नदी प्रणाली – river system

 • महाराष्ट्रात प. घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी असे प्रकार पडतात.

१) पश्चिम वाहिनी – या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी-पूर्णानध्या खचदरीतून वाहत जातात.

अ) तापी – ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.

 • तापी व पूर्णा संगम – चंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे

ब) कोकणातील नद्या –

 • सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.
 • कोकणातील नद्यांची वैशिष्टये – वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.
 • कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी – उल्हास (१३० कि.मी.)
 • कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी – वैतरणा (१२४ कि.मी.)
 • उत्तर कोकणातील नद्या – दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास
 • मध्य कोकणातील नद्या – पाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.
 • दक्षिण कोकणातील नद्या – कजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल

२) पुर्व वाहिनी नद्या – या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
अ) गोदावरी खोरे – गोदावरी खो-याने देशाचे १०% व राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.
१) गोदावरी नदी – हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे. गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा ९ जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व ७ कि.मी. वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते.

उपनदीउगमगोदावरी बरोबर संगम
दारणाकळसूबाई शिखराजवळ (इगतपूरी)दारणा सांगवी
प्रवराभांदारद-याच्या ईशान्येसनेवाशाजवळ टोके
मुळाभंडारद-याच्या दक्षिणेलानेवाशाजवळ टोके
सिंदफणाबालाघाट डोंगर (बीड) माजलगाव
मांजरापाटोडा पठार (बालाघाट) बीडकुंडलवाडी (नांदेड) ७२४ कि.मी.
कादवातौला डोंगर (नाशिक)१२३१नांदूरमधमेश्वर
शिवनासुरपालनाथ (सातमाळा) औरंगाबादगंगापूरच्या अग्नेयेस
दुधनाचौक्याचा डोंगर (औरंगाबाद)संगम प्ररभणी जिल्हा
पूर्णाशिरसाळा (अजिंठा डोंगर)संगम प्ररभणी जिल्हा

गोदावरी उपनदी-प्राणहिता
पेनगंगा नदी वर्धा नदीस येऊन मिळाल्यानंतर वर्धा व वैनगंगेचा संगम होतो. या प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. प्राणहिता नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा जवळ गोदावरीला येऊन मिळते.

नदीलांबी(किमी)उगममिळते
वर्धा४५५बैतुल (सातपूडा / मध्यप्रदेश)वैनगंगेस
पेनगंगा७७६अजिंठा टेकड्याबल्लापूर (यवतमाळ) येथे वर्धेस येऊन मिळते.
वैनगंगा४६२भाकल-दरकेसा टेकड्या मैकल (मध्यप्रदेश), उपनद्या – कन्हान, पेंच, बागआष्टी जवळ वर्धा व वैनगंगा संगम होतो.
पेंचछिंदवाडा (मध्यप्रदेश)वैनगंगेस मिळते.
इंद्रावती५३१कलहंडी (मध्यप्रदेश)छत्तीसगढ – महाराष्ट्र सीमेवरून वाहते. भद्राचंल येथे गोदावरीस मिळते.

ब) भीमा खोरे – भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते. महाराष्ट्रात किचा प्रवाह ४५१ कि.मी. असून ती कर्नाटकात रायचुरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. किची एकूण लांबी ८६७ कि.मी. आहे. पंढरपूरजवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात. मुळा व मुठा या नद्यांचा संगम पुणे येथे होऊन त्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळतो. निरा नदी भोर जवळ उगम पावून भीमा नदीला येऊन मिळते. भीमेच्या प्रमुख उपनद्या उरवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.
क) कृष्णा नदी खोरे – कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रात २८२ कि.मी. चा प्रवास क्रुन ती आंध्रप्रदेशात जाते. तिची एकूण लांबी १२८० कि.मी. आहे.
कृष्णा नदीच्या उपनद्या व त्यांचा संगम

उपनदीउगमकृष्णेबरोबर संगम
वेण्णामहाबळेश्वरमाहुलीजवळ (सातारा)
कोयनामहाबळेश्वरप्रितीसंगम कराड (सातारा)
पंचगंगासह्याद्रीकुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त) मिळून नरसोबाची वाडी येथे कृष्णेस मिळते.
वारणाकोल्हापूरच्या ईशान्येस कोप-यात हरिपूर येथे कृष्णेस मिळते.
वेरळाब्रम्हनाळ (सांगली)
तुंगभद्राकर्नाटक संगमेश्वर (कर्नुल-कर्नाटक)
 • कोयना – कोयाना खो-यात राज्यातील सर्वाधिक जविद्युत निर्मिती होते. त्यामुळे कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात.
 • कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी व वशिष्ठी नदीत सोडतात.
 • महाराष्ट्रातील नद्यांची एकूण लांबी – ३२०० किमी.
 • महाराष्ट्रात नदी खोरे उतरता क्रम – १) गोदावरी २) भीमा ३) तापी ४) कृष्णा
 • महाराष्ट्रातील प्रवरा नदीतील धबधबा – रंध्रा फॉल्स ६० मी
 • महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा – गोंदिया
 • प्रमुख तलाव – ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा (चंद्रपुर), नवेगांव, बोदलकसा, चोरखमारा (गोंदिया),रामसागर (नागपूर), लोणार (बुलढाणा), अंबाझरी (नागपूर), आंध्रलेक (पुणे), धामापूर (रत्नागिरी),कळवण (पुणे), लेक बिले (अहमदनगर), व्हिक्टोरीया लेक (पुणे), सेवनी भंडारा
 • मुंबईस पाणीपुरवठा करणारे तलाव – भातसा, ताणसा, वैतरणा, पवई विहार (मुंबई)
नदीकाठावरील शहरेनदीकाठावरील शहरे
गोदावरीनाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगांव, राजमहेंद्रीपंचगंगाकोल्हापूर
कृष्णावाई, सागली, मिरज, औदुंबर, कराड, नरसोबाची वाडीइंद्रायणीदेहू व आळंदी (पुणे)
पांझराधुळेमौसममालेगांव
क-हाजेजुरीभीमापंढरपूर
सिनाअहमदनगरप्रवरानेवासे (संगमनेर)
 • महाराष्ट्रातून दोनदा वाहणा-या नद्या माजरा, तापी, गोदावरी
नदीउपनद्यानदीउपनद्या
तापीपुर्णा, गिरणाद.पुर्णादुधना, गिरजा
पुर्णामोर्णा, काटेपुर्णा,नळगंगाकृष्णाकोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा
गोदावरीदारणा, कादवा, प्रवरा, मांजरा, सिंदफना, दक्षिण-पुर्णा, प्राणहिता (वर्धा+वैनगंगा)भिमादुधनी, सिना, माण, निरा, धोंड, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, पवना, क-हा
वैनगंगाकन्हान, पेंच, वर्धा व पेनगंगा, सिंधफना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here