विनायक दामोदर सावरकर माहिती मराठी

विनायक दामोदर सावरकर
जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र)
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर

 
वैयक्तिक जीवन शिक्षण :
०१. सावरकर हे एक हिंदुत्ववादी, मराठी भाषेतील कवी लेखक होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातीलएक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक हिंदुत्वाचेएक विशिष्ट तत्त्वज्ञानमांडणारे तत्त्वज्ञ, भाषाशुद्धी लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंतसाहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.
०२. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकर वर्षाचे असताना १८९२ साली त्यांची आई वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनीयांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगला बळी पडले.
०३. सावरकरांचेप्राथमिक शिक्षण भगुर तर माध्यमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेचीसाक्ष देतात.
०४. मार्च १९०१ मध्ये विनायकरावयमुनाबाई यांच्याशी विवाहबद्धझाले. त्याचवर्षी ते मैट्रिकची परीक्षा उत्तीर्णझालेलग्नानंतर २४ जानेवारी १९०२ रोजी त्यांनीफर्ग्युसन महाविद्यालयातप्रवेश घेतला२१ डिसेंबर १९०५ रोजी त्यांनी मुंबई विद्यापीठाचीबी.. ची पदवी मिळविली. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्तीमिळवून कायद्याच्या अभ्यासासाठीसावरकर जुलै १९०६ मध्ये लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचना स्वतः लोकमान्यटिळकांनी केली होती. मुंबईच्या विल्सन लॉ कॉलेजातून त्यांनी एलएलबी केली
०५माध्यमिकशिक्षण घेत असतानाच त्यांनी चाफेकरांकडून प्रेरणा घेतली. परांजप्यांच्याकाळया वृत्तपत्राने त्यांना राष्ट्रभक्तीची स्फूर्तीदिली. टिळकांची बुद्धी, फडकेचाफेकरांची कृत्ये काळची स्फूर्ती असा संगम त्यांच्या आयुष्यात झाला

०६सरकारी कामावर नियंत्रण ठेवता यावे, गुप्त माहिती काढावी, हेरगिरी करावी यासाठी सावरकरांनी संघटनेचेसभासद सरकारी नोकरीत ठेवले. टिळक सावरकरांचे संबंध घनिष्ठ होते ही गोष्ट गोपाल कृष्ण गोखले यांनी मोर्ले यांस सांगितली.

जानेवारी १९२५ रोजी कन्याप्रभातहिचा जन्म झाला१७ मार्च १९२७ रोजी पुत्रविश्वासयाचा जन्म.

एप्रिल १९१९ मध्ये बाबारावांच्या पत्नी सौ.येसुवहिनींचे निधन झाले१६ मार्च १९४५ रोजी वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली१९ ऑक्टोबर १९४९ रोजी धाकटे बंधु डॉनारायणरावयांचे निधन.

