पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द 10,001 जागासाठी भरती

पवित्र पोर्टलवर 10,001 शिक्षकांची जाहिरात भरण्यासाठी सूचना :

  • पवित्र प्रणालींतर्गत शिक्षक पद भरती प्रणालीचे उदघाटन मा. ना. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते दि. २८/२/२०१९ रोजी दु. १२.३० online झालेले आहे.
  • व्यवस्थापन व शिक्षणाधिकारी यांच्या log in ला जाहिरात उपलब्ध करण्यात आलेली आहे.
  • शिक्षक पद भरतीच्या जाहिराती संस्था आणि जाहिरात मान्य करणारे प्राधिकारी यांच्या log in ला देण्यात आली आहे. सदर जाहिरात आजच तपासून घ्यावी.
  • जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी जाहिरात बरोबर असल्याची संस्था व ती मान्य करणारे प्राधिकारी यांची खात्री झाल्यानंतरच शनिवार दि. २/३/२०१९ रोजी नियुक्ती प्राधिकारी यांनी शासन निर्णय दि. ७/२/२०१९ मध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक / विभाग / राज्यस्तरावर जाहिरातीस प्रसिद्धी द्यावयाची आहे.
  • दिलेली जाहिरातच अंतिम आहे. तथापि जाहिरातीमध्ये चूक अथवा दुरुस्ती असल्यास आजच कळवावे.
  • पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी तसेच सर्वांसाठी दि. २/३/२०१९ पासून सर्व व्यवस्थापनांच्या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील.
  • पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दि. ११/३/२०१९ पासून उपलब्ध होईल.

 

Shikshak Bharti recruitment 2019
Shikshak Bharti recruitment 2019

 

 Pavitra Portal – Shikshak Bharti Apply Online

 

  • रिक्त पदापैकी एखाद्या/काही पदाबाबत मा. न्यायालयांत मान्यतेबाबत प्रकरण प्रलंबित असेल अथवा अन्य उचित कारणाने रिक्त पदे भरणे शक्य नसल्यास अशी पदे वगळून संस्थांनी ROSTER ची माहिती भरावी.
  • शिक्षणाधिकारी यांनी रोस्टर VERIFY केल्यानंतर जी पदे जाहिरातीसाठी मान्य केली आहेत त्या सर्व पदांची जाहिरात देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय जाहिरात पूर्ण होणार नाही.
  • इ. १ ली ते इ ५ वी / इ. ६ वी ते इ. ८ वी/ .इ. ९ वी ते इ १० वी / इ. ११ वी ते इ. १२ वी या गटातील पद भरतीसाठी संस्था/स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात देऊ शकतील.
  • संस्थेने ज्या माध्यमातून बिंदू नामावली तपासलेली असेल ते माध्यम ROSTER भरताना आणि जाहिरात CREATE करताना निवडावे.

उदा. मराठी माध्यमाची शाळा आहे व सदर शाळेस विज्ञान शाखा संलग्न आहे विज्ञान शाखेचे पद भरताना (PHYSICS/CHEMISTRY ETC ) भरताना माध्यम मराठी राहील.तसेच ROSTER भरताना हि माध्यम मराठी राहील

  • रात्र शाळांना जाहिरात द्यावयाची असल्यास NIGHT SCHOOL या टॅब समोर YES वर क्लीक करावे. रात्र शाळा वगळून अन्य शाळांनी NO या टॅब समोर क्लीक करावे.
  • जाहिरातीसाठी विषयनिहाय पदाची मागणी नोंदविताना शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विविभागाचा शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दि. ०७/०२/२०१९ अभ्यासावा.
  • इ. ६ वी ते इ. ८ वी गटासाठी भाषा,गणित,विज्ञान,गणित/विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयासाठी जाहिरात देता येईल.

अ) संस्थेला फक्त गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा.
ब) संस्थेला फक्त विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा.
क) संस्थेला गणित/विज्ञान दोन्ही विषय शिकवू शकणारा शिक्षक पाहिजे असेल तर गणित/विज्ञान विषय निवडावा.

  • इ. ९ वी ते इ १० वि गटासाठी भाषा,गणित,विज्ञान,गणित/विज्ञान,इतिहास,भूगोल , सामाजिक शास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयासाठी जाहिरात देता येईल.

अ) संस्थेला फक्त गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा.
ब) संस्थेला फक्त विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा.
क) संस्थेला गणित/विज्ञान दोन्ही विषय शिकवू शकणारा शिक्षक पाहिजे असेल तर गणित/विज्ञान विषय निवडावा.
ड) संस्थेस इतिहास व भूगोल या विषयासाठी शिक्षक पाहिजे असल्यास त्या प्रमाणे जाहिरातींमध्ये मागणी करता येईल
इ) इतिहास,भूगोल,समाजशास्त्र ,राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र या विषयांपैकी शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र विषय निवडावा.
ई) शारीरिक शिक्षण या विषयासाठी पूर्ण वेळ कार्यभार उपलब्द असल्यास शारीरिक शिक्षण विषय निवडावा.

  • इ. ११ वी ते इ. १२ वी या गटासाठी फक्त पूर्ण वेळ पदासाठी जाहिरात देता येईल.
  • संस्थेने जाहिरात तयार केल्यानंतर SAVE करून शिक्षणाधिकारी अथवा संबंधित प्राधिकाऱ्याकडे FORWARD करावी.
  • जाहिरात फॉरवर्ड केल्यानंतर तसा अलर्ट संस्थेस येतो.
  • जाहिरात तयार करण्यासाठी कार्य पद्धती ( FLO CHART ) HOME PAGE वर उपलब्ध करण्यात आलेला आहे
  • पवित्र पद भरतीच्या सविस्तर तपशीलासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि ०७/०२/२०१९ पहावा.

 

सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी.

  • सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.
  • पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार.
  • यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे.विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील.
  • अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.
  • शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल.

२ मार्च रोजी शिक्षकभरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.