Mineral wealth खनिज संपत्ती maharashtra

महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात. देशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – ३.३%, महाराष्ट्रात ३८,००० चौ.कि.मी. (१३.३७%) क्षेत्रात खनिजे सापडतात.

  • महाराष्ट्रात देशाच्या ५०% बॉक्साईट साठे, व २१% उत्पादन होते. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा इ. ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत.
  • देशातील मँगनिज (मंगल) च्या साठ्यांपैकी ४०% साठे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात तुसर, बुझुरग व चिखलगाव (भंडारा), सावनेर व रामटेक (नागपूर), सावंतवाडी, व वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. महाराष्ट्रात देउळगाव (गडचिरोली), चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी व रेडी (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. रेडी या बंदरातून लोह खनिज निर्यात केले जाते.

खनिज संपत्ती बद्दल माहिती :

  • देशाच्या ४% कोळसा महाराष्ट्रात सापडतो. हे साठे वर्धा वैनगंगेच्या खो-यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे साठे – बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत. तसेच कामठी व उम्रेड (नागपूर), वणी (यवंतमाळ), गडचिरोली जिल्ह्यातही कोळसा सापडतो.
  • कायनाईटचे १५% साठे महाराष्ट्रात आह्ते. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात देहगाव, पिंपळगांव, मोगरा, मीरगा इ. तसेच गार्काभोंगा तालुक्यात कयनाईट व सिलिमिनाईटचे साठे आहेत.
  • कायनाईटचे उपयोग हि-यांना पैलू पाडणे, काच, रसायन उद्योगात होते.
  • भारताच्या ९% चुनखडीचे साठे व २% उत्पादन महाराष्ट्रात होते. यवतमाळ जिल्ह्यात मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकवटन येथे चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. तसेच चंद्रपुर, अहमदनगर व गड्चोरोली येथेही साठे सापडतात.
  • महाराष्ट्रातील मँगनिज शुध्दीकरण प्रकल्प – तुसर (भंडारा) व कन्हान (नागपूर) येथे आहेत.
  • हिरव्या अभ्रकात सिलियम भंडारा जिल्ह्यात सापडते.
  • देशातील क्रोमाईटच्या साठ्यांपैकी १०% साठा महाराष्ट्रात असुन प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात साठे आहेत. टाका (नागपूर), मौली (भंडारा), कनकवली, जानोली (सिंधुदुर्ग), क्रोमाईटचा उपयोग धातू उद्योगात किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो.

Maharashtratil Khanij Samptti mahiti

खनिजउत्पादक जिल्हेखनिजउत्पादक जिल्हे
चुनखडीयवतमाळकायनाईटदेहगाव (भंडारा)
तांबेचंद्रपूरबरायटीसकोल्हापुर, रत्नागिरी
शिसे, जस्त, गंलियमनागपूरगारहोटी व सिलिकासिंधुदुर्ग
ग्राफाईटसिंधुदुर्गक्वॉर्टझाईटभंडारा
क्लोराईटचंद्रपूरव्हँनेडियमभंडारा, गोंदिया
चिनीमातीरत्नागिरीसिझियमभंडारा, गोंदिया
जिप्समसिंधुदुर्ग, अहमदनगरअँसबेस्टॉसअहमदनगर
संगमरवरअमरावती, नागपूररसायने निर्मातीअंबरनाथ
नैसर्गिक वायुउरणबॉक्साईटकोल्हापुर
कोळसाचंद्रपूर, नागपुरलोहचंद्रपुर, गडचिरोली
खनिज तेलरत्नागिरी, बॉम्बेहायक्रोमाईटभंडारा, सिधुदुर्ग
भट्टीचीमातीसिधुदुर्गभांड्यांची मातीचंद्रपूर, नागपुर
डोलोमाईटचंद्रपुर, यवतमाळक्रोमाईटभंडारा, सिधुदुर्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here