स्वातंत्र्य चळवळ :
०१. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानीपागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्यासाहाय्याने १९०६ साली स्थापन केली. १९०० साली स्थापन केलेली मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेचीप्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे १९०४ साली अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंतजोसेफ मॅझिनी ह्याच्यायंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.
०२सावरकरांच्याक्रांतीविचारांचा प्रभाव महाराष्ट्राबाहेरही थोर क्रांतिकारक गदर पार्टीचेलाला हरदयाल, मादाम कामा, चक्रवर्ती राजागोपालाचारी, बाळासाहेब खेर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्यापर्यंत पोहोचला होता. सावरकरांनी पुण्यामध्ये १९०५ साली दसऱ्याच्या दिवशी फर्ग्युसन कॉलेजच्या जवळ परांजपे यांच्या अध्यक्षतेखालीविदेशी कापडाची पहिली होळी केली. सावरकरांनीराष्ट्रवादया संकल्पनेलावेगळा अर्थ दिला. ‘राष्ट्रहित हाच नीतीअनीती चा निकष मानून राष्ट्राला जीवनाचे केंद्रस्थानच दिले
०३. १९०७ साली लंडनमधील इंडियाहाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी इटलीचा महान देशभक्त कवी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेतसावकरांनी सशस्त्र क्रांतीचेतत्त्वज्ञान विषद केले होते. बाबाराव सावरकरांनीहे चरित्र छापले मे १९०८ रोजी लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव साजरा केला२४ ऑक्टोबर १९०९ रोजी बैरीस्टरगांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये दसऱ्याचा उत्सव साजरा केला गेला.  
०४लंडनमध्येइंडिया हाउसमध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्वसुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचापहिला हुतात्मा शिष्य. मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचावध करून फाशी स्वीकारली. त्यास १७ ऑगस्ट १९०९ रोजी फाशी दिली गेली. स्वतंत्र आंदोलनातील मदनलाल धिंग्रा हा परकीय भूमीवरील पहिला हुतात्माठरलामे १९०९ मध्ये ते बॅरिस्टरचीपरीक्षा उत्तीर्ण झाले पण पदवी स्वीकारण्यासत्यांनी नकार दिला.
०५धिंग्रालाअटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडमध्ये जैकसन हॉल मध्ये धिंग्राच्यानिषेधाची सभा राजनिष्ठानीभरविली. तेव्हा सावरकरांनीधिंग्रावरील आरोप जोपर्यंतसिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यास समजून घेऊन निषेध करू नये असे सांगितले. त्या सभेत बॅरिस्टरपाथरने सावरकरांवर हल्ला केला पण एम.पी.टी. आचार्यांनीपाथरवर पिस्तुल रोखली
०६.जून १९०९ मध्ये त्यांचे वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेपकाळेपाणीशिक्षा ठोठावण्यातआलीत्याच काळात त्यांनी इतर देशांमधीलक्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञानआत्मसात केले. ते तंत्रज्ञान २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी चतुर्भुज अमीन याच्या हस्ते भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलानेनाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला
०७कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूतठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनलायमसदनास पाठवलेया प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या सदस्यांना फाशी झाली
०८हवापालटासाठीजानेवारी १९१० मध्ये  सावरकर फ्रान्सला गेले. मायदेशी भारतात परतण्यासाठी१३ मार्च १९१० रोजी ते इंग्लंडलाआले. नाशिकच्या प्रकरणातवापरलेली पिस्तुले सावरकरांनीधाडली होती. याचा सुगावा ब्रिटिशांना लागला होता. त्यामुळे इंग्लंडमध्येपोहोचताच ब्रिटिशानी सावरकरांनातात्काळ अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला
०९खटला भारतात चालविण्यासाठी समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना जुलै १९१० रोजी सावरकरांनी फ्रांन्सच्यामॉर्सेलिस बेटाजवळ बोटीच्यापोर्टहोलमधून उडी मारली. त्यांनी पोहत फ्रान्सचासमुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांनाभाषेच्या समस्येमुळे सावरकरांचेम्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनीत्यांना परत अटक करून भारतात आणले
१०२२ जुलै १९१० रोजी त्यांना मुंबईत आणले गेले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. २४ डिसेंबर १९१० रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. परंतु पुन्हा ३१ जानेवारी२०११ रोजी सरकारविरुद्धयुद्धास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याचीशिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली

११ जुलै १९११ पासून अंदमानच्याकारावासास प्रारंभ झाला.  अंदमानच्या काळकोठडी बाभळीच्याकाट्यांनी त्यांनी तुरुंगाच्याभिंतीवर महाकाव्ये लिहिली.अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांनाभारताचे बदलते राजकारण दिसत होते. हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनीओळखले.

१२नोव्हेंबर १९२० मध्ये धाकटे बंधु डॉनारायणरावांनी अंदमान कारागृहात जाऊन सावरकरांची भेट घेतली मे १९२१ रोजी बाबाराव आणि तात्यारावदोघांची अंदमानातून भारतात पाठवणी१९२१ साली अलिपूर(बंगाल) आणि १९२२ साली  रत्नागिरीयेथील बंदिवासात ठेवण्यातआले.

१३विठ्ठलभाईपटेल, रंगस्वामी अय्यंगारयांसारख्या नेत्यांनी सावरकरांच्यासुटकेसाठी प्रयत्न चालविलाखुद्द सावरकरांनी ब्रिटीशांकडेमाफीचा अर्ज सादर केला. त्यानंतर तत्कालीनभारताचे व्हाईसरॉय गवर्नर यांनी काहीं अटींवर जानेवारी१९२४ रोजी सावरकरांचीतुरुंगातून मुक्तता केली.

