स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ?

कोणतीही परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी परीक्षेचे स्वरूप माहिती करूण घेणे आवश्यक आहे. परीक्षेचे स्वरूप कळल्यानंतर परीक्षे बद्दल ची प्रक्रिया आणि अभ्यास कसा करावा याचे अंदाज ठरविणे सोपे होते आणि त्या नंतरच अपल्याला योग्य वाटेल तसे अभ्यासाकरीत योजना तयार करूण  ध्येया कडे वाटचाल करावी. बरेचदा परीक्षाला न समझताच अभ्यास करणारे विद्यार्थी गोंधळुण जातात आणि वर्षांन वर्ष अभ्यास करूण ही अपयश येते. म्हणूनच आधी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रक्रिया इत्यादी गोष्टींला समझवुन घ्यावे.
आजच्या स्पर्धात्मक युगात सर्वांनलाच पुढे जायचे आहे. सर्वच जन अपअपल्या पध्दतीने धडपड़ करीत आहेत. त्या मध्ये स्पर्धात्मक परीक्षा म्हटले तर तुमच्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. असे मी का म्हणते आहे कारण स्पर्धात्मक परीक्षा तुमची योग्यता ठरविते आणि तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला योग्य करिअर उपल्बध करूण देण्याची संधी ही देते. परंतु कोण्त्याही विद्यार्थ्याने अपले करिअर बद्दल जागरूक असावे आणि घाई ना करता शांततेने अपले करिअर निवडावे, कोणी तरी सांगीतले आणि सर्वेच करतात म्हणून मी ही करेल असा विचार जर असेल तर कृपया स्पर्धात्मक परीक्षा नका देऊ , अश्याने आपलाच वेळ जायील. पण हो नक्कीच कोणाच्या प्रेरणेने जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेचा विचार केला आहे तर ते चुकीचे नाही. स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्हाला वेळेची जागरूकता ठेवत पुनर्नियोजित वाटचाल करणे हितावत ठरते.
स्पर्धापरीक्षांद्वारे मिळणार्या संधी आकर्षक असूनही आजही विद्यार्थ्यांचे या क्षेत्राकडे दुरलक्ष आहे. कारण आजही बहुतांश विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्राची माहिती नसते किवां योग्य असावी तसी माहिती नसते. तसेच परीक्षे बद्दल पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात बरेच गैरसमज असतात. बरेच क्षमता असणारे विद्यार्थी अशया गैरसमजांमुळे स्पर्धात्मक परीक्षा ह्या क्षेत्राचा विचारच करीत नाहीत, ते विसरतात की समाजाला गरज आहे सक्षम अधिकार्यांची, तर मित्रांनो समाजावर टिका करण्यापेक्षा स्वता बद्दल घडवा, जे तुमच्या हातात आहे आणि अपल्या संधीचा वापर करा आणि स्वता घडवुन दुसर्यांना घटविण्याचा मानस बाळगा.
येथे आपण एमपीएसी म्हणजे काय ? एमपीएससी द्वारे कोण कोणते पदे भरण्यात येतात ? एमपीएसी परीक्षा स्पर्धात्मक असते नेमके काय ? एसपीएसी परीक्षेचे स्वरूप वैशिष्टयै ? त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम ?या परीक्षेसाठी काय वाचायचे ? परीक्षेची तयारी केव्हापासून करायची ? या परीक्षेसाठी बुध्दीमता क्षमता ? ग्रामीण भागातील विद्यार्थी यश मिळवु शकतात का ? इंग्रजी भाषा आवश्यक आहे ? वेळ आणि अभ्यासाचे नियोजन कसे कारावे ? परीक्षेसाठी कोणते गुण वैशिष्टय लागते ? त्यासाठी कोणत्या प्रकाराचे व्यक्तिमत्व आवश्यक आहे ?
तर येथे आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएसी) द्वारे आयोजित केल्या जाणार्या स्पर्धात्मक परीक्षा व प्रशासकीय सेवांतील करिअर विषयी माहिती देणार आहोत.
आजच्या या स्पर्धात्मक जगात अपल्याला फक्त टिकायचेच नाही आहे तर खुप पुढे जाऊन एक निवन समाज घडवायचा आहे, बद्दल आपल्या हातात आहे फक्त हा बद्दल आणायचा ही इच्छा कधीच मरू नका देऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here