दक्षिण अमेरिका South America

 • या खंडाचा उत्तर भाग हा उष्ण कटिबंधीय आहे. विषुववृत्ता पासून जसजसे दक्षिणेला जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.
 • अ‍ॅमेझॉन नदीचे खोरे – या नदीचा उगम अ‍ॅन्डस् (Andes) पर्वतातून पेरू येथे होतो. ही ६५०० कि.मी. लांब नदी पेरूपासून ब्राझीलमधून अटलांटिक समुद्राला मिळते.
 • नाईल नदीनंतर अ‍ॅमेझॉन ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे.
 • अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात दाट विषुववृत्तीय वने आहेत. त्याला स्थानिक भाषेत सेल्व्हास (selvas) असे म्हटले जाते. या नदीच्या खोऱ्यात जी शेती केली जाते तिला ग्युकास(Guicas) असे म्हणतात.
 • ऑरनोको नदीचा उगम गयानाच्या पठारावरून होतो.
 • जगातील सर्वात उंच एंजल धबधबा या नदीवर आहे.
 • पराणा नदीचे खोरे : ही नदी पेरॉग्वे अणि ब्राझील या देशांची सीमा निश्चित करते. दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे धरण इतापो धरण या नदीवर आहे.
 • या खंडात तीन ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत. त्यांची नावे लेनॉज, कंपास, पंपास वाळवंट.
 • आटाकामाचे वाळवंट : चिलीच्या किनाऱ्याला असलेले हे जगातील सर्वात शुष्क वाळवंट आहे. येथे सोने, नायट्रेट आणि कॉपर हे सापडतात.
 • ग्रॅन चॅको पेरॉग्वेच्या पश्चिमेला अणि अर्जेटिनाच्या उत्तरेला अणि बोलिव्हिया च्या दक्षिणेला हा गवताळ प्रदेश आहे.
 • ग्रॅनचॅकोचा स्थानिक भाषेत अर्थ शिकाऱ्यांची भूमी.
अ‍ॅन्दस् पर्वतश्रेणी :
 • ही पर्वतश्रेणी व्हॅनेझुएला, कोलंबिया, इडोर, बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेटिना या सात देशांतून जाते.
 • * सरोवरे – लेक मॅरे कॉबो : हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. ते व्हॅनेझुएला च्या उत्तरेला आहे. या ठिकाणी तेल सापडते.
 • * लेक टिटि काका (Lake Titi caca) बोलेव्हिया आणि पेरू या दरम्यान हे सरोवर आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
 • ओपेक या देशांचा समूहात असणारा दक्षिण अमेरिकेतील देश – व्हॅनेझुएला
 • जगातील मोठे तांबे उत्पादन – चिली
 • दक्षिण अमेरिकेतील भूवेष्टित देश – बोलेव्हिया अणि पॅराग्वे
 •  दक्षिण अमेरिकेतील लोकसंख्येत आघाडीवर अनुक्रमे – ब्राझील, कोलंबिया, अर्जेटिना, पेरू.
 • अर्जेंटिनात असणारा गवताळ प्रदेश पंपास नावाने ओळखला जातो.
 • एंजल धबधबा हा व्हॅनेझुएलातील ओरिनॅको (Orinaco) या नदीवर आहे.
 • क्रूड तेलासाठी प्रसिद्ध असलेले मॅराव येबो सरोवर व्हॅनेझुएलात आहे.
 • सोडियम नायट्रेट हे आटाकामा वाळवंटात सापडते.
 • दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखर अ‍ॅकोनकासुआ (Aconcasua) हे आहे.
 •  दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे शहर साओपॉलो (Saopaulo) आहे.
 • Chuquicamata याला कॉपर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात.
 • गॅलाकोबस ही बेटे दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला स्थित आहे. ती एक्वेडीअरच्या ताब्यात आहेत. ही बेटे प्रामुख्याने पशुपक्षी व कासव यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. south america map%2Bempsckida