राजा राम मोहन रॉय यांच्या बद्दल माहिती Raja Ram Mohan Roy Mahiti in Marathi

Raja Ram Mohan Roy Mahiti in Marathi

समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. तसेच सामाजिक प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून ख्याती असा उल्लेख केला जातो. यांचा जन्म 22 मे (1772-1833), राधा नगर ( बरद्वान ,पश्चिम बंगाल) येथे झाला. त्यांचा पर्शियन, अरबी, संस्कृत ,इंग्रजी ,फ्रेंच ,ग्रीक, लॅटिन, हिब्रू आदी भषांवर प्रभुत्व होते.

Raja Ram Mohan Roy Information in Marathi

Raja Ram Mohan Roy Information in Marathi
Raja Ram Mohan Roy Information in Marathi

राजा राम मोहन रॉय यांच्या बद्दल माहिती

शिक्षण विषयक कार्य:

  • 817 साली कोलकता येथे डेव्हिड हेअर यांच्या सहाय्याने ‘हिंदू कॉलेज’ ची स्थापना.
  • 1822 कोलकाता येथे ‘अ‍ॅग्लो हिंदू ‘स्कूलची स्थापना.
  • 1826 हिंदू एकेश्वरीवादाच्या प्रसारासाठी कोलकाता येथे ‘वेदांत कॉलेजची’ स्थापना.

 

राजा राम मोहन रॉय यांच्या धार्मिक सुधारणा :

  • 1815- साली कोलकत्ता येथे ‘आत्मीय सभेची’ स्थापना.
  • 1822 – ब्रिटिश इंडिया युनिटी रियल असोसिएशनची स्थापना.
  • 20 ऑगस्ट 1828 –  ब्राह्मो समाजाची स्थापना. (एकेश्वरवाद मूर्तिपूजा निषिद्ध ही ब्राह्मो समाजाची प्रमुख तत्त्वे)

Raja Ram Mohan Roy Sort Note

राजा राम मोहन राय यांचे वृत्तपत्र विषयक कार्य:

  • 1821 – संवाद हे  पाक्षिक सुरू.
  • 1822 – ‘मिरात – उल्-अखबार’ हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र सुरू केले.
  • ‘ब्रह्मनिकल मॅगझिन’ या मासिकातून ब्राह्मो समाजाच्या तत्त्वांचा प्रसार केला.
  • ‘वज्रसुची’ या संस्कृत उपनिषदाचे भाषांतर केले.

 

राजा राम मोहन राय यांचे स्त्री सुधारणा विषयक कार्य:

  • विधवा – विवाहाचा पुरस्कर्ता.
  • 1829 लॉर्ड विल्यम बेटिंग याचा सातत्याने पाठपुरावा करून सतीबंदीचा कायदा संमत करून घेतला.
  • भारतात स्त्री – दास्याचा विमोचनाची पहिली चळवळ राजा राम मोहन राय यांनी उभारली.

 

राजा राम मोहन रॉय यांच्या विषयी संकीर्ण माहिती :

  • मानवतावादी समाज सुधारक होते.
  • 1823 आली दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींनी स्वातंत्र्यासाठी आपल्या माय देशाविरुद्ध बंड पुकारले त्यावेळी रॉय यांनी कोलकत्यात आनंदोत्सव साजरा केला.
  • अकबर शहा दुसरा या बादशहाची पेन्शन पुन्हा सुरू व्हावी यासाठी लंडनमध्ये प्रयत्न केले.
  • अकबरशहाने राॅय यांना ‘राजा’ ही पदवी दिली.
  • 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिस्टॉल (इंग्लंड) येथे रॉय यांचे निधन झाले.
  • रॉय यांच्या निधनानंतर 1844साली ‘ महर्षी देवेंद्रनाथ टागोर ‘यांनी ब्राह्मो समाजाची धुरा वाहिली.
  • देवेन्द्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांच्यात वाद झाल्यानंतर 1866 साली केशवचंद्र सेन यांनी ‘भारतीय ब्राह्मो समाजा ‘ ची स्थापना केली.
  • यादरम्यान देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील मूळचा समाज हा ‘आदी ब्राह्मो समाज’ या नावाने ओळखला जाऊ लागला.
  • भारतीय ब्राह्मण समाजातून केशवचंद्र सेन यांचे अनुयायी फोटून त्यांनी ‘साधारण ब्राह्मो समाजा’ ची स्थापना केली.

 

ब्राह्मो समाजाचे प्रबोधनातील योगदान:-

  1. हिंदू संस्कृतीचा ‘आत्मा’ जागृत करण्याचे कार्य ब्राह्मण समाजाने केले.
  2. ‘फर्स्ट व्हाईस ऑफ फ्रीडम’ या शब्दात डॉक्टर शिरीष कुमार मित्रा यांनी ब्राह्मण समाजाच्या कार्याचे कौतुक केले.
  3. 29 ऑक्टोबर 1870 रोजी केशवचंद्र सेन यांनी ‘इंडियन रेफॉर्मस असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली.