मराठी व्याकरण : विशेषण

विशेषण – नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
उदा. चांगली मुले, काळा कुत्रा, पाच टोप्या

  •         विशेषण – चांगली, काळा, पाच
  •          विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या
 मराठी व्याकरण : विशेषण
 मराठी व्याकरण : विशेषण

 

विशेषणाचे प्रकार :

        1. गुणवाचक विशेषण

2. संख्यावाचक विशेषण

3. सार्वनामिक विशेषण

1. गुणवाचक विशेषण :   ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किवा विशेष दाखविला जातो, त्यास गुण विशेषण असे म्हणतात.
उदा. हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश

2. संख्या विशेषण : ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.

संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.

  1. गणना वाचक संख्या विशेषण
  2. क्रम वाचक संख्या विशेषण
  3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण
  4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण
  5. अनिश्चित संख्या विशेषण

     1. गणना वाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषनाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. 1. दहा मुले, तेरा भाषा, एक तास, पन्नास रुपये

गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात

1. पूर्णाक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.

2. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.

3. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.

2. क्रमवाचक संख्या विशेषण :

जी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात त्यांना क्रमवार संख्या विशेषणे असे म्हणतात.
उदा. पहिले दुकान, सातवा बंगला, पाचवे वर्ष.

3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :

जी विशेषणे संख्याची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात त्यांना त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग

4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :

जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. मुलींनी पाच-पाच चा गट करा, प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा.

5. अनिश्चित संख्या विशेषण :

जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात.
उदा. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी
3. सार्वनामिक विशेषण :

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी.