पोलीस भरती स्पेशल – मराठीत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा (भाग 4)

Police%2BBharti%2BSpecel%2Bnotes%2Bpart%2B4

परीक्षेत छोट्याश्या गोंधळामुळे विध्यार्थी हातचे मार्क्स गमावतात व ज्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स पाडले जाऊ शकतात, त्यात योग्य मार्गदशना अभावी अपयशी ठरतात. आजचा हा लेख, तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी करण्यास नक्कीच संजिवनी ठरेल.

मराठी विषयात आपण कशा प्रकारे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो व ते पण मजेशीर स्वरूपात अभ्यास करून, ते आपण या लेखात पाहणार आहोत.

स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणा मधील शब्दसिद्धी या घटकावर सर्रास प्रश्न विचारतात. या लेखात आपण शब्दसिद्धी बद्दल माहिती घेऊ. शब्दसिद्धीचे विविध प्रकार आहेत व प्रत्येक प्रकारात विविध शब्द आहेत. परीक्षेत या घटकवरील एखादा शब्द विचारला तर गोंधळ निर्माण होतो व विध्यार्थी चुकीचे उत्तर निवडतात.

जर आपल्याला त्या त्या प्रकारचे शब्द त्या त्या प्रकारानुसार लक्षात ठेवण्यास कठीण जात असतील, तर त्यासाठी आपण शब्दसिद्धीच्या प्रत्येक प्रकारच्या गोष्टी बनवल्या तर, किती मजेशीर होईल ना ?

मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात आशा स्वरूपात मजेशीर गोष्टी बनवल्या आहेत. जेणे करून गोष्ट वाचली की त्या त्या प्रकारचे शब्द कायमस्वरूपी लक्षात राहतात. तुम्ही शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक नक्की वाचून पहा व त्या नुसार अभ्यास कसा मजेशीर होते ते स्वतः अनुभवा.

चला तर मग आज आपण देशी शब्द कसे गोष्टी नुसार पाठ होतात ते पाहू…!
● देशी किंवा देशज शब्द : महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणाऱ्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात.

■ देशी किंवा देशज शब्द : खुळा , लुगडे , मुलगी , कंबर , उनाडकी , पोरकट , डोळा , वेढा , मळकट , अबोला  , वेडा , दगड , धोंडा ,  डोके .

★ वरील दिलेले देशी शब्द खालील गोष्टीत समाविष्ट आहेत, खालील गोष्ट वाचताना विध्यार्थ्यांने त्यानुसार डोळ्यासमोर चित्र निर्माण करावे.

★ देशी शब्द ट्रिक्स : एक खुळा देशी (दारू) पितो व लुगडे नेसून मुलगी प्रमाणे लाजत व कंबर हलवत चालत असताना, उनाडकी व पोरकट पोरं त्याला डोळा मारून वेढा घालतात.
हे पाहून दुसरा मळकट व अबोला वेडा दगड व धोंडा मारून त्या पोरांचे डोके फोडतो.

( नोट :- तुम्ही  देशी शब्द हे देशी दारूच्या ट्रिक्स / गोष्टी  वरून, कायमस्वरूपी लक्षत  ठेऊ शकतात. वरील गोष्टीचे डोळ्या समोर चित्र निर्माण करा )

वरील ट्रिक्स वाचताना  ती एक गोष्ट आहे असे समजून डोळ्या समोर चित्र निर्माण करा, गोष्ट :- एक खुळा माणूस देशी दारू पितो व लुगडे नेसून रस्त्यावरून जात आहे, तेवढ्यात उनाडकी करणारे मुले त्याला वेढा घालून त्रास देत आहेत. हे पाहून दुसरा खुळा ज्याने मळकट कपडे घातले आहेत असा तेथे येतो जो की अबोला आहे, बोलता येत नाही म्हणून, तो दगड व धोंडे मारून त्या उनाडकी करणाऱ्या पोरांचे डोकं फोडतो.

◆ ट्रिक्सचा फायदा कसा होतो ते पहा : समजा परीक्षेत असा प्रश्न विचारला की, खुळा , लुगडे व डोळा हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत ? जेव्हा तुम्ही असा प्रश्न वाचता तेव्हा लगेच तुम्हाला ” देशी दारू पिलेल्या खुळ्याची गोष्ट आठवते व तो खुळा लुगडे नेसून चालतो व त्याला पोरं डोळा मारतात” हे तुमच्या डोळ्या समोर येईल. या नुसार तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे देशी दारू पिल्यामुळे झाले होते म्हणून हे शब्द देशी शब्द आहेत व तुम्ही अचूक उत्तर द्याल.

बाकी देशी शब्द व ट्रिक्स पुस्तकात समाविष्ट आहेत. विचार करा जर सर्व मराठी व्याकरण अश्या गोष्टी व मजेशीर ट्रिक्स नुसार पाठ केले तर आपण पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ.
मी आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात आशा स्वरूपात सर्व गोष्टी टाकल्या आहेत, जे की बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्हाला ते आगामी स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

लेखक – राजेश मेशे सर