म्हणी व त्यांचा अर्थ – मराठी व्याकरण Mhani in Marathi Vyakran

म्हणी तयार कशी होतात? म्हणीत अर्थाच्या मानाने शब्द थोडे असतात म्हणीतील अर्थसंकोच वारंवार वापराने अशिक्षितालाही कळतो व ती म्हण सर्वश्रुत होते म्हणजेच म्हणीचा उगम होतो.

Mhani Marathi Vyakran म्हण म्हणजे काय?

आपल्या ज्ञानाचा बोलताना, लिहिताना अनेक प्रसंगी उपयोग करता येतो आणि आपले बोलणे, लिहिणे अधिक प्रभावशाली करता येते. भाषेला सौंदर्य प्राप्त होते, किंबहुना त्या भाषेची ती भूषणे आहेत. शब्द म्हणजे वज्राहूनही कठीण असतात आणि फुलाहून ही कोमल असतात असे म्हटले जाते ते शब्दांच्या या अर्थासाठी म्हणी म्हणून उपयोग करतात. मराठी व्याकरणात म्हणीच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे-

“म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वाचन होय.”

“म्हण म्हणजे लक्षात ठेवण्यास योग्य असलेले ज्ञानवचन होय.”

mhani
marathi Vyakrna Mhani with meaning list

अडला हरी गाढवाचे पाय धरी – गरजवंताला अक्कल नसते.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ :- आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत.

पळसाला पाने तीनच :- कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव तोच.

अंथरूण पाहून पाय पसरावे :- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवणे.

अति तेथे माती :- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.

देश तसा वेश :-परिस्थितीनुसार वागणे.

रात्र थोडी सोंगे फार : कामे पुष्कळ त्यामानाने वेळ कमी असणे.

पालथ्या घड्यावर पाणी :-केलेला उपदेश वाया जाणे.

इकडे आड तिकडे विहीर :- दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.

लेकी बोले सुने लागे :-एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

गाढवाला गुळाची चव काय? :-मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.

खाई त्याला खवखवे :-वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.

काखेत कळसा नि गावाला वळसा :-हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे.

कामापुरता मामा :-काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती.

दगडापेक्षा वीट मऊ :-मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार :-विना तक्रार सहन करणे.

कोल्हा काकडीला राजी :-क्षुद्र माणसे शुल्लक गोष्टीने संतोष होतात.

कानामागून आली आणि तिखट झाली :- श्रेष्ठ अपेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ होणे.

आईजीच्या जीवावर बाईची उदार :-दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

बुडत्याचा पाय खोलात :-अवंती होऊ लागली की सर्व बाजूने होते.

वडाची साल पिंपळाला :-एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलले.

गावंढळ गावात गाढवीन सवाष्ण :-मूर्ख माणसा थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो.

उचलली जीभ लावली टाळाला :-अविचाराने भलतेच बोलणे.

असतील शिते तर जमतील भूते :-आपल्याजवळ पैसे असे तोवर मित्रांची वाण असते.

नावडतीचे मीठ अळणी :-नावडत्या व्यक्तीने केलेली चांगली गोष्ट ही वाईट वाटते.

दृष्टी आड सृष्टी :-आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष.

पाचामुखी परमेश्वर :-पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे.

घरोघरी मातीच्या चुली :-सगळीकडे साधारणता सारखीच परिस्थिती असते.

जशी कुडी तशी पुडी :-जसा आणि जेवढा देह त्या मानानेच आहार.

Marathi vyakran Mhani

जुने ते सोने :-बऱ्याच वेळा जुने तेच चांगले असते.

ताकापूरते रामायण :-आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे.

काळ्या दगडावरील पांढरी रेघ :-कोणताही बदल होऊ शकणार नाही असा पक्का निर्णय.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट :-जी वस्तू हवी आहे ती न मिळाल्यास ती वस्तूच वाईट आहे असे म्हणण्याची वृत्ती.

देखल्या देवा दंडवत :-एखादी व्यक्ती सहजरीत्या भेटली म्हणून केवळ तिची विचारपूस करणे.

नाकापेक्षा मोती जड :-मालकापेक्षा नोकर शिरजोर

पदरी पडले पवित्र झाले :- स्वीकारलेल्या बाबीला नावे न ठेवता समाधान वाटणे.

म्हणी तयार कशी होतात?