फेब्रुवारी १९४८ रोजी गांधीवधानंतर सुरक्षानिर्बंधान्वये सावरकरांना अटक झाली. १० फेब्रुवारी १९४९ गांधीवध अभियोगातून निष्कलंकसुटका झाली एप्रिल १९५० रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अलींची दिल्लीला घेतली भेट म्हणून अटक आणि बेळगाव कारागृहवास झाला.

सामाजिक जीवन :
०१. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे, हे सावरकरांनीलक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली
०२. हिंदू धर्मात असलेली अस्पृश्यतात्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांनी रत्नागिरीमधीलवास्तव्यामध्ये जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी हिंदू भगिनींचेहळदी कुंकू, सह भोजने, मिश्र भोजने भजनकीर्तन आयोजित केले. त्यांनंतर सर्वांसाठीपतित पावन मंदिरसुरू केले सर्वांसाठी सामाईक भोजनालयहीसुरू केले. ‘पतित पावनमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सावरकरांनी डॉ. आंबेडकरांना बोलविले होते
०३जातीव्यवस्थेतून  समाजव्यवहारात काही बंधने निर्माण झाली आहेत. सावरकर त्यांना सप्तशृंखला असे म्हणतात. वेदबंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी, भोजन बंदी, विवाह बंदी या सात शृंखला आहेत. समाजाने वेद वाङ्मय झुगारून द्यावे असे त्यांनी हिंदू समाजाला आवाहन केले
०४१९२४ ते १९२६ या काळात शुद्धीबंदी मोडून त्यांनी पूर्वी धर्मांतरकेलेल्या अनेक मुस्लिमांनाहिंदू धर्मात प्रवेश दिला. विवाहबंदीच्या कल्पनेलात्यांचा सक्त विरोध होता. याबाबत सावरकरांनीअत्यंत सावध भूमिका घेतली होती. ‘उभयपक्षीयोग्य ती दक्षता घेऊन आंतरजातीय विवाह व्हावेत असे सावरकरांचेमत होते.  
०५सावरकरांनीआपल्या हिंदुत्वनिष्ठ राजकारणातराष्ट्र आणि राज्य या दोन वेगळ्या संकल्पना मानल्या होत्या. त्यांच्या हिंदू राष्ट्र या संकल्पनेत हिंदुशिवायअन्य धर्मियांना स्थान देता येत नव्हते. परंतु राज्य या संकल्पनेत अहिंदूंना समान न्याय देण्याची त्यांची तयारी होती. ‘राजकारणाचेहिंदूकरण हिंदूंचेलष्करीकरणही सावरकरांचीघोषणा होती. साहित्यिकांनालेखण्या मोडा, बंदुका घ्याअसा सल्ला त्यांनी दिला१० जानेवारी १९२६ रोजी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थश्रद्धानंदसाप्ताहिक मुंबईत सुरू केले
मार्च १९२७ रोजी रत्नागिरीत गांधीजी  सावरकर यांच्यात भेट आणि चर्चा झाली२२ सप्टेंबर १९३१ नेपाळचे राजपुत्रहेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली२२  जून१९४१ रोजी सुभाषचंद्र बोस अवचित सावरकरसदनात येऊन भेटले.
०६सावरकरांनीअतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरीजन्मला तर त्याला म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांतज्ञनिघाला तर त्यालाज्ञ म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजाअसो कीज्ञअसो
हिंदू महासभेचे कार्य :
०१. अंदमान येथून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीतसावरकर १९२४ ते १९३७ पर्यंत सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेतहोते. १९३७ साली भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या प्रांतात कॉंग्रेस सत्तेवर आली. कुपर मंत्रीमंडळातील अर्थमंत्री जमनादास मेहता यांच्या प्रयत्नानेस्थानबद्धतेतून सावरकरांची१० मे १९३७ रोजी बिनशर्त मुक्तता झाली. त्यानंतर त्यांनी क्रांतीकारकांशी संबंध ठेवला नाही. १९२३ साली मुंबईचे राज्यपाललाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्च खाली.
०२१९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्यासभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनीत्यांनी हिंदू महासभेचेकार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठीलढा दिला
साहित्य :
०११८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. ‘अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमरहा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचानिष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, १८५७ च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला
