MPSC Assistance सहाय्यक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

एमपीएससी सहाय्यक पूर्व परिक्षेचा अभ्यासक्रम नेमका कसा असतो?

mpsc syllabus
MPSC Syllabus
परीक्षा योजना :
  • या पदासाठी सामान्य क्षमता या विषयाची एक प्रश्नपत्रिका असते.
  • हि प्रश्नपत्रिका १०० प्रश्नांची व १०० गुणांची असते.
  • परीक्षेचा दर्जा हा पदवी वर अवलंबून असतो.
  • प्रश्नपत्रिकेचे माध्यम – मराठी व इंग्रजी असते.
  • परीक्षेचा कालावधी – एक तास असतो.
  • परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते.
अभ्यासक्रम – सामान्य क्षमता चाचणी :
  • चालू घडामोडी – जागतिक व भारतातील सर्व
  • नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन व प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन.
  • आधुनिक भारताचा इतिहास व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे
  • अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, परीक्षण
  • सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, व वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
  • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.

सहाय्यक गट ब अराजपत्रीत [ मुख्य परीक्षा अभ्यासक्रम ]

परीक्षा योजना :
  • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहूपर्यायी
  • एकूण गुण – २०० गुण
  • प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन
  • पेपर १ – मराठी व इंग्रजी [ मराठी ६० गुण व इंग्रजी ४० गुण ], दर्जा मराठी बारावी, इंग्रजी – पदवी, माध्यम इंग्रजी – मराठी, एक तास
  • पेपर २ – सामान्य ज्ञान व बुद्धिमापन विषयाचे ज्ञान, एकूण गुण १००, प्रश्नसंख्या १००, दर्जा पदवी, माध्यम मराठी, कालावधी १ तास
अभ्यासक्रम – पेपर १ – मराठी व इंग्रजी :
  • मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
  • इंग्रजी – Common Vocabulary, Sentensce Structure, Grammar, use of idoms and phreses and their meaning and comprehension of passage.
अभ्यासक्रम – पेपर २ – सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता :
चालू घडामोडी – भारत व जग यांचा संपूर्ण अभ्यास करावा.
बुद्धिमापन व बुद्धिमत्ता – सर्व प्रकरचे प्रश्न.
महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल व त्याचे विभाग, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खजिने, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या व त्याचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, व राष्ट्रीय चळवळी.
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये,राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, व मंत्रिमंडळ, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा विधानपरिषद व त्याचे सदस्य अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या.
माहिती अधिकार अधिनियम – २००५ :
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनाचा संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व संबंधित कायदे व केस स्टडीज, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानांचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी.
  • राजकीय यंत्रणा [ शासनाची रचना अधिकार व कार्ये ] – केंद्र सरकार केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्यसरकार व प्रशासन [ महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन.
  • न्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडल रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.