भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ असोसिएट पदांच्या ८१३४ जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ असोसिएट (ग्राहक समर्थन व विक्री) पदांच्या जागा आयबीपीएस मार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

State%2BBank%2Bof%2BIndia
कनिष्ठ असोसिएट पदांच्या ८१३४ जागा
भारतातील एकूण ८१३४ जागा पैकी महाराष्ट्रात एकूण ८६५ जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – दिनांक १ जानेवारी २०२० रोजी उमेदवाराचे वय २० वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेद्वारांना फीस नाही.)

परीक्षा – फेब्रुवारी/ मार्च २०२० मध्ये पूर्व परीक्षा आणि १९ एप्रिल २०२० मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

https://sbi.co.in/web/careers/current-openings

 

https://ibpsonline.ibps.in/sbijassdec19/