वाक्याचे प्रकार Types of sentences in marathi

vakyache%2Bprakar

 

अर्थावरून आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार

 

१)विधानार्थी वाक्य:

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अश्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते.
उदा: १)मी इयत्ता दहावीत शिकतो
२)बाबा पंढरपूरला गेले

२)प्रश्नार्थक वाक्य: 

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

 
टीप:शेवटी प्रश्न चिन्ह असेल तरच वाक्य प्रशांर्थी समजावे.
उदा:१)उ केव्हा परत येणार आहेस?

२)तुमचे उपकार मी कसे विसरेन?

३)उदगारार्थी वाक्य:

ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात, अश्या वाक्याच्या शेवटी उदगारवाचक  चिन्ह असते.
उदा: १)अबब! केवढा मोठा साप हा!

४)होकारार्थी वाक्य:

ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो, त्यास होकारार्थी किंवा करणरुपी वाक्य म्हणतात.
उदा: १)नेहमी खरे बोलावे.
२)मी आज गावाला जात आहे.
 

५)नकारार्थी वाक्य:

ज्या वाक्यातून नकार दर्शविला असतो, त्यास नकारदर्शक किंवा अकरणरुपी  वाक्य म्हणतात.
उदा:१)कधीही खोटे बोलू नये.
२)दुसऱ्याची  निंदा करू नये.
 

वाक्याती विधानावरून वाक्याचे प्रकार

१)केवल वाक्य:

ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. एकाच मुख्य क्रिया असते.
उदा:१)सुर्य रोज पूर्वेला उगवतो.
२)मधु पुस्तक वाचते.
 

२)संयुक्त वाक्य:

जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात.
 

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये:

१)सामुच्याय बोधक:आणि, व, अन, शिवाय 
 
उदा:पूस आला आणि मोर नाचू लागला
 
२)विकल्पबोधक:अथवा, किंवा, कि
 
उदा: देह जावो अथवा राहो
 
३)न्यूनत्वबोधक:पण, परंतु, परी
 
उदा:तो चांगला धावला; पण नशिबाने साथ दिली नाही
 
४)परिणामबोधक:म्हणून, सबब
उदा:तो आजारी होता; म्हणून त्याला यायला उशीर झाला.
 
३)मिश्र वाक्य:
जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात.
 

गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय:

१)स्वरूप बोधक: कि, म्हणून, म्हणजे
उदा: माझा विश्वास आहे, कि मी नक्की पास होईल.
 
२)कारणबोधक: कारण, का-की, कारण की
त्याचे डोळे लाल झाले कारण की तो उन्हात फिरला
 
३)उद्देशबोधक: म्हणून,यास्तव
उदा:शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो
 
४)संकेत बोधक: जर-तर, म्हणजे, की
उदा: जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल.
 
वरील उभयान्वयी अव्ययाव्यतिरिक्त मिश्र वाक्य करण्यासाठी खालील जोडीची उभयान्वयी अव्यये वापरली जातात. सामान्यता यातील पहिले वाक्य गौण असते.
 
उदा:जो-तो, ज्याने-त्याने, ज्याला-त्याला, ज्याचा-त्याचा, जसा-तसा, जेव्हा-तेव्हा, जितका-तितका, जेथे-तेथे, जरी-तरी ई.
 
उदा:१)जो तले राखील तो पाणी चाखील.
२)जसा आला तसा गेला
३)ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे
४)जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला
 
टीप:दोन किंवा अधिक वाक्यांपासून एकच वाक्य तयार करणे याला वाक्य एकत्रीकरण,संश्लेषण, वाक्य संयोजन म्हणतात.
 

गौण वाक्याचे प्रकार:



 

१)नाम वाक्य:

दिलेल्या मिश्र वाक्यातील एका वाक्याला ‘काय’ ने प्रश्न विचारल्यास उत्तर येणारे वाक्य गौण वाक्य असते व प्रश्न विचारलेले वाक्य प्रधान वाक्य असते. असे गौण वाक्य प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते व कर्म नेहमी नाम असते म्हणून अशा गौण वाक्यास नाम वाक्य म्हणतात.
 
उदा:१) गुरुजी म्हणाले, की पृथ्वी गोल आहे. (गुरुजी काय म्हणाले)
२)त्याचा विश्वास आहे, की मी नक्की पहिला नंबर मिळवेल. (त्याचा काय विश्वास आहे)
 

२)विशेषण वाक्य:

मुख्य वाक्यातील एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या गौण वाक्याला विशेषण वाक्य म्हणतात. अशी वाक्य बहुधा जो-तो, जे-ते, जी-ती ने  जोडलेली असतात. यातील पहिले वाक्य बहुधा विशेषण गौण वाक्य असते.
१)जे चकाकते, ते सारे सोने नसते.
या वाक्यात जे चकाकते हे गौण वाक्य मुख्य वाक्यातील सोने या नामाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणून ते विशेषण वाक्य आहे.
२)जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला.
 

