भारतालील पहिले राज्य शहर ठिकाण बद्दल माहिती India first gk in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतात आतापर्यंत ज्या घटना घडल्यात त्यापैकी सर्वात अगोदर कोणती घटना घडली यांची थ्योडक्यात माहिती पाहूया. India first gk in marathi

भारतालील पहिले राज्य शहर ठिकाण बद्दल माहिती

  • भारतातील पहिला मेडिकल पार्क – चेन्नई (तमिळनाडू)
  • सांडपाणी व मलजल धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – राजस्थान
  • आधार कार्डवर चालणारे पहिले एटीएम – डीसीबी बँक, मुंबई.
  • पहिली विमान पार्क – बगोदरा (गुजरात)
  • स्वाईन फ्ल्यूची लस मोफत देणारे राज्य – महाराष्ट्र
  • पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ – गुजरात
  • बेटावरील पहिला जिल्हा – माजुली (आसाम)
  • पहिले आधार गाव – टेंभली (नंदुरबार)
  • पहिले केरोसिन मुक्त शहर – चांदीगड
  • पहिले झोपडीमुक्त शहर – चांदीगड
  • पहिली फूड बँक – दिल्ली
  • इ- गव्हर्नन्स धोरण राबविणारे पहिले राज्य- महाराष्ट्र
  • इ- कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
  • जन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
  • वायफाय सुविधा देणारे पहिले रेल्वे स्थानक – बंगळुरू
  • राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • भारतातील पहिली स्त्री बटालियन – हडीरानी (राजस्थान)
  • पहिले ई-पंचायत सुरू करणारे राज्य – महाराष्ट्र
  • ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सुविधा देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • सिकलसेल आजार ग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र
  • क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • युवा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • भूजलसंबंधी कायदे करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमवर नोटा पर्याय देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • सामाजिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • सेवा हमी कायद्यातील 369 सेवा ऑनलाइन देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
  • डिजिटल लॉकर सुविधा देणारी पहिली नगरपालिका – राहुरी (अहमदनगर)
  • ऑनलाइन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य – गुजरात
  • ई-रेशन कार्ड देणारे पहिले राज्य – नवी दिल्ली
  • पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य – राजस्थान
  • देशातील पहिले ग्रीनफील्ड खाजगी विमानतळ – अंदल (पश्चिम बंगाल)
  • पहिले धूम्रपानमुक्त शहर – कोहिमा (नागालँड)
  • आशियातील सर्वांत स्वच्छ गाव – मेलीनॉन्ग (मेघालय)
  • पदवीपर्यन्त लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य – तेलंगणा
  • बालकच्या जन्मानंतर लगेच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य – हरियाणा
  • शहर प्राणी घोषित करणारे पहिले शहर – गुवाहाटी (गंगेतील डॉल्फिन)
  • गुन्हेगारांची डीएनए रेखाचित्रित करून ठेवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
  • पहिले महिला न्यायालय – माल्डा (पश्चिम बंगाल)
  • फॅट कर लागू करणारे पहिले राज्य – केरळ (14.5%)
  • खाणींचा ई-लिलाव करणारे पहिले राज्य – राजस्थान
  • आनंदी विभाग सुरू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
  • जीएसटी पारित करणारे पहिले राज्य – आसाम
  • अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
  • शेतीसाठी अर्थसंकल्प राबविणारे पहिले राज्य – कर्नाटक
  • तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – केरळ
  • तृतीय पंथीयांना पेन्शन सुविधा देणारे पहिले राज्य – ओडिशा
  • सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कोची
  • सौर ऊर्जेवर चालणारे न्यायालय – कुंटी (झारखंड)
  • ई-सिगरेटवर बंदी घालणारे पहिले राज्य – पंजाब
  • प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य- हिमाचल प्रदेश
  • थर्मोकोलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य – झारखंड
  • पहिले पोलिओमुक्त राज्य – केरळ
  • पहिले मोफत एयायफाय शहर – कोलकाता
  • पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य – सिक्किम
  • श्लोक बेटी गार्डन (फक्त मुलींसाठीचे पहिले गार्डन) – उदयपूर (राजस्थान)
  • पहिले त्सुनामी केंद्र – हैदराबाद
  • पहिले ई-न्यायालय – हैदराबाद उच्च न्यायालयात
  • एलएनजी इंधंनावरील पहिली बस – केरळ
  • पहिला बँकिंग रोबो – लक्ष्मी (सिटी युनियन बँक)
  • विमुद्रिकरण ठराव पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
  • पहिली पेमेंट बँक – एरटेल पेमेंट बँक (राजस्थान)
  • पहिले हरित शहर – आगरताळा (त्रिपुरा) (दुसरे – नागपूर)
  • रॅगिंग विरोधात कायदा करणारे पहिले राज्य – तमिळनाडू
  • सेवा हमी कायदा लागू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
  • पहिले हगणदारी मुक्त राज्य – सिक्किम
  • निर्मल भारत अभियानांतर्गत 100% स्वच्छता झालेले राज्य – सिक्किम
  • सर्वाधिक पोलिस असणारे राज्य – तमिळनाडू