संख्यावाचन 1 ते 100

 1. दशमान पध्दतीमध्ये 0 ते 9 अशा अंकांच्या 10 खुणा आहेत. 9 नंतर येणा-या 10 या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत 10 आहे असे मानले जाते.
 2. त्यामुळे 10 या संख्येचे वाचन “एक दशक” असे करणे अधिक योग्य ठरेल. मात्र आपण व्यवहारात या संख्येचे वाचन “दहा” असेच करतो.
 3. याप्रमाणेच 10 च्या पुढील संख्यांचे वाचन करता येईल –
  1. 11 = एक दशक, एक एकक
  2. 12 =  एक दशक, दोन एकक
  3. 35  = तीन दशक, पाच एकक
  4. 97 = नउ दशक, सात एकक
 4. मात्र व्यवहारात 1 ते 100 या संख्यांसाठी वेगवेगळी नावे आहेत. उदा. 11  = अकरा, 12  = बारा, 35  = पस्तीस, 97  = सत्याण्णव.
 5. ही व्यावहारिक नावे म्हणत असतानाच या संख्यांची किंमत दर्शविणारी नावेही लक्षात ठेवावित.
संख्यावाचन 1 ते 1000
 1. 99 ही दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
 2. 99 = 9 दशक, 9 एकक.
 3. यानंतरची संख्या 100. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत 100 किंवा “1 शतक” एवढी आहे.
 4. शतकी संख्यांचे वाचन करताना शतकस्थानच्या अंकापुढे “शे” जोडून दशक-एकक स्थानच्या अंकांनी मिळून बनलेली संख्या त्यापुढे वाचतात.
 5. उदा.

   

   

  शतक
  दशक
  एकक
  संख्येचे वाचन
  3
  2
  1
  तीनशे एकवीस
  5
  9
  2
  पाचशे ब्याण्णव
  9
  0
  2
  नउशे दोन

   

   

संख्यावाचन 1 ते 100000
 1. 999 ही तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
 2. 999 = 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
 3. यानंतरची संख्या 1000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “एक हजार” एवढी आहे.
 4. 9999 ही चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
 5. 9999 = 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
 6. यानंतरची संख्या 10000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “दहा हजार” एवढी असते.
 7. संख्यांचे वाचन करताना “दहा हजार” व “हजार” या स्थानांवरील संख्यांचे एकत्रित वाचन केले जाते.
 8. उदा.

   

  दहा हजार
  हजार
  शतक
  दशक
  एकक
  संख्येचे वाचन
  2
  4
  5
  3
  2
  चोवीस हजार पाचशे बत्तीस
  9
  0
  0
  2
  नउ हजार दोन
  3
  5
  0
  1
  2
  पस्तीस हजार बारा

   

 9. 9002  =  9 हजार, 0 शतक, 0 दशक, 2 एकक. यामध्ये शतक व दशक स्थानचा अंक 0 असल्याने त्याचे वाचन होत नाही. मात्र मनामध्ये ही संख्या वाचताना नउ हजार, शून्यशे, शून्य-दोन अशी वाचणे फायद्याचे ठरेल.
संख्यावाचन 1 ते 10000000
 1. 99,999 ही पाचअंकी सर्वात मोठी संख्या आहे.
 2. 99,999 = 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
 3. यानंतरची संख्या 1,00,000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “एक लाख” एवढी असते.
 4. 9,99,999 ही सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
 5. 9,99,999 = 9 लाख, 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
 6. यानंतरची संख्या 10,00,000 असते. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “दहा लाख” एवढी असते.
 7. संख्यांचे वाचन करताना “दहा लाख” व “लाख” या स्थानांवरील अंकांचे वाचन एकत्र केले जाते.
 8. उदा.

   

  दहा लाख
  लाख
  दहा हजार
  हजार
  शतक
  दशक
  एकक
  संख्येचे वाचन
  2
  1
  4
  2
  9
  2
  7
  एकवीस लाख, बेचाळीस हजार, नउशे सत्तावीस
  9
  2
  0
  0
  0
  2
  5
  ब्याण्णव लाख पंचवीस
  7
  4
  0
  1
  0
  0
  2
  चौ-यात्तर लाख एक हजार दोन

   

 9. 9200025 –
  9200025
  92
  00 025
 10. यानंतर मनात वाचन करताना ही संख्या ब्याण्णव लाख, शून्य-शून्य हजार, शून्यशे पंचवीस अशी वाचावी. प्रत्यक्ष वाचन करताना शून्य किंमत असणा-या स्थानांचे वाचन करु नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here