३)क्रियाविशेषण वाक्य:

गौण वाक्य जर प्रधान वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण यांच्या बाबतीत स्थळ, काळ, रीत, संकेत, कारण, उद्देश याविषयी माहिती सांगत असेल तर ते क्रियाविशेषण गौण वाक्य होय.
 
टीप:सामान्य पाने जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्यात पहिले गौण वाक्य असते.
 

१)स्थलदर्शक वाक्य:

मुख्य वाक्यातील क्रियेचे स्थल गौण वाक्यात असते, मुख्य वाक्याला कोठे ने प्रश्न विचारल्यास उत्तर गौण वाक्य येते.
उदा:१)दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती. (स्थलदर्शक)
 

२)कालवाचक क्रियाविशेषण वाक्य:

मुख्य वाक्यातील क्रियेची वेळ गौण वाक्यात असते. मुख्य वाक्यातील क्रिया केव्हा घडते असा प्रश्न विचारल्यास उत्तर गौण वाक्य येते.
उदा: जेव्हा पाऊस आला, तेव्हा मोर नाचू लागला. (कालदर्शक)
 

३)संकेत दर्शक क्रियाविशेषण वाक्य:

मुख्य वाक्यातील क्रिया होण्यासाठी गौण वाक्यात अट असते.
उदा:जर जोरात पळालास, तर बस मिळेल. (संकेत दर्शक)
 

४)रीत दर्शक क्रियाविशेषण वाक्य:

मुख्य वाक्याच्या क्रियेची रीत गौण वाक्यात असते.
उदा:मी जसे सांगतो, तसे कर. (रीत दर्शक)
 

५)उद्देश दर्शक क्रियाविशेषण वाक्य:

मुख्य वाक्यातील क्रियेचा उद्देश गौण वाक्यात असतो.
उदा:शरीर सदृढ व्हावे, म्हणून आम्ही व्यायाम करतो. (उद्देश दर्शक)
 

६)विरोध दर्शक क्रियाविशेषण वाक्य:

उदा: जरी ती चाळीशीत असली, तरी ती सुंदर दिसते. (विरोध दर्शक)
 
महत्वाचे: मराठीमध्ये आठवा प्रकार परिणाम दर्शक क्रियाविशेषण वाक्य हा आहे. परंतु परिणाम दर्शक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असते. संयुक्त वाक्यात गौण वाक्यच नसते. तरीही हा प्रकार मराठीत इंग्रजीतून घेण्यात आला आहे. इंग्रजी मध्ये जे  CLAUSES चे प्रकार आहेत, त्याचे सरळ-सरळ भाषांतर म्हणजे मार्ठीतील नाम्वाक्या, विशेशान्वाक्या व क्रियाविशेषण वाक्य होय.
इंग्रजी मध्ये क्रियाविशेषण वाक्याचे नौ प्रकार दिलेले आहेत. मराठीत मात्र आठच प्रकार दिलेले आहेत. नववा प्रकार म्हणजे तुलना दर्शक क्रियाविशेषण वाक्य होय.”
 

८)परिणाम दर्शक क्रियाविशेषण वाक्य:

पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसर्या वाक्यात असतो.
उदा:तो उन्हात फिरला म्हणून त्यला बाबांनी मारले.
 

९)तुलना दर्शक क्रियाविशेषण अव्यय:

दोन घटकांची तुलना केलेली असते.
उदा:जेवढे पुणे मोठे आहे त्यपेक्षा मुंबई मोठी आहे.

वाक्यरुपांतर

वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देत दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय. यात विधानार्थी, प्रश्नार्थक, उदगारार्थी, नकारार्थी तसेच केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पर रुपांतर अपेक्षित असते.
 

१)प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर:

सामान्यपणे ज्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे असा प्रश्न सरळ, साध्या पद्धतीने विचारला जातो; परंतु वाक्य परिवर्तनाच्या दृष्टीने विधानार्थी वाक्य नकारदर्शक असल्यास प्रश्न होकार दर्शक करतात व प्रश्न नकार दर्शक असल्यास विधानार्थी वाक्य होकार्दर्शक करतात.
उदा:
१)शेक्सपिअरची नाटके कोणाला आवडत नाहीत? (प्रश्नार्थक)
-शेक्स पिअरची नाटके प्रत्येकाला/सर्वांनाच आवडतात. (विधानार्थी)
 
२)मध्यरात्री स्मशान भूमीत कोण जाईल? (प्रश्नार्थक)
-मध्यरात्री स्मशान भूमीत कोणी जाणार नाही. (विधानार्थी)
 
३)आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? (प्रश्नार्थक)
-आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. (विधानार्थी)  
 
