पविञ पोर्टल वर शिक्षक भरतीचा अर्ज कसा भरावा ?

पविञ पोर्टल वर Registration प्रकिया कशी करावी ?

सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra या वेबसाईड ला भेट दया त्यांनतर आपणास तेथे पविञ नावाचे पोर्टल दिसेन तेथे click करा.

mpsc%2Bkida%2B123

यानंतर registration वर click केल्यावर आपणास registration नावाचा फार्म दिसेन.
यात आपणास user id आपल्याला हवा असलेला टाका आपल्याला हवा असलेला password तयार करा तोच password conform करा.

यापुढे आपणास चालु मोबाईल नंबर टाका तो टाकल्यासवर आपणास त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईन तो टाका captacha टाकून registration वर शेवटी click करा अशा प्रकारे आपली registration प्रकिया पूर्ण होईन आता आपण सदर पोर्टलचे सभासद झाले आहात.

Screenshot 2018 7 7%2BSchool%2BEducation%2Band%2BSports%2BDepartment

पविञ पोर्टल वर आ‍ॅनलाईन अर्ज नोंदणी कशी करावी ?

आपण आता registration केले आहे आता आपण जर शिक्षक अभियोग्यता परिक्षा उत्तीर्ण असाल तरच आपण पविञ् पोर्टलवर अर्ज करु शकतात सदर प्रकिया पुढीलप्रमाणे
शासनाच्या https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/login या संकेतस्थळाला भेट दया यानंतर आपण पविञ पोर्टल ला click करा.
त्यानंतर आपण login details वर जा आपण registration करून जो user id व password तयार केला आहे तो टाकून applicant रोल select करून login करा.
केल्यानंतर आपणास सर्वप्रथम personal information भरायची आहे यात आपण स्वताचे /आईचे/ वडीलांचे नाव / जात प्रवर्ग/जन्मतारीख /education पाञता/ माध्यम/married status /अपत्य माहिती भरायची आहे.
तसेच आपण ज्या शैक्षणिक संस्थेसाठी / शाळेसाठी ( जि.प/ मनपा)अर्ज करणार आहे ते drop down box मधून सिलेक्ट करावे आपणास जास्तीत जास्त २० शाळा राज्यभरातील निवडण्याची संधी येथे उपलब्ध असणार आहे अशा पद्धतीने अर्ज भरून submit करावा.
महत्वाची सूचना : सदर अर्ज online सादर करताना कोणतीही चूक करू नये शासननिर्णय व माहितीपुस्तिका सविस्तर अभ्यासावी कारण येथे झालेली चुक आपणास कोणत्याही परिस्थितीत दुरूस्ती करता येणार नाही.

फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे ?

सरल प्रणालीत पविञ पोर्टलवर शासन निर्णय १२ डिसेंबर १७ नुसार काही कागदपत्रे आपणास attach करावी लागतील सदर कागदपञे आपण १५० kb पेक्षा कमी अशा पद्धतीने scan करून ठेवावी
१) शैक्षणिक प्रमाणपञ (१० वी /१२ वी)
२) व्यवसायीक प्रमाणपञ मान्यताप्राप्त संस्थेचे (डी.एड/ बी.एड)
३) शाळा सोडल्याचा दाखला
४) जात प्रमाणपञ व वैधता प्रमाणपञ
५) अधिवास/ डोमेसाईल
६) शिक्षक पाञता परिक्षा गुणपञक
७) महिलांना आरक्षणासाठी नाँन क्रिमिलेअर प्रमाणपञ (विवाहीत महिलांनी शक्यतो आपल्या माहेरच्या नावानेच सदर प्रमाणपञ काढावे व वडिलांचा उत्पन्न दाखला जोडावा जर शक्य नसेल तर आणि तरच आपले विवाह नोंदणी प्रमाणपञ जोडून पतीच्या नाव लावून नाँनक्रिमिलेअर certificate काढावे त्या करिता पतीचा उत्पन्न दाखला जोडावा.)
८) अपंग कर्मचारी आवश्यक ते प्रमाणपञ व वैधता
९) एम.एच.सी.आ.टी (MS-CIT) किंवा ट्रिपल CCC हे प्रमाणपञ आवश्य.
वरील सर्व कागदपञे scan करून ठेवावी तसेच सर्व मुळ कागदपञे निवड झाल्यानंतर पडताळणी कामी आवश्यक आहे
( संदर्भ शासन निर्णय १२/१२/२०१७ शालेय शिक्षण विभाग )
मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करताना काही अडथळे येत असतील तर आम्हाला Comment करा.