०२ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला होता. म्हणून हा मराठी ग्रंथ महाराष्ट्रात कोणी छापत नसल्यामुळे त्याचे इंग्रजीतभाषांतर केले, तेही लंडनमध्ये कोणी छापत नाही म्हणून ते हॉलंड येथे छापले. या ग्रंथाचे प्रकाशन बॅरिस्टर राणा यांच्या अध्यक्षतेखाली १८५७ च्या उठावाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त १० मे १९०७ रोजीइंडिया हाउसच्या सभागृहातभरगच्च उपस्थितीत समारंभपूर्वकझाले
०३ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखितसावरकरांचे मित्र कुटिन्होह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्धझाले. त्याचदरम्यान त्यांनी लिहिलेल्या शिखांच्या इतिहासाच्यातीन हस्तलिखित प्रती प्रकाशनाविना राहिल्या
०४स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीतप्रतिबिंबित झाले आहे. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्यावर्षी लिहिलेला स्वदेशीचाफटका. सावरकरांनी त्यांच्याकविता महाविद्यालयात, लंडनच्यावास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीतआणि रत्नागिरीत रचल्या. तत्कालीन लोकप्रियअसलेल्याकेसरीकाळया वृत्तपत्रांतून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत
०५सावरकरांनीअंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या. त्या जुलै २०१३ मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रितझाल्या
०६सावरकरांनीविचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचेप्रत्यक्ष कार्य केले. अर्थसंकल्प (बजेट), उपस्थित (प्रेजेंट), क्रमांक (नंबर), क्रीडांगण (ग्राउंड), गणसंख्या(कोरम), गतिमान, चित्रपट (सिनेमा), झरणी (फाऊन्टनपेन), टपाल (पोस्ट), तारण (मॉटर्गेज), त्वर्य/त्वरित (अर्जंट), दिग्दर्शक (डायरेक्टर), दिनांक (तारीख), दूरदर्शन(टेलिव्हिजन), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाऊड स्पीकर), नगरपालिका (म्युनिसिपालिटी), नभोवाणी (रेडिओ), निर्बंध (कायदा), नेतृत्व (लीडरशिप), नेपथ्य, परीक्षक (एक्झॅमिनर), पर्यवेक्षक(सुपरवायझर), प्रतिवृत्त (रिपोर्ट), प्राचार्य (प्रिन्सिपॉल), प्राध्यापक(प्रोफेसर), बोलपट (टॉकी), मध्यांतर (इन्टर्व्हल), महापालिका(म्युुनिसिपल कॉर्पोरेशन), महापौर (मेयर), मुख्याध्यापक (हेड मास्टर), मूल्य (किंमत), विधिमंडळ (लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली), विशेषांक (खास अंक), विश्वस्त (ट्रस्टी), वेतन (पगार), वेशभूषा (कॉश्च्यूूम), शस्त्रसंधी (सीझ फायर), शिरगणती (खानेसुमारी), शुल्क (फी), संचलन (परेड), सार्वमत (प्लेबिसाइट), सेवानिवृत्त(रिटायर), स्तंभ, (कॉलम), हुतात्मा (शहीद)असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत
०७वि.दा. सावरकर हे मुंबई येथे १५ एप्रिल १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेअध्यक्ष होते.वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. १९४३ साली ते अखिल  महाराष्ट्र नाट्यसंमेलन अध्यक्ष होते .
०८भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, हिंदु पदपादशाही, सावरकरांच्या गोष्टी भाग, सावरकरांच्या गोष्टी भाग, काळेपाणी, मोपल्यांचे बंड अर्थात्मला काय त्याचे ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
०९माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग (आत्मचरित्र पूर्वपीठिका), हिंदुत्व, हिंदुराष्ट्र दर्शन, हिंदुत्वाचे पंचप्राण ही आत्मचरित्रपर ग्रंथ.
१०मॅझिनीच्याआत्मचरित्राची प्रस्तावनाअनुवादित, गांधी गोंधळ, लंडनची बातमीपत्रे, गरमागरम चिवडा, तेजस्वी तारे, जात्युच्छेदकनिबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, स्फुट लेख, सावरकरांचीराजकीय भाषणे, सावरकरांचीसामाजिक भाषणे हे त्यांचे लेखसंग्रह आहेत.
११संगीत :शाप, संगीत संन्यस्त खड्, संगीत उत्तरक्रिया, बोधिसत्व– (अपूर्ण) ही नाटके.
१२महाकाव्ये, कमला, गोमांतक, जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला, विरहोच्छ्वास, सप्तर्षी, सावरकरांच्याकविता हे त्यांनी लिहिलेले कविता संग्रह आहेत.DA5XDmKWsAAcU4k

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here