४)हापूर आंबा सर्वांनाच आवडतो. (विधानार्थी)
-हापूस आंबा कोणाला आवडत नाही? (प्रश्नार्थक)
 
५)जागी सर्व सुखी असा कोणी नाही. (विधानार्थी)
-जागी सर्व सुखी असा कोण आहे? (प्रश्नार्थक)
 
६)अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? (प्रश्नार्थक)
-अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. (विधानार्थी)

२)उदगारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर:

उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी करताना  वाक्यातील किती/काय/कोण हे उदगार दर्शक शब्द तसेच केवलप्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे व वाक्याचा भाव कायम ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे नवीन शब्द घ्यावेत. सुंदर साठी -अत्यंत, उंची/खोली साठी-खूप, गर्दीसाठी-अतोनात, वेगासाठी-फार, मी——-झालो तर! च्या  ऐवजी- मला—-होण्याची फार इच्छा आहे, अशी शब्दरचना करावी.
उदा:
१)किती सुंदर चित्र आहे! (उदगारवाचक)
-हे चित्र अत्यंत सुंदर आहे. (विधानार्थी)
 
२)तू फार चतुर आहेस.(विधानार्थी)
-किती चतुर आहेस तू! (उदगारवाचक)
 
३)आज जत्रेत कोण गर्दी! (उदगारवाचक)
– आज जत्रेत अतोनात गर्दी होती. (विधानार्थी)
 
४)काय अक्षर आहे तुझे! (उदगारवाचक)
-तुझे अक्षर अत्यंत सुंदर आहे. (विधानार्थी)
 
५)केवढी उंच इमारत ही! (उदगारवाचक)
-ही इमारत खूप उंच आहे. (विधानार्थी)

३)होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर:

वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेऊन वाक्य रुपांतर करावे लागते, त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्धरूप  वापरावे.
उदा:
१)उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत. (होकारदर्शक)
-उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही.(नकारदर्शक)
 
टीप: दोनदा नकार म्हणजे होकार समजावा; परंतु असे वाक्य नाकार्दर्षाकच असते.
 
२)धुम्रपान टाळावे.(होकारदर्शक)
-धुम्रपान करू नये.(नकारदर्शक)
 
३)तू येथे थांब.(होकारदर्शक)
– तू पुढे जाऊ नकोस.(नकारदर्शक)
 
४)मला सारे भाऊच आहेत.(होकारदर्शक)
-मला एकही बहिण नाही.(नकारदर्शक)
 
५)तू आता मोठा झालास.(होकारार्थी)
-तू आता लहान नाहीस. (नकारदर्शक)
 
६)गणेशाचे चित्र खराब आहे.(होकारार्थी)
-गणेशाचे चित्र चांगले नाही. (नकारदर्शक)
 
७)आजच पेपर खूप सोपा आहे. (होकारार्थी)
-आजच पेपर अजिबात अवघड नाही. (नकारदर्शक)
 
८)आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.(होकारार्थी)
-आपल्या सुचनेचे मला विस्मरण झालेले नाही. (नकारदर्शक)

४)केवल, संयुक्त व मिश्र वाक्याचे परस्पर रुपांतर:

टीप:वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, हे अर्थावरून ओळखावे.
 


संयुक्त वाक्य
मिश्र वाक्य
समुच्चय
स्वरूप
विकल्प
उद्देश
न्यूनत्व
कारण
परिणाम
संकेत
 

१) एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास पहिल्या क्रियादर्शक शब्दाला ‘च’  प्रत्यय वापरून केवळ वाक्य, ‘आणि’ वापरून संयुक्त वाक्य व जेव्हा- तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते.

उदा: गुरुजी वर्गात आले. विद्यार्थी उभे राहिले.
अ)गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. (केवल वाक्य)
ब)गुरुजी आले आणि विद्यार्थी उभे राहिले. (संयुक्त वाक्य)
क)जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले. (मिश्र वाक्य)

२)एका मोठया क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया घडल्यास मोठी क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला ‘असताना प्रत्यय जोडून केवळ वाक्य, ‘आणि’ वापरून संयुक्त  वाक्य तर ‘जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते.

उदा: मी फरशीवरून चालत होतो. मी पाय घसरून पडलो.
अ)मी फरशीवरून चालत असताना पाय घसरून पडलो. (केवल वाक्य)
ब)मी फरशीवरून चालत होतो आणि पाय घसरून पडलो. (संयुक्त वाक्य)
क)जेव्हा मी फरशीवरून चालत होतो तेव्हा मी पाय घसरून पडलो.  (मिश्र वाक्य)

३)एक क्रिया करून दुसरी क्रिया केल्यास पहिल्या क्रियापदाला ऊन/हून प्रत्यय वापरून केवल वाक्य ‘आणि/ व’ वापरून संयुक्त वाक्य व जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते.

उदा: माझे वडील सकाळी उठतात. ते फिरायला जातात.
अ)माझे वडील सकाळी उठून फिरायला जातात. (केवळ वाक्य)
ब)माझे वडील सकाळी उठतात व फिरायला जातात. (संयुक्त वाक्य)
क)माझे वडील सकाळी उठतात तेव्हा ते फिरायला जातात. (मिश्र वाक्य)
 

४)पहिल्या वाक्याच्या विरुद्ध कल्पना दुसऱ्या वाक्यात असेल तर पहिल्या क्रियेला ऊन/हून प्रत्यय वापरून केवळ वाक्य, पण परंतु वापरून संयुक्त; तर जरी-तरी वापरून मिश्र वाक्य करता येते.

उदा:त्यला निमंत्रण दिले. तो आला नाही.
अ)निमंत्रण देऊनही तो आला नाही. (केवल वाक्य)
ब)त्याला निमंत्रण दिले; परंतु तो आला नाही. (संयुक्त वाक्य)
क)जरी त्याला निमंत्रण दिले; तरी तो आला नाही.(मिश्र वाक्य)

५)कारण व परिणाम असेल तर ‘मुळे/ऊन’ प्रत्यय जोडून केवल वाक्य, आणि/व वापरून संयुक्त वाक्य; तर कारण/ कारण कि वापरून मिश्र वाक्य करता येते.

उदा. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला.
अ)प्रामाणिक पाने अभ्यास केल्यामुळे/करून; विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. (केवल वाक्य)
ब)विठ्ठल ने प्रामाणिक पाने अभ्यास केला व/ आणि परीक्षेत उत्तीर्ण झाला (संयुक्त वाक्य)
क)विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. कारण कि त्याने प्रामाणिक पाने अभ्यास केला. (मिश्र वाक्य)

६)पहिल्या कृतीवर दुसरी कृती अवलंबून असेल तर पहिल्या क्रिया दर्शक शब्दाला ‘ऊन’ प्रत्यय जोडून केवळ वाक्य तसेच ‘व/आणि’ वापरून संयुक्त वाक्य करता येते.

उदा: रामूने काठी घेतली. त्याने कुत्र्याला झोडपले.
अ)रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. (केवल वाक्य)
ब)रामूने काठी घेतली आणि/व कुत्र्याला झोडपले. (संयुक्त वाक्य)
 

७)कृती व उद्देशदर्शक वाक्याचे केवळ वाक्य करण्यासाठी क्रियापदाला ‘साठी’ प्रत्यय जोडावा. ‘म्हणून’ वापरून मिश्र वाक्य करावे.

उदा:आमचे शरीर सदृढ आहे, आम्ही योगासने करतो.
अ)शरीर सदृढ होण्यासाठी आम्ही योगासने अक्रतो. (केवल वाक्य)
ब)आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. (मिश्र वाक्य)
 

८) दुसरी कृती करण्यासाठी पहिली कृती आत असेल तर पहिल्या क्रियापदाला ‘वर’ प्रत्यय वापरून केवलवाक्य, ‘आणि’ वापरून संयुक्त वाक्य जर-तर वापरून मिश्र वाक्य करावे.

उदा:उद्या सुती मिळेल. मी गावाला जाईन.
अ)उद्या सुटी मिळाल्यावर, मी गावाला जाईन. (केवल वाक्य)
ब)उद्या सुटी मिळेल आणि मी गावाला जाईन. (संयुक्त वाक्य)
क)जर उद्या सुटी मिळाली तर मी गावाला जाईन. (मिश्र वाक्य)

इतर प्रकार

१)स्वार्थी वाक्य:

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असते. हे वाक्य माहिती देणारे असते.
अ)मधु शाळेत गेला.
ब)राधा नाचत असते.
 

२)आज्ञार्थी वाक्य:

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्य आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिला एखादे काम सांगितल्यास ती आज्ञाच असते.
अ)मुलांनो, रांगेत उभे राहा.
ब)परमेश्वर, माझे भले करेल

३)विध्यर्थी  वाक्य (विधी-कर्तव्य) किंवा इच्छार्थक  वाक्य:

 

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा, इ. गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. शक्यतो अशा क्रियापदाला व/वि/वे प्रत्यय असतो. 
अ)आई वडिलांची सेवा करावी
ब)आज पाऊस पडावा
क)रांगेत उभे राहावे.

४)संकेतार्थी वाक्य:

असे केले तर तसे होईल या अर्थाने जर -तर, म्हणजे, कि ने जोडलेली वाक्य संकेतार्थी वाक्य असतात.
अ)जरा पाऊस आला तर शेतकरी आनंदित होतील.
ब)अभ्यास केला असता तर परीक्षा पास झाला असतास
क)लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ.
ड) पास झालो कि पेढे वाटीन.