चालू घडामोडी – आंध्रप्रदेश राज्यासाठी अमरावती शहरात उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन

 

ई-वाणिज्य क्षेत्राबाबत ‘थेट परकीय गुंतवणूक (FDI) संबंधी धोरण-2017’

◆ 2017 सालच्या ई-वाणिज्य क्षेत्राबाबत थेट परकीय गुंतवणूक (FDI) संबंधी धोरणाविषयीच्या मार्गदर्शकांचे पुनरावलोकन केले आहे. देशांतर्गत व्यवसायांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या हेतूने हे धोरण तयार करण्यात आले आहे.
◆ धोरण बिजनेस-टू-बिजनेस (B2B) ई-वाणिज्य क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणूक (FDI) करण्याची परवानगी देते.
★ काही मुख्य मार्गदर्शके पुढीलप्रमाणे आहेत –
◆ ई-वाणिज्य कंपन्यांना ज्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे, अशा कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यास बंदी आहे.
◆ ई-वाणिज्य कंपन्यांना उत्पादनांच्या विशेष विक्रीसाठी कोणताही करार करण्यास परवानगी नाही.
◆ बाजारपेठेमधील समूह कंपन्यांद्वारे खरेदीदारांना दिली जाणारी कॅश बॅक सुविधा योग्य आणि भेदभाव-हीन असावी.
◆ ई-वाणिज्य कंपन्यांकडून प्रदान केल्या जाणार्या बाजारपेठेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वस्तूच्या किंवा सेवेच्या विक्री किंमतीवर प्रभाव पडणार नाही आणि व्यवसायिकता राखली जाईल.

आंध्रप्रदेशातल्या अमरावती येथे नवीन उच्च न्यायालयास मंजुरी

◆ आंध्रप्रदेश राज्यासाठी अमरावती शहरात उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन केले गेले आहे आणि त्याच्या कामकाजास दि.1 जानेवारी 2019 पासून सुरूवात केली जाणार आहे.
◆ या नवीन उच्च न्यायालयाच्या निर्मितीसह आता देशात 25 उच्च न्यायालये आहेत. दि.2 जून 2014 रोजी राज्य विभाजीत झाल्यापासून, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोघांसाठी हैदराबाद शहरात एकच उच्च न्यायालय होते.
◆ राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘अमरावती उच्च न्यायालय’ याच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. रमेश रंगनाथन यांची नेमणूक केली आहे.
◆ न्या. रमेश रंगनाथन सध्या उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. याशिवाय 15 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सी.ए.कुट्टप्पा:- मुष्टियुद्ध क्रिडाप्रकाराचे भारताचे मुख्य प्रशिक्षक

◆ द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सी. ए. कुट्टप्पा (मुष्टियोद्धा) यांची भारताच्या मुख्य मुष्टियुद्ध प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
◆ कुट्टप्पा यांनी 10 डिसेंबरपासून चालू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात आपले प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
◆ निवृत्त झालेल्या जेष्ठ प्रशिक्षक एस. आर. सिंग यांच्याजागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ 39 वर्षीय कुट्टप्पा यांनी विजेंदर सिंग, एम. सुरनजॉय अश्या देशाच्या काही यशस्वी मुष्टियोद्धांना प्रशिक्षण दिलेले आहे.
◆ कर्नाटक राज्याचे कुट्टप्पा हे माजी राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक विजेते आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगचा ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

◆ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’ यामध्ये समावेश करण्यात आला.
◆ यासह हा सन्मान लाभणार्या 25 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये रिकी पाँटिंगचा समावेश झाला आहे.जॉइन करा टार्गेट एमपीएससी एमएच.
◆ ICC हॉल ऑफ फेमचा मानकरी व माजी सहकारी ग्लेन मॅकग्राने पाँटिंगला याबाबतची मानाची टोपी प्रदान केली.
◆ मेलबर्नमध्ये चालू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसर्या कसोटी सामन्यादरम्यान हा सोहळा संपन्न झाला.
◆ जुलैमध्ये भारताचा राहुल द्रविड (माजी कर्णधार) व इंग्लंडची क्लेरे टेलर (महिला क्रिकेटपटू-यष्टीरक्षक) यांना ICC वार्षिक समारंभात ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’ सन्मान जाहीर केला गेला.
◆ रिकी पाँटिंग तीनदा ICC विश्वचषक जेतेपदाचा साक्षीदार ठरला असून, त्यापैकी दोनदा ते स्वतः कर्णधार होते.
◆ पाँटिंगने 2012 साली निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी 168 कसोटी सामन्यांमध्ये 41 शतकांसह 13,378 धावा तर 375 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30 शतकांसह 13,704 धावांचे योगदान दिले आहे.