मराठी व्याकरण काळाचे प्रकार | Types of times in marathi

मराठी भाषेत प्रमुख तीन काळ आहेत.

 

१) वर्तमानकाळ       २) भूतकाळ        ३) भविष्यकाळ

खालील वाक्यातील अधोरेखित क्रियापदाकडे नीट लक्ष द्या :
१) यज्ञेश व्याकरण शिकतो – वर्तमानकाळ
२) यज्ञेश व्याकरण शिकला – भूतकाळ
३) यज्ञेश व्याकरण शिकेल – भविष्यकाळ

MPSC English Grammar Free Mock Test -1
 https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-english-grammar-mock-test-1.html

मराठी व्याकरण ॅनलाईन Free Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/marathi-Vyakran-mock-test-1.html 

मराठी व्याकरण ॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html

MPSC Combine Sarav Paper Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-combine-sarav-paper-1.html

वरील वाक्यात अनुक्रमाने –
१) क्रिया आता घडत आहे, हे कळते.
२) क्रिया पूर्वी होऊन गेल्याचे कळते.
३) क्रिया पुढे घडणार आहे, हे कळते.

क्रियापदांच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते, याचा जो बोध होतो, त्याला काळ म्हणतात.

(१) वर्तमानकाळ   
जेव्हा क्रियापदांच्या रूपावरून क्रिया आता म्हणजे वर्तमानात घडते, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमानकाळ असतो.
उदा. (१) यज्ञेश व्याकरण शिकतो.- वर्तमानकाळ
(२) गाय चारा खाते. – वर्तमानकाळ
(३) मी अभ्यास करतो. – वर्तमानकाळ
(४) ओजस्वी केळी खाते.- वर्तमानकाळ
(५) गडाचा दरवाजा बंद होणार आहे.- वर्तमानकाळ
(६) गडाखाली एक छोटे गाव आहे.- वर्तमानकाळ
(७) रायगडावर मोठा समारंभ आहे.- वर्तमानकाळ
(८) हिरा दुध विकायला निघाली.- वर्तमानकाळ
(९) प्रवासखर्च घेण्यासाठी गर्दी केली.- वर्तमानकाळ
(१०) कर्मण्य दररोज अभ्यास करतो.- वर्तमानकाळ
(११) राजेश शहरात गेला.- वर्तमानकाळ
(१२) कुमारने गोष्ट सांगितली.- वर्तमानकाळ
(१३) मुले सहलीला निघाली.- वर्तमानकाळ
(१४) पौर्णिमा पुस्तक वाचत आहे.- वर्तमानकाळ
(१५) मी उपाशीपोटी वाचत बसलो.- वर्तमानकाळ
(१६) विजया पुस्तक वाचत आहे.- वर्तमानकाळ
(१७) शितल गाणे गाते.- वर्तमानकाळ
(१८) गुड्डूमामा दूरदर्शनवरील बातम्या ऐकत आहे.- वर्तमानकाळ
(१९) मारुती खो-खो खेळून राहिला.- वर्तमानकाळ
(२०) शाम शाळेत गेला.-  वर्तमानकाळ
शिकतो, खाते, करतो, या क्रियापदांच्या रुपांवरून क्रिया आता घडते, असा बोध होतो; म्हणून ‘शिकतो, खातो, करतो’ ही वर्तमानकाळाची क्रियापदे आहेत.
लक्षात ठेवा : ज्या क्रिया कायमस्वरूपी असतात, तसेच जी त्रिकालाबाधित सत्ये आहेत, त्यांच्या बाबतीत वर्तमानकाळी क्रियापदे वापरतात .
उदा. (१) मी सकाळी लवकर उठतो.     (नेहेमीची क्रिया)
(२) जानेवारीत संक्रांत येते.        (कायमस्वरूपी क्रिया)
(३) सूर्य पूर्वेला उगवतो.            (सातत्याची क्रिया)
(४) पृथ्वी सूर्याभोवती फिरते.      (त्रिकालबाधित सत्य)

