एमपीएससी परिक्षेच्या काळात नियोजन कसे करावे ?

एमपीएससी परिक्षा देताना याचे नियोजन करणे फार गरजेचे असते कारण त्यामुळे अपले वेळ वाचते. वेळेला तुम्हाला तर माहितच आहे तर चला मग बघुया कसे नियोजन करावे ते, उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी.

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नसंख्या, अवघड आणि सोप्या प्रश्नांचे प्रमाण आणि ते सोडविण्यासाठी मिळणारा वेळ यांची सांगड घालून वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
आयोगाच्या उत्तरपत्रिका या OMR  शीट असल्याने खाडाखेड, फाटणे, चुरगळणे, घाण होणे अशा गोष्टीमुळे तपासल्याच जात नाहीत त्यामुळे ती हाताळताना, यामध्ये माहिती भरताना आणि उत्तरे नोंदवताना करताना विशेष काळजी घ्यायला हवी. त्यामुळे पुढील बाबी गांर्भीयाने लक्षात घ्याव्यात.
  • उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी.
  • बॉक्समध्ये लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील माìकग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.
  • पेपर १ मध्ये १२० मिनिटांत १०० प्रश्न सोडवायचे आहेत. तर पेपर २ मध्ये १२० मिनिटांत ८० प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि OMR शीटची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.
  • सगळी प्रश्नपत्रिका वाचत बसू नये. हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करा. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून त्याच्या उत्तराला खूण करत पुढे जायचे.
  • एखाद्या प्रश्नाबाबत गोंधळ असेल, अवघड वाटला असेल तर त्या प्रश्नाच्या क्रमांकाला प्रश्नपत्रिकेमध्ये खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडवायचा पहिला राऊंड संपवावा. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांचे उत्तरपत्रिकेत मार्किंग करून घ्यावे किंवा प्रश्न सोडवतानाच उत्तरपत्रिकेमध्ये मार्किंग केले तरी हरकत नाही. पण त्यावेळी आपण सोडून दिलेल्या प्रश्नासमोर मार्किंग करत नाही ना, योग्य प्रश्नक्रमांक समोरच करत आहोत ना हे काळजीपूर्वक पहावे.
  • आता दुसरा राऊंड. अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करायचा. आधीच अशा खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.
  • थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवावा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या एका सव्‍‌र्हेमधून ही गोष्ट समोरी आली आहे, की उमेदवाराला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटलेले असते तेच उत्तर बहुतेक वेळा बरोबर बसते.
  • सी सॅटमधील प्रसंगाधारित प्रश्न पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की, शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर मग मनावरचा ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे.
  • अवघड वाटणारे प्रश्न सगळयात शेवटी सोडवायचा प्रयत्न करावा पण जोपर्यंत आपण शोधलेले उत्तर बरोबर आहे याची खात्री वाटत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिकेत त्याची नोंद करू नये. अनोळखी वाटणाऱ्या प्रश्नांना हातच लावायचा नाही. अन्यथा नकारात्मक गुणांची पेनल्टी महागात पडू शकते.
  • प्रश्न वाचल्यानंतर उत्तर आठवले हे तथ्यात्मक (factual) प्रश्नाबाबत ठीक आहे. पण बहुविधानी प्रश्न मूलभूत तपशील विचारणारे  (concept based) असतात. त्यामुळे असे प्रश्न व्यवस्थित समजून घेऊनच उत्तरांचे पर्याय वाचावेत. किमान दोन वेळा प्रश्न वाचला जावा व तितक्याच दक्षतेने उत्तरांचे पर्याय वाचून मगच उत्तर मार्क करावे.
  • एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीएससीच्या उत्तरपत्रिका या non-leaded OMR sheet स्वरूपाच्या असतात.  यांच्यावर बॉलपेनने मार्किंग करायचे असते. त्यामुळे ते काळजीपूर्वक करायला हवे.

एमपीएससी परिक्षेच्या काळात उत्तरपत्रिकेची काळजी कशी घ्यायची ?

उत्तरपत्रिकेच्या ओएमआर शीटवर तुम्ही रंगवलेले गोळे तुमचे भविष्य ठरवतात. म्हणूनच या शीटवर काम करताना अत्यंत काळजी घ्यायला हवी. १२० मिनिटांच्या परीक्षेत १०० गोळे रंगवायला किमान १५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण फक्त एका प्रश्नाचा क्रम चुकला की, त्यापुढच्या सगळाच क्रम चुकलेला असतो आणि परिणामी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न फसलेला असतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर शेवटी एकाच वेळी नोंद करा, यातला पर्याय तुम्ही, तुमच्या सोयीने निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे.