  • मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
  • या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करावे.

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

(येथे क्लिक करा)

लाडकी बहिण योजनेचे KYC झाली का नाही कसे पहायवे? Ladki Bahin Yojana Status Check

  • आपण वेबसाईट वरती अर्ज केलेला असेल तर तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईट वरती लॉगइन करावे लागेल.
  • साईट वरती लॉगइन केल्यानंतर Menu मध्ये Application Made Earlier या पर्याय वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमचा अर्ज त्याठिकाणी पाहायला मिळेल. आपल्या नावाच्या समोर अर्जाचा क्रमांक, अर्जदाराचा फोटो, अर्जाचे स्टेटस (Approved/Reject)/ Sanjay Gandhi आणि Action हे पर्याय पाहायला मिळतील.
  •  Action या पर्याय मध्ये खाली दाखवल्या प्रमाणे पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करावे.

लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय आहे? Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? Ladki bahin Yojana Required Documents

(आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)

अधिवास प्रमाणपत्र

  • प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे

  • (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

  • पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
  • शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

नवविवाहितेच्या बाबतीत

  • रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

बँक खाते तपशील

  • (खाते आधार लिंक असावे)

लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा?Ladki Bahin Yojana Apply Online Process

  • ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

शासनाचा पत्ता: महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

  • 3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत