तंतू प्रकाशशास्त्र-(Optical Fiber)

तंतू प्रकाशशास्त्र-(Optical Fiber):
ऑप्टिकल फायबर म्हणजे अत्यंत शुद्ध काचेचा तंतू. या तंतूचा व्यास अतिशय लहान असतो. अशा १००० तंतूंच्या जुडग्याचा व्यास एका मिलिमीटरपेक्षाही कमी असतो. सर्वसाधारणपणे एखाद्या संदेशाचे वहन करण्यासाठी त्याचे रूपांतर इलेक्ट्रिकल इम्पल्सेसमध्ये करून ते तांब्याच्या तारांमधून वहन केले जाते, जेव्हा अशा संदेशांचे रूपांतर प्रकाशलहरींमध्ये करून त्यांचे वहन काच किंवा प्लॅस्टिकच्या तंतूंमधून केले जाते, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला तंतू प्रकाशशास्त्र असे म्हणतात. प्रकाशीय तंतूंमधून प्रकाशाचे वहन संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्त्वांच्या आधारे होते. परंपरागत संदेशवहन व्यवस्थेपेक्षा फायबर ऑप्टिकल्सचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हे तंतू केसाच्या आकाराचे असल्याने एका
केबलमध्ये हजारो तंतू बसवता येतात व अनेक पटींनी माहिती साठवता येते. यात विद्युत चुंबकीय कोणताही व्यत्यय येत नाही.

व्यावहारिक उपयोग :
१) दूरसंचार क्षेत्र- फायबर ऑप्टिकल्समुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. टेलिफोन, टेलिव्हिजन, इंटरनेट इ.मध्ये याचा वापर केला जातो. वैद्यकशास्त्रात- फायबर ऑप्टिकल्समुळे शरीराच्या आतील भागाचे फोटो घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे रोगाचे निदान करून उपचार करणे शक्य झाले आहे. आधुनिक एन्डोस्कोप ही ऑप्टिकल फायबरची किमया आहे.

२)लेझर तंत्रज्ञान- १६ मे १९६० रोजी अमेरिकन शास्त्रज्ञ थिऑडोर हेरॉल्ड मॅमन यांनी सर्वप्रथम लेझर शलाका बनवली व तिचा पहिला प्रयोग १९६१मध्ये करण्यात आला. लेझर म्हणजे Light Amplification by stimulated Emission of Radiation. लेझर हे असे साधन असते की ज्यातून एकच वारंवारिता व तरंगलांबी असलेला प्रकाशाचा प्रखर आणि एकाच दिशेने जाणारा झोत निर्माण होतो. सामान्य प्रकाश हा विस्कळीत स्वरूपाचा असल्याने त्यातील ऊर्जा एकत्रितपणे राहू शकत नाही, मात्र लेझर हा एकत्रित व विवíतत प्रकाश असल्याने त्यातील ऊर्जेचा ऱ्हास होत नाही.

उपयोग-:

 1. वैद्यकशास्त्रात- शरीराच्या खोलवर असलेल्या गाठी नष्ट करण्यासाठी, हृदयासंबंधी काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी.
 2. संरक्षण- शस्त्रास्त्रांमध्ये वापर, उदा., शत्रूचे रणगाडे शोधून काढण्यासाठी, त्यांचे अंतर मोजण्यासाठी इ.
 3. पिंट्रिंग- लेझर कॉम्प्युटर िपट्रर्समध्ये लेझरचा वापर करतात.
 4. बार कोड- वस्तूंवरील त्यांच्या किमतीचे बार कोड वाचण्यासाठी लेझर स्कॅनर्सचा वापर करतात.
 5. बांधकाम क्षेत्रात- बांधकाम क्षेत्रात बोगदे, रेल्वेचे रूळ सरळ रेषेत आहेत किंवा नाही हे शोधण्यासाठी.

मीडिया लॅब एशिया :

सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे व या तंत्रज्ञानाचा लाभ या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने या प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्पासाठी मुंबई, चेन्नई, कानपूर, दिल्ली व खडगपूर या आयआयटीचे सहकार्य घेण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा लाभजनसामान्यांना व्हावा यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून या प्रकल्पात विविध प्रकल्प आखण्यात आले आहेत. या प्रकल्पात १) आरोग्य सेवा, २) शिक्षण, ३) अपंगांचे सबलीकरण, ४) ग्रामीण भागात उपजीविकेची निर्मिती, ५) ग्रामीण भागात दळणवळणाची साधने उपलब्ध करणे या क्षेत्रांवर भर देण्याचा प्रयत्न आहे.

सायबर गुन्हे :

 1. हॅकिंग- यामध्ये संगणक सयंत्रणेची अथवा वेबसाइटची सुरक्षा भेदली जाते व त्यामधील माहिती बदलली किंवा चोरली जाते, तसेच संगणक प्रणालीमध्ये बिघाड केला जातो. अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना हॅकर्स असे म्हटले जाते.
 2. फिशिंग- यामध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे आकर्षक मेल पाठवले जातात. या मेलला उत्तर देताना कधीकधी चुकीने किंवा हलगर्जीपणामुळे बँक खाते नंबर, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती मिळवून फसवणूक केली जाते.
 3. ३) स्किमिंग – यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्डमध्ये असलेल्या मायक्रोचिप (चुंबकीय पट्टी) मधील माहिती चोरून आíथक गुन्हे केले जातात.
 4. ४) सायबर स्टॉकिंग- यामध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या देऊन त्रास दिला जातो.

सोशल नेटवर्किंग :

सोशल नेटवर्किंग ही इंटरनेटने समाजाला दिलेली एक अद्भुत अशी देणगी आहे. या पृथ्वीतलावर जे जे विषय चच्रेला येऊ शकतात त्या सगळय़ावर इंटरनेटच्या माध्यमातून चर्चा करणे म्हणजेच सोशल नेटवर्किंग होय. सोशल नेटवर्किंग वेब साइट्सच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला अनेकांशी संपर्क साधून खऱ्या अर्थाने ग्लोबल होता येते. यामुळे विचारांची, माहितीची देवाणघेवाण होते. शिवाय जगाच्या कानाकोपऱ्यात आपण कोठेही संपर्क साधू शकतो. सध्या ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर या सर्वात लोकप्रिय अशा सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत.

 1. फेसबुक- सुरुवात ४ फेब्रुवारी २००४, संस्थापक- मार्क झुकरबर्ग, मुख्यालय- कॅलिफॉíनया (अमेरिका)
 2. लिंकेडिन- सुरुवात ५ मे २००३, संस्थापक- रिड हॉफमन, मुख्यालय- कॅलिफॉíनया (अमेरिका)
 3. ट्विटर- सुरुवात १५ जुलै २००६, संस्थापक- जॅक डॉरसी, नोह ग्लास, इव्हॉन विल्यम, बिझ स्टोन, मुख्यालय- सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका)
 4. ऑर्कुट- सुरुवात २४ जानेवारी २००४, संस्थापक- ऑर्कुट बुयुकोकतेन,मुख्यालय- कॅलिफॉर्निया (अमेरिका). images%2B%25285%2529

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here