आजचे 10 प्रश्न (4 डिसेंबर 2020)

मित्रांनो खाली संकलित केलेले प्रश्न नामांकित लेखकांच्या पुस्तकांमधून केले आहेत. प्रश्नांची उत्तरे खालिल बाजूस दिलेले आहेत.

प्रश्न.1] बी.आय.ए.आर. कायद्याचे उद्दिष्ट …………………. होते?

A. आजारी उद्योगांना चालना देणे
B. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे
C. मोठया खाजगी उद्योगांना पतपुरवठा करणे
D. भारतीय उद्योगांमध्ये परकीय भांडवल वापरण्यास परवानगी देणे

 

प्रश्न.२] भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग (विकास व नियमन) कायदा कधी करण्यात आला?
A. 1948
B. 1951
C. 1969
D. 1973

 


प्रश्न.३] भारताच्या सामाजिक – आर्थिक विकासात पुढीलपैकी कोणती उद्योगांची भूमिका नाही?

A. कृषी विकासाला प्रोत्साहन देणे.

B. रोजगार ‍निर्मितीस चालना देणे.
C. दारिद्रय निर्मूलन करणे.
D. नाणे बाजार व भांडवल बाजार विकसित करणे.

 
प्रश्न.४] महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने पुढील कोणत्या भागात आढळतात?
A. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली
B. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी
C. विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा
D. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश

 


 

प्रश्न. ५] खालीलपैकी कोणता औद्योगिक वित्ताचा बाह्य स्त्रोत आहे?
A. अभियान भाग
B. साधारण भाग
C. नफ्याची पुनर्गुंतवणूक
D. ऋण पत्रे

प्रश्न. ६] भारतीय औद्योगिक पूनर्रचना महामंडळाकडे खालील कार्ये सोपविलेली होती.त्यापैकी पुढीलपैकी कोणते / ती विधान / ने चुकीचे / ची आहे/ आहेत?
A. आजारी उद्योगांना वित्तीय मदत देणे.
B. आजारी उद्योगांना व्यवस्थापकीय आणि तांत्रिक मदत देणे.
C. आजारी उद्योगांच्या प्रकरणा संबंधात बँकेला समुपदेशन देणे.
D. आजारी उद्योगांना वाहतूक आणि दळणवळण सेवा देणे.

प्रश्न. ७] कंपनी कायदा 2013 मध्ये कलम 135 अनुसार भारताने मोठया व नफा कमावणा-या कंपन्यांवर सामाजिक जबाबदारी खर्चाची सक्ती केली आहे. असे केलेला भारत हा……?
A. तिसरा देश आहे.
B. पाचवा देश आहे.
C. सातवा देश आहे.
D. एकमेव देश आहे.

प्रश्न. ८] लघुउद्योग विकास संघटना लघुउद्योगांना प्रामुख्याने कोणत्या गोष्टीसाठी आधार देण्यासाठी ओळखली होती?

A. वित्त उभारणी
B. निर्यातीस प्रोत्साहन
C. विपणनास सहाय्य
D. कुशल कामगारांची तरतूद

 


प्रश्न. ९] १९९१ पूर्वी, लघुउद्योग बंद पडण्याचे सर्वात महत्वाचे कारण होते ?
A. बाजारविषयक अडचणी
B. आर्थिक अडचणी
C. कामगारविषयक अडचणी
D. कच्च्या मालविषयक अडचणी

प्रश्न. १०] महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत अधिक हिस्सा खालीलपैकी कोणता घटक दर्शवितो?

A. सार्वजनिक क्षेत्र
B. खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग
C. धातू वस्तू
D. लघू उद्योग

प्रश्न. ११] १९८७ मध्ये निर्माण झालेल्या औद्योगिक आणि वित्तीय पुर्नघटना मंडळाचे ध्येय कोणते होते?
A. वित्तीय क्षेत्राचे पुनरूत्थान

B. बँकिंग आणि औद्योगिक क्षेत्राचे आधुनिकीकरण

C. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांचे पुनर्वसन
D. वरीलपैकी एकही नाही.

प्रश्न. १२. खालीलपैकी कोणते उद्योग भारताचे आधारभूत उद्योग नाही?
A. कोळसा, कच्चे तेल आणि विद्युत
B. तेल परिशोधन, कच्चे तेल आणि कोळसा
C. कोळसा, सिमेंट आणि लोह – इस्पात

D. कच्चे तेल, प्राकृतिक गॅस आणि तेल परिशोधन


ANS- 1-A, 2-B, 3-D, 4-D, 5-D, 6-D, 7-D, 8-B, 9-B, 10-B, 11-C, 12-D

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here