म्हणीत अर्थाच्या मानाने शब्द थोडे असतात म्हणीतील अर्थसंकोच वारंवार वापराने अशिक्षितालाही कळतो व ती म्हण सर्वश्रुत होते म्हणजेच म्हणीचा उगम होतो.

पुराणातील वांगी पुराणात :- उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे.

पेरावे तसे उगवते :-चांगल्या किंवा वाईट कृत्यामुळे त्याचे तसे फळ मिळते.

बळी तो कान पिळी :-शक्तिमान मनुष्य दुसऱ्यावर अधिकार गाजवतो.

बाप तसा बेटा :-बापाचे गुण अवगुण मुलांच्या अंगी असणे.

भरवशाच्या म्हशीला टोणगा :- ज्याच्या विषयी अपेक्षा आहेत अशा व्यक्तीने संपूर्ण निराशा करणे.

भित्या पाठी ब्रह्मराक्षस :-भित्र्या माणसावर संकटे कोसळतात.

भीक नको पण कुत्रा आवर :-एखाद्यास मदत केली नाही तरी चालेल पण त्या कार्यात विघ्न आणू नयेत अशी स्थिती.

भुकेला कोंडा निजेला धोंडा :-अतिशय गरज असली म्हणजे काहीही चालते.

मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधावी:-जोखमीचे काम करण्यास कोणी पुढे सरसावत नाही.

मनात मांडे पदरात धोंडे :-केवळ दिवा स्वप्न पाहून काही मिळत नाही.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात:- भविष्यात कोण होणार याचा अंदाज लहानपणी बांधता येतो.

यथा राजा तथा प्रजा :-प्रमुख व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्याच्या हाताखालच्या व्यक्तींवर प्रभाव पडतो.

रोज मरे त्याला कोण रडे :-वारंवार घडणाऱ्या गोष्टीविषयी स्वारस्य उरत नाही.

लहान तोंडी मोठा घास :-आपली योग्यता नसताना दुसऱ्यास सल्ला देणे.

वराती मागून घोडे :-काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे.

वड्याचे तेल वांग्यावर :-एखाद्या बद्दल दुसऱ्याला दोष देणे.

वासरात लंगडी गाय शहाणी :-सुज्ञ माणसात थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो.

शहाण्याला शब्दांचा मार :-सुज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो.

शेरास सव्वाशेर :-सामर्थ्यवान माणसाला गर्व उतरवणारा अधिक बलवान माणूस भेटतो.

डोंगर पोखरुन उंदीर काढणे:-कष्ट फार लाभ कमी

नाव मोठे लक्षण खोटं :-भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची.

शितावरून भाताची परीक्षा :-वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.

सगळे मुसळ केरात :-मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे.

साखरेचे खाणार त्याला देव देणार :-सुधीर माणसाला कशाचीही उणीव पडत नाही.

उथळ पाण्याला खळखळाट फार :-स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.

सुंभ जळाला तरी पीळ जात नाही :-हातापायी नुकसान झाले तरी त्याचा हट्टीपणा जात नाही.

दैव देते कर्म नेते :-अनुकूल परिस्थितीचा फायदा न उठवता येणे.

हत्ती गेला शेपूट राहिले :-बहुतेक काम पूर्ण होऊन थोडेसे शिल्लक राहणे.

दिव्याखाली अंधार :-मोठ्या माणसाच्या अंगी दोष हे असतातच.

हातच्या काकणाला आरसा कशाला :-प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.

चोर सोडून संन्याशास सुळी देणे :-अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा देणे.

गोगलगाय नि पोटात पाय :-एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.

खायला काळ नि भुईला भार :- निरोपयोगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.

हाजीर तो वजीर :- वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो.

शेंडी तुटो की पारंबी तुटो :-दृढ निश्चय करणे.

हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे :-सहज साध्य सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे.

आयत्या बिळात नागोबा :-दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा घेणे.

नवी विटी नवे राज्य :-सगळीच परिस्थिती नवी असणे.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही :-त्रास सहन केल्याशिवाय मोठेपण येत नाही.

ती हळद नि हो गोरी :- एखाद्या कृत्याचा त्वरित लाभ मिळावा अशी अपेक्षा करणे.

सुंठी वाचून खोकला जाणे :-उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर होणे.

बैल गेला आणि झोपा केला :-हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी व्यर्थ असते.

नाचता येईना अंगण वाकडे :-पुणेवा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.

झाकली मूठ सव्वा लाखाची :-मौन पाळून अब्रू राखणे.

