उद्योगधंदे Undertaking

  • उद्योगधंद्यात महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे. भारताच्या एकुण औद्योगिक उत्पादनाच्या स्थुल मुल्यांपैकी २१% स्थुल उत्पादन मुल्य महाराष्ट्रात होते.
  • उद्योगधंद्यांना विकसित भूखंड, रस्ते, पाणी, तयार गाळे ई. सोयी पुरविणारे महामंडळ – महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ-१९६३
  • एम.आय.डी.सी. व सिडकोने राज्यात ३६ आय.टी.पार्क विससीत केले असून खाजगी २५३ आय.टी. पार्क पैकी ४६ आय.टी. पार्क चे काम सुरु आहे.
  • ३१ मार्च २०१० प्रर्यंत एम.आय.डी.सी. ने २६० औद्योगिक वसाहती विकसित केल्या होत्या. त्यात ३०,३३५ कारखाने होते व ८.८० लाख इतका रोजगार उपलब्ध करुन दिला.
  • अविकसित भागात नव्याने उद्योग स्थापण्यासाठी मध्यम व मोठ्या उद्योगांना वित्तीय सहाय्य पुरविणारे तसेच प्रदेशस्थ भारतीयांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, एकत्रित प्रोत्साहन योजना राबविणारे महामंडळ – महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणुक महामंडळ (सिकॉम) १९६६
  • लघु व मद्यम उद्योगांना स्थावर मालमत्ता घेण्यासाठी गिर्घकालीन वित्त पुरवठा करणारी संस्था – महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ -१९६२
  • महावित्तचे कार्यक्षेत्र – महाराष्ट्र, गोवा, दीव व दमण
  • लघुउद्योगांना कच्चा मल पुरविणे, त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीची, साठवणुकीची व्यवस्था, करणे. आयातीस सहाय्य व निर्यातीस प्रोत्साहन देते – महाराष्ट्र राज्य लधुउद्योग विकास महामंडळ-१९६२
  • राज्यातील एम.एस.एस. आय.डी.सी.ची २००९-१० मध्ये उलाढाल – ३२७.५१ कोटी
  • स्टिल अँथँरिटी ऑफ इंडियाच्या लोखंड व पोलाद वितरणासाठी राज्यातील जबाबदारी – महाराष्ट्र राज्य लघु विकास महामंडळाची
  • महाराष्ट्र ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन (मेल्टॉन) – मुंबई (१९७८)
  • लघु व कुटिर उद्योगांना सर्व सहाय्य एकत्रितपणे मिळण्यासाठी केंद्राने सुरू केलेली योजना – जिल्हा उद्योग केंद्र (१९७८) (जॉर्ज फर्नांडिस)
  • जगातील कानाकोप-यात मराठी व्यावसायिक व उद्योजकांना एक्त्र क्रुन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेली संस्था – मरठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रिज (१९९४ च्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनात स्थापन)
  • महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान धोरण – १५ ऑगस्ट १९९८
  • महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान वर्ष – १९९९
  • महाराष्ट्रात एकूण १०४ कापड गिरण्या आहेत. त्यापैकी एक्ट्या मुंबईत ५४ गिरण्या आहेत.
  • भारताच्या मागांच्या संख्येत महाराष्ट्र पहिला, चात्यांच्या संख्येत दुसराव कापड गिरण्यांच्या संख्येत तिस-या क्रमांकावर आहे.
  • महाराष्ट्रातील हातमागांची प्रमुख केंद्रे – नागपूर व सोलापूर
  • राज्यात सर्वाधिक हातमाग – मालेगाव
  • महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळ – नागपूर
  • महाराष्ट्रातील वीज मागावर कापड निर्मिती करणारी प्रमुख केंद्रे – भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी
  • भारतातील सर्वांत मोठी सहकारी सुतगिरणी – इचलकरंजी
  • महाराष्ट्र राज्य यंत्रमाग माहामंडळ – पुणे
  • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ – मुंबई
  • देशातील पहिली सहकारी सुतगिरणी जिल्हा विणकर सहकारी संस्था (इचलकरंजी) कोहापुर
  • महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात देशात आघाडीवर असून ३४% जास्त साखर उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते.
  • महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना १९२० मध्ये बेलापूर (अहमदनगर) येथे सुरु झाला.
  • देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर (लोणी-अहमदनगर) येथे १९४९ मध्ये सुरु झाला.
  • भारतातील सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.