loading…

(२) भूतकाळ
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाच्या भूतकाळ असतो.
उदा. (१) यज्ञेश व्याकरण शिकला. – भूतकाळ
(२) गाईने चारा खाल्ला. – भूतकाळ
(३) मी अभ्यास केला. – भूतकाळ
(४) ओजस्वी केळी खात होता.- भूतकाळ
(५) गडाचा दरवाजा बंद झाला होता.- भूतकाळ
(६) गडाखाली एक छोटे गाव होते.- भूतकाळ
(७) रायगडावर मोठा समारंभ होता.- भूतकाळ
(८) हिरा दुध विकायला निघाली होती.- भूतकाळ
(९) प्रवासखर्च घेण्यासाठी गर्दी झाली होती.- भूतकाळ
(१०) कर्मण्य दररोज अभ्यास करत होता.- भूतकाळ
(११) राजेश शहरात गेला होता.- भूतकाळ
(१२) कुमारने गोष्ट सांगितली होती.- भूतकाळ
(१३) मुले सहलीला निघाली होती.- भूतकाळ
(१४) पौर्णिमा पुस्तक वाचत होती.- भूतकाळ
(१५) मी उपाशीपोटी वाचत बसलो होतो.- भूतकाळ
(१६) विजया पुस्तक वाचत होती.- भूतकाळ
(१७) शितलने गाणे गाईले होते.- भूतकाळ
(१८) गुड्डूमामा दूरदर्शनवरील बातम्या ऐकत होते.- भूतकाळ
(१९) मारुती खो-खो खेळत होता.- भूतकाळ
(२०) शाम शाळेत गेला होता.- भूतकाळ
‘शिकला, खाल्ला, केला’ या क्रियापदांच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली, असा बोध होतो; म्हणून ‘ शिकला, खाल्ला, केला’ हि भूतकाळी क्रियापदे आहेत.

(३) भविष्यकाळ
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाच्या भविष्यकाळ असतो.
उदा. (१) यज्ञेश व्याकरण शिकेल.- भविष्यकाळ
(२) गाय चारा खाईल.- भविष्यकाळ
(३) मी अभ्यास करीन.- भविष्यकाळ
(४) ओजस्वी केळी खाणार.- भविष्यकाळ
(५) गडाचा दरवाजा बंद होणार.- भविष्यकाळ
(६) गडाखाली एक छोटे गाव होणार.- भविष्यकाळ
(७) रायगडावर मोठा समारंभ होणार.- भविष्यकाळ
(८) हिरा दुध विकायला निघणार.- भविष्यकाळ
(९) प्रवासखर्च घेण्यासाठी गर्दी होणार.-  भविष्यकाळ
(१०) कर्मण्य दररोज अभ्यास करणार.- भविष्यकाळ
(११) राजेश शहरात जाणार.- भविष्यकाळ
(१२) कुमार गोष्ट सांगणार.- भविष्यकाळ
(१३) मुले सहलीला निघणार.- भविष्यकाळ
(१४) पौर्णिमा पुस्तक वाचणार.- भविष्यकाळ
(१५) मी उपाशीपोटी वाचत बसणार.- भविष्यकाळ
(१६) विजया पुस्तक वाचणार.- भविष्यकाळ
(१७) शितल गाणे गाणार.- भविष्यकाळ
(१८) गुड्डूमामा दूरदर्शनवरील बातम्या ऐकणार.- भविष्यकाळ
(१९) मारुती खो-खो खेळणार.- भविष्यकाळ
(२०) शाम शाळेत जाणार.- भविष्यकाळयास करीन. – भविष्यकाळ

‘शिकेल, खाईल, करीन ‘ या क्रियापदांच्या रुपांवरून क्रिया पुढे घडेल, असा बोध होतो; ‘शिकेल, खाईल, करीन’ ही भविष्यकाळी क्रियापदे आहेत.
लक्षात ठेवा :

वर्तमानकाळ :                        भूतकाळ :                             भविष्यकाळ :
यज्ञेश व्याकरण शिकतो.   यज्ञेश व्याकरण शिकला.   यज्ञेश व्याकरण शिकेल.
गाय चारा खाते.                 गाईने चारा खाल्ला.            गाय चारा खाईल.
मी अभ्यास करतो.            मी अभ्यास केला.                मी अभ्यास करीन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here