अभ्यासाचे मुलभूत सिद्धांत

सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या.

 1. अभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा.
 2. मोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू नका, तर निर्धारित कालावधीत नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा.
 3. विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून निरीक्षणात्मक अभ्यास पद्धत स्विकारा.
 4. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ एकाच विषयाचे विशेतज्ञ असण्याचा काळ इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छीना-यांनी बहुश्रुत असण्यासोबतच विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभावाची मनोवृत्ती विकसित करावी.
 5. सध्याच्या परीक्षेच्या स्वरुपात आंतरविद्याशाखीय आणि गतिशील झाले असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्याकडे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभाव सुसंगत असणे गरजेचे असल्याची बाब लक्षात ठेवा.
 6. कोणत्या माध्यमातून शिकलात याचा न्यूनगंड ठेवू नका.
 7. चौफेर नजर ठेवत वर्षभरात घडणाऱ्या घटना घडामोडी अचूक पणे टिपा आणि त्या घटनांचा अभ्यास करत विश्लेषनात्मक दृष्टी विकसित करा.
 8. गुणवत्तापूर्ण संदर्भ साहित्याची निवड करा
एन.सी.ई.आर.टी. ची क्रमिक पुस्तके वाचून झाल्यावर पुढील टप्प्यावर त्या विषयावरील संदर्भसाहित्याचे वाचन करावे.अस्सल संदर्भांग्रंथाची निवड करावी.
अस्सल संदर्भसाहित्यामध्ये —-
विषयांची संकल्पनात्मक मांडणी
विस्तारित दृष्टीकोन
विश्लेषण आणि
विषयांच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्याच्या समकालीन संदर्भाची चर्चा केलेली असते.

शिकवणी वर्गाच्या गाईड्सचा उपयोग मर्यादीत प्रमाणात करावा.
 • वेळेचे व्यवस्थापन करा :

मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किती विषय आहेत ते जाणून घ्या.
कोणत्या विषयाला किती वेळ देण्याची गरज आहे ? ते ठरवा.
राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था नीती आणि प्रशासन हे घटक मोठे आहेत यांच्यासाठी पुरेसा वेळ द्या.
पुस्तकाच्या अनावश्यक भागाचे अध्ययन टाळा. वेळ वाचतो.
पुस्तकातील कोणता भाग घ्यायचा व कोणता भाग सोडायचा याबाबत संपादकीय दृष्टी आत्मसात करा.
लेखनाच्या सरावास योग्य वेळ द्या. लेखनात नेमकेपणा आणि प्रभावीपणा आणा.
 • अभ्यासाचे नियोजन :

अभ्यासाचे दीर्घकालीन नियोजन करा.
दीर्घकालीन नोयोजन करताना प्रत्येक टप्यावरचे सूक्ष्म नियोजन तयार करा.
जास्त संदर्भग्रंथ वाचण्यापेक्षा प्रत्येक घटकावर एक – दोन संदर्भग्रंथांचे वाचन करावे.
 • मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण :

एखादा घटक वाचण्यापूर्वी त्या घटकावर मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न विचारले गेले आहेत ? त्यांचे स्वरूप कसे आहे ? याचे विश्लेषण करा.
 • उजळणी :

महत्वाची वाक्ये अधोरेखित करा. पहिल्याच वाचनात अधोरेखित न करता दुसऱ्या वाचनात अधोरेखित करा.
अधोरेखीत केल्यामुळे पुढच्या वेळी पूर्ण पुस्तक वाचावे लागत नाही. महत्वाचा भाग वाचणे, उजळणी करणे सहजशक्य होते.
अभ्यास करताना 40 – 50 मिनिटानंतर ब्रेक घ्या. त्यानंतर आपण काय वाचले ते आठवून पाहावे.
महिन्याचे शेवटचे 3 दिवस उजळणीसाठी राखून ठेवा या दिवशी नवीन वाचन न करता केवळ उजळणी करा.
 • सराव परीक्षा :

वाचलेल्या घटकावर स्वतःचे प्रश्न तयार करा. ते प्रश्न सोडवून पहा. ज्या प्रश्नाचे उत्तर अडखडेल तो भाग पुन्हा अभ्यासा.
 • अभ्यासाचे तंत्र आत्मसात करा :

 1. झोपेचे तास कमी करून जास्त अभ्यास करू नका.
 2. जेंव्हा वाचन करण्याचा कंटाळा आला असेल, अशा वेळी गट चर्चा सुरु करा.
 3. चालू घडामोडी या उपघटकाच्या तयारीसाठी दररोज दोन दैनिकाचे सविस्तर वाचन करून त्यातील महत्वाचे मुद्दे नोंद करून ठेवा.
 4. इतिहास विषयाचा अभ्यास करताना क्रमिक पुस्तकातून सुरुवात करा.
 5. भूगोल विषयाच्या तयारीसाठी पाचवी ते बारावी पर्यंतच्या क्रमिक पुस्तकाचे वाचन करावे.
 6. पर्यावरण आणि परिस्थितीकी या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेट चा वापर करावा.
 7. भारतीय राज्यघटना या घटकासाठी अकरावी – बारावी ची क्रमिक पुस्तके उपयोगी आहेत.
 8. आर्थिक व सामाजिक विकास या घटकासाठी अकरावी – बारावी ची क्रमिक पुस्तके उपयोगी आहेत.
 9. विज्ञान व तंत्रज्ञान या घटकासाठी सहावी ते दहावी पर्यंतची क्रमिक पुस्तके वाचा. त्यानंतर पाच घटकावरील “स्पेक्ट्रम पब्लिकेशन” च्या इंग्रजी पुस्तकाचे अध्ययन करा.
 10. योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकातील अभ्यासक्रमासंदर्भात लेख आवर्जून वाचा.

MPSC