  • प्रादेशिक दृट्या विचार करता पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग केंद्रीत झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत.
  • आशिया खंडातील सर्वाधिक गाळण क्षमता असणारा साखर कारखाना – वसंतदादा सहकारी साखर कारखाना, सांगली
  • २००८ मध्ये भारतात एकूण ६१५ साखर कारखाने होते. त्यापैकी महाराष्ट्रात १८८ साखरकारखाने होते. सध्या राज्यात २०१ नोंदणीकृत साखर कारखाने असून त्यापैकी १७२ सहकारी क्षेत्रातील आहेत. २०१ कारखान्यांपैकी १४१ कारखाने चालू असून त्यापैकी १०३ कारखाने तोट्यात आहेत.
  • २००६-०७ मध्ये देशात ३१७ सहकारी साखर कारखाने होते. पैकी महाराष्ट्रात १६५ सहकारी साखर कारखाने होते.
  • साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राची साखर उत्पादन ९०.९९ लाख टन होते. तर उर्वरित भारताचे १९२ लाख टन होते.
  • १ मार्च २००२ च्या शासनाच्या धोरणानुसार खुल्या बाजारातील साखार व लेव्ही साखरेचे प्रमाण – ९:१
  • महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनात रसायने व रासायनिक पदार्थांच्या सर्वाधिक वाटा (१८.७%) आहे. त्यानंतर खाद्यवस्तू (१४.५%), सुती कापड व तयार कपडे (८.३%) यांचा क्रमांक लागतो.
  • रासायनिक वस्तुंचे ४०% उत्पादन एक्ट्या महाराष्ट्रात होते.
  • महाराष्ट्रातील पहिला सिमेंट कारखाना – चंद्रपुर
  • वनस्प्तती तूप निर्मिती पाचोरा (जळगांव) येथे होते.
  • देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत – इचलकरंजी
  • सैनिकांनी सैनिकासाठी चालवलेली एकमेव सहकारी बँक – सातारा
  • सिडकोची स्थापना – १९७०
  • महाराष्ट्रातील विशेष आर्थिक क्षेत्र – १) द्रोणगीरी (नवी मुंबई) २) बुटीबोरी (नागपुर) ३) कागल (कोल्हापुर) ४) सिन्नर (नाशिक) ५) शेंद्रे (औरंगाबाद) ६) गुहागार (रत्नागिरी)
  • शेतमाल निर्यात क्षेत्र – पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर व सातारा
  • हिरे व अभूषणे पार्क – नवापूर (नंदुरबार)
  • टेक्साटाईल पार्क व मिहान प्रकल्प (कलकूड) – मणेराजूरी (सांगली), बुटीबोरी (नागपुर) फ्लोरिकल्चर पार्क – तळेगांव (पुणे),
  • भारतातील प्रमुख आय.टी. पार्क – साल्टलेक सिटी (कोलकाता), सायबराबाद (हैद्राबाद), पुणे, अहमदाबाद, बंगळ्रुर, कोहिमतपूर
उद्योग प्रमुख केंद्र
शेती अवजारे व ऑईल इंजिन सातारा,पुणे,इचलकरंजी,कोल्हापूर,किर्लोसकरवाडी
कागद गिरण्या बल्लारपूर(चंद्रपूर), खेपोली (रायगड), भिगवन (इंद्रापूर), थेरगाव (चिंचवड-पुणे)
खत कारखाने तुर्भे(मुंबई) व थळ वायशेत (रायगड)
कचेच्या वस्तू चंद्रपूर, तळेगाव (पुणे), ओगलेवाडी, बागणी (सांगली)
आडकित्ते उद्गिर (लातूर)
  • डिसेंबर २०१० अखेर २३३ विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) चे प्रस्ताव प्रप्त झाले होते. त्यापैकी १४३ प्रस्ताव मान्य करण्यात आले आसून ६३ पूर्वीच अधिसूचित झालेले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव आय.टी. क्षेत्रात आहेत.
लघुउद्योग केंद्र लघुउद्योग केंद्र
पीतांबर व पैठण्या येवले (नाशिक) साड्या व लुगडी इचलकरंजी
हिमरु शाली औरंगाबाद सुती व रेशमी साड्या नागपूर, अहमदनगर
पैठण्या व शालू पैठण पामतेल गिरणी सिंधुदुर्ग
खेळणी सावंतवाडी विडी उद्योग सिन्नर, गोंदिया
चर्मोद्योग कोल्हापूर गुजराती फेटे पैंठण
empsckida