बीड पूर्व अंबाजोगाई व परळी शहरातील अंगणवाडी मदतनीस भरती

महाराष्ट्र शासन बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) बीड पूर्व अंबाजोगाई व परळी शहरातील अंगणवाडी मदतनीस मानधनी पदासाठी जाहिरात क्रं.०१/२०२३

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) बीड पूर्व या प्रकल्पातील अंबाजोगाई-०८ व परळी शहर ५१ नगरपरिषद हद्दीतील रिक्त एकूण ५९ (अंबाजोगाई-०८ पैकी ०४, ५१ पैकी परळी-२३ उर्दु भाषा लिहीता व बोलता येणारे उमदेवारातून भरण्यात येतील.) अंगणवाडी मदतनीस पदाची मानधनी तत्वावर भरती अंबाजोगाई करावयाची आहे. त्यासाठी अंबाजोगाई व परळी शहर हद्दीतील स्थानिक रहिवाशी असलेल्या, शैक्षणिक अर्हता व इतर अटीची पूर्तता करणा-या पात्र महिला उमदेवाराकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अंबाजोगाई व परळी शहर हद्दी बाहेरील महिला उमदेवारांनी अर्ज करु नयेत. (केलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही) तसेच अपात्र उमेदवाराचे अर्ज नाकारण्यात येतील त्या बाबत त्यांना कोणतेही लेखी स्वरुपात कळविण्यात येणार नाही.

पात्रता – १२ वी  उत्तीर्ण, स्थानिक रहवाशी वय १८ ते ३५ वर्षे ( विधवा उमेदवार बयोमर्यादा १८
ते ४० वर्षे.) जाहिरात प्रसिध्दी / नोटीस बोर्डवर डकविण्याचा दिनांक २६.०७.२०२३

अर्ज मिळण्याचा व जमा करण्याचा कालावधी – दि.३१.०७.२०२३ ते दि. ११.०८.२०२३
(सकाळी ११.ते साय, ५. वाजेपर्यंत शासकीय सुट्टी बगळून तसेच पोष्टाने अथबा कुरिअर व्दारे
पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.)

अर्ज करण्याच्या पत्ता : ⇓⇓⇓

अर्ज मिळण्याचे व जमा करण्याचे ठिकाण- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) बीड
पूर्व, अंबाजोगाई सावरकर चौक, प्रशांतनगर, सहकार भवन तिसरा मजला अंबाजोगाई जि. बीड-
४३१५१७

टिप – अर्जाचा नमुना व अटी /शर्ती कार्यालयाचे नोटीस बोर्डबर डकविण्यात आलेला आहे.

 

ठिकाण -अंबाजोगाई
दिनांक-२६/०७/२०२३

स्वाक्षरीत /-

( रामेश्वर एस. मुंडे )

बाल विकास प्रकल्प अधिकारी,

नागरी प्रकल्प बीड पूर्व, अंबाजोगाई

संमा/औ/जाहिरात/ ८५ /२०२३-२४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here