हलव्याच्या घरावर तुळशी पत्र :-परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.

गाड्या बरोबर नळ्याची यात्रा :- मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.

मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये :-कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.

सरड्याची धाव कुंपणापर्यंतच :-प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते.

गुरुची विद्या गुरुलाच फळली :-एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.

मस्करीची होते कुस्करी :-काही वेळा थट्टेचा भयंकर परिणाम होतो.

दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी :-दोन उपयोगी असलेल्या वस्तू जवळ असूनही त्यांची गाठभेट नाही.

गर्वाचे घर खाली :-गर्वाचा परिणाम अपमान होण्यात किंवा नुकसान होण्यात होतो.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती :-नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचाव झाला.

अडली गाय फटके काय :-संकटात किंवा अडचणीत सापडलेल्या माणसाला त्रास देणे.

नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये :-परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण नाराजी पत्करू नये.

  • मराठी म्हणी व त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती
  • म्हणी वाक्प्रचार त्यांचा उगम व अर्थ माहिती
  • मराठी म्हणी बद्दल माहिती
  • मराठी म्हणी व वाक्प्रचार माहिती
  • म्हणी आणि म्हणींचे अर्थ मराठीत माहिती

न खात्या देवा नैवेद्य :-ज्याला एखाद्या गोष्टीची जरुरी नाही नेमकी त्यालाच ती देणे.

तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे :-दोन्ही बाजूंनी नुकसान होणे हाती काही न उरते.

लष्कराच्या भाकऱ्या भाजणे :-फायदा नसलेला निरोपयोगी उद्योग करणे.

फार झाले हसू आले :-कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास ती अंगवणी पडते आणि तिचे काही वाटेना असे होते.

सुळावरची पोळी :-जी मिळणे शक्य नाही अशी अतिशय कठीण गोष्ट.

अन्नछत्री जेवणे, मिरपुर मागणे :-आपले काम आधीच फुकट करून घेऊन नंतर मिजास दाखवणे.

आग सोमेश्वरी बंद रामेश्वरी :-गरज एकीकडे असताना दुसऱ्या बघ त्याच ठिकाणी मदत जाऊन पोहोचणे.

खोट्याच्या कपाळी गोटा :-खोटेपणा करणाऱ्यांचे नुकसानच होते किंवा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसानच होते.

बाप से बेटा सवाई :-वडिलांचा मुलगा त्यांच्याहून अधिक कर्तबगार असणे.

पुढे तिखट मागे बोचट :-दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात मात्र तसे नसते.

जशी देणावळ तशी धुणावळ :-ज्या प्रमाणात मोबदला त्याच प्रमाणात काम त्याहून अधिक नाही.

जनावरांचे जिने :-अन्याय आणि त्रास सहन करत अगदी खालच्या दर्जाचे जीवन.

थोरा घरचे श्वान त्याला सर्व देते मान :-मोठ्या किंवा समर्थ माणसाच्या नुसत्या आश्रयाला जरी राहिले तरी मोठेपण मिळते.

पाय धु तर म्हणे तोडे केवढ्याचे :-आपले काम सोडून नको त्या चौकशा करणे.

नाग दाबले की तोंड उघडते :-एखाद्याला पेचात अडकविल्याशिवाय तो आपल्या म्हणण्याला कबूल होत नाही.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती :-जितकी भिन्न माणसे तितके त्यांचे भिन्न स्वभाव.

फुले वेचली तिथे गोवर्या वेचू नयेत :-जेथे वैभव उपभोगले तेथेच वाईट दिवस कंठण्याची पाळी येऊ नये.

संन्याशाच्या लग्नाला शेंडी पासून तयारी :-एखाद्या न होणाऱ्या कामास प्रारंभ पासून तयारी करणे.

म्हशीची शिंगे म्हशीला जड होत नाहीत :-आपली माणसे किंवा आपला सरंजाम आपल्याला जड होत नाही.

ऊस गोड लागला म्हणून मुळा सहित खाऊ नये :-कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.

एन केन प्रकारेण :-योग्य अयोग्य किंवा चांगल्या वाईट असा विचार न करता कोणताही भलाबुरा मार्ग अवलंबणे.

अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण :-भुकेच्या वेदना या मरणयातनांहून अधिक क्लेषकारक आणि दुःखदायी असतात.

या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे :-बनवाबनवी करणे.

नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा :-नाव मोठे पण कर्तुत्व मात्र कमी प्रतीचे.

विंचवाचे बिर्हाड पाटीवर :-गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे.

मेल्या म्हशीला मनभर दूध :-एखादी व्यक्ती निघून गेली की त्याचा गुणगौरव करणे.

शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले :-एकाचे नुकसान तोच दुसऱ्याचा फायदा.

येरे माझ्या मागल्या आणि ताक ,कण्या चांगल्या :- एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरवून पुन्हा पूर्वीप्रमाणेच वागणे.

हा सूर्य हा जयदत्त :-प्रत्यक्ष पुरावा देऊन एखादी गोष्ट सिद्ध करणे.

राजाला दिवाळी काय माहित ? :-ज्याच्या घरी नेहमीच उत्सव त्याला सणाचे महत्त्व काय?

हा हा म्हणता :-अगदी थोड्या काळात.

सत्य पुढे शहाणपणा नाही :-ज्याच्या हातात अधिकार आहे किंवा जो बलवान आहे त्याच्यापुढे शहाण्या माणसाचे काहीच चलत नाही .

आवळा देऊन कोहळा काढणे :-शिल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा फायदा करून देणे.

प्रयत्नांती परमेश्वर :-कितीही अवघड वाटणारी गोष्ट सतत, मनापासून केल्यावर साध्य होते.

एकाच माळेचे मणी :-सगळे सारखेच चांगले अथवा वाईट.

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी :-एक तर चैन विलासाचे जीवन उपभोगणे, नाहीतर काहीच न स्वीकारता दारिद्र्य स्वीकारणे.

ऊन पाण्याने घरी जळत नसतात :- वरवर खरे दिसणारे पण प्रत्यक्षात खोटे असणारी आरोप एखाद्यावर केले जाते.

आर्थी दान महापुण्य :-गरजू आणि योग्य माणसाला दान करण्याने मोठे पुण्य लागते.

एका हाताने टाळी वाजत नाही :-दोघांच्या भांडण्याबाबत एकट्याला दोषी ठरवता येत नाही.

नागेश्वराला नागवन सोमेश्वरा वात लावणे :-एखाद्याला लुटून दुसऱ्याची भर करणे.

आधी पोटोबा मग विठोबा :-आधी स्वार्थ मग परमार्थ.

आपला हात जगन्नाथ :-माणूस स्वतःची प्रगती स्वतःच करून घेऊ शकतो.

समुद्रात जाऊन कोरडा :-अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली असूनही ज्याला काही फायदा करून घेत नाही येत नाही तो.

नकटीच्या लग्नाला सातशे विघ्ने :-दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात.

जळते घर भाड्याने कोण घेते ? :-एखादी वस्तू घेण्याने आपली नुकसान होईल हे स्पष्ट दिसत असताना ती वस्तू कोण घेईल ?

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास :-एखादी गोष्ट करण्याचा उत्साह नसतानाच ती न करायला काहीतरी निमित्त मिळणे.

कामापुरता मामा अन ताकापुरती आजी :- आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे.

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला :-ताळमेळ, सत्यासत्य,, योग्य – आयोग्य पैकी कोणताही विचार न करता मनाला येईल ते बोलणे.

गरजेल तो पडेल काय ? :-गर्वाचा परिणाम अपमान होण्यात किंवा नुकसान होण्यात होतो.

काट्यात नायटा :-छोट्या गोष्टीला फार मोठे भयंकर स्वरूप देणे.

  • Marathi mhani with meaning list
  • MPSC mhani Marathi
  • Marathi vyakaran Mhani
  • Mhani aani mhaniche arth in Marathi

दिल्ली तो बहुत दूर है :-फारच थोडाच काम झाला आहे अजून बरेच काम बाकी आहे.

ओळखीचा चोर जिवे न सोडी :-ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षाही भयंकर असतो.

देव भावाचा भुकेला :-देवाला बाकीच्या गोष्टी पेक्षा शुद्ध भावाचे मोल अधिक आहे.

देव तारी त्याला कोण मारी :-देवाची कृपा असल्यावर आपले कोणीही वाईट करू शकत नाही.

बारभाईची शती काय लागेल हाती :-अनेक भागीदार झाल्याने नफा ऐवजी नुकसानच जास्त होते.

भवती न भवती :-बरीच उलट सुलट चर्चा होऊन एखादी गोष्ट करणे.

