चालू घडामोडी : Daily Current Affiars 15 May 2019

helicoptor
अमेरिकेकडून भारताला पहिले अपाचे लढाऊ हेलीकॉप्टर मिळाले
 • 10 मे रोजी भारतीय हवाई दलाकडे ‘अपाचे’ कंपनीचे AH-64E (I) हे प्रथम लढाऊ हेलीकॉप्टर औपचारिकपणे सोपविण्यात आले.
 • हे एक आधुनिक हेलीकॉप्टर आहे, जे सर्व परिस्थितीत हल्ला करण्यास सक्षम आहे. कमी उंचीवरचेही हवाई आणि जमिनीवरील लक्ष्ये वेढू शकते.
 • सप्टेंबर 2015 मध्ये 22 अपाचे हेलीकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी अमेरिकेचे सरकार आणि बोईंग कंपनीशी करार केला होता.
 • त्यानुसार, AH-64 हेलीकॉप्टर खरेदी केले जात आहेत. सुरक्षेच्यादृष्टीकोनातून पंजाबच्या पठानकोट एअरबेस आणि आसाम जोरहटमध्ये हे अपाचे हॅलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत.
‘जेट एअरवेज’चे मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांचा राजीनामा
 • आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे सह-मुख्य कार्यकारी आणि मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांनी मंगळवारी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 • हवाई सेवा क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी राहिलेल्या जेट एअरवेजवर सध्या स्टेट बँकेचे वर्चस्व आहे. कंपनीकडे स्टेट बँकेसह विविध १८ व्यापारी बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.
 • ही सेवा सुरू राखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे आंशिक वेतन देण्यासाठी आवश्यक निधी बँकेने नाकारल्याने दोन आठवडय़ांपासून तिची विमाने जमिनीला खिळली आहेत.
 • या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे अमित अग्रवाल यांनी राजीनामा दिला. अमित अग्रवाल यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

 

 

न्या. पी. आर. रामचंद्र मेनन: छत्तीसगडचे नवे मुख्य न्यायाधीश
 • न्यायमूर्ती पी. आर. रामचंद्र मेनन यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.
 • छत्तीसगडचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. न्या. मेनन आधी केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
 • लोकपालमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केल्यानंतर मुख्य न्यायाधीश अजय कुमार त्रिपाठी यांनी राजीनामा दिला, त्यानंतर छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद रिक्त होते.

 

जागतिक व्यापार संघटना (WTO)
 • जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि त्याचे 164 देश सभासद आहेत.
 • 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.
 • WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते.
 • सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.

 

क्रिकझोन‘ :
 • महिलांच्या क्रिकेटसाठी समर्पित असलेली जगातली पहिली नियतकालिक पत्रिका ‘क्रिकझोन’ या नावाने महिलांच्या क्रिकेटसाठी समर्पित असलेली जगातली पहिली नियतकालिक पत्रिका सुरू करण्यात आली आहे.
 • यश लाहोटी हे या पत्रिकेचे प्रकाशक आहेत. पत्रिकेच्या पहिल्या आवृत्तीत भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंधाना यांच्यासंदर्भात लेख छापण्यात आला आहे. तसेच मिताली राज, हरमनप्रीत कौर यांचाही उल्लेख आहे.