कसा याला गाय धारजीनी :-दुष्ट आणि कठोर माणसांची सगळेच नरमाइने वागतात.

लाथ मारेल तिथे पाणी काढील :-पराक्रमी कर्तबगार पुरुषाबद्दल ही म्हण वापरतात.

वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा :-सर्व साधने आणि काळ अनुकूल असेल तर त्यात आपला फायदा करून घ्यावा.

तुपाच्या लालचिने उष्टे खाणे :-मोठ्या लाभासाठी थोडीशी गैरसोय किंवा अपमान सोसायला तयार असणे.

अति सर्व वर्जयेत् :-अतिरेक सर्वत्र टाळावा.

कधी उपाशी तर कधी उपाशी :-संसारिक स्थितीत चढउतार हे असतातच.

कर नाही त्याला डर नाही:- ज्याने पाप केले नाही त्याला घाबरण्याचे कारण नाही.

करावे तसे भरावे :-ज्या प्रकारची कृती करावी त्या प्रकारची परिणाम भोगावे लागतात.

कुसंतानापेक्षा निसंतान बरे :-वाईट पुत्र असण्यापेक्षा पुत्र नसणे चांगले.

धर्म करता कर्म उभारते :-दुसऱ्यावर उपकार करायला गेल्यावर कधीकधी असूनही आपल्यावरच संकट ओढवते.

मौन सर्वार्थ साधनम् :-बडबड करण्यापेक्षा गप्प बसणे हे सर्वात उत्तम.

शुभस्य शीघ्रम :-चांगली गोष्ट ताबडतोब करावी.

गळा कापला खोकला गेला :-मोर्चा दुखापेक्षा त्याच्या निवारणाचाच उपाय भयंकर असतो.

तापल्या तव्यावर भाकरी भाजून घ्यावी :-सर्वसाधारण सामग्रीची अनुकूलता असताना आपले इष्ट कार्य साधून घ्यावे.

तुरुत दान महापुण्य :-अडचणीच्या वेळी त्वरित केलेले दान हेच महापुण्य असते.

न भूतो न भविष्यती :-पूर्वी झाली नाही आणि पुढेही होणार नाही अशी घटना.

न देवाय न धर्माय :-देवाच्या कार्याला नव्हे आणि धर्माच्या कार्याला नव्हे.

भांडणाचे तोंड काळे :-भांडणाचा परिणाम चांगला नसतो.

एक घाव दोन तुकडे :-कोणतेही प्रकरण चिघळत न ठेवता झटकन निर्णय घेणे.

या हाताचे त्या हातावर :-वाईट कृत्याची फळे मिळण्यास उशीर लागत नाही.

हात ओला तर मित्र भला :-फायदा असेपर्यंतच मित्र गोळा होतात.

ऐकावे जनाचे करावे मनाचे :-लोकांची मते जरूर घ्यावी सल्लाही विचारात घ्यावा पण शेवटी आपल्या मनाला योग्य वाटेल तेच करावे.

केळीवर नारळी अन घर चंद्रमौळी :-घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असणे.

डोळ्यात केर आणि कानात फुंकर :-एके ठिकाणी उणीव असते परंतु दुसऱ्याच ठिकाणी उपाय करणे अशी हास्यास्पद कृती.

तहान लागल्यावर विहीर खणणे :-अगदी ऐनवेळी प्रयत्न सुरू करणे.

दगडाचे पेव घालता खळखळ काढता खळखळ :-निरुपयोगी वस्तूसाठी त्रास करून घेणे हा मूर्खपणा आहे.

वळणाचे पाणी वळणावर जाणार :-निसर्ग नियमानुसार जे घडायचे ते घडतच असते त्यात फारसा बदल होत नाही.

निंदकाचे घर असावे शेजारी :- दुसऱ्याची निंदा करणारा माणूस उपयोगी पडतो.

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी :-बोलून सगळ्यांना थक्क करायचे पण कृती मात्र शून्य.

मनाएवढा ग्वाही त्रिभुनात नाही :-मनासारखी खरे बोलणारा साथीदार साऱ्या जगात नाही.

राईचा पर्वत :-मूळ गोष्ट असताना तिचा मोठा बाऊ करून विपर्यास करून सांगणे.

लाज नाही मना कोणी काही म्हणा :-आपल्यावर दुसरा कितीही टीका करू त्याची निर्लज्ज माणसाला परवा नसते.

दाम करी काम :-पैशामुळे सर्व कामे साध्य होतात.