Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

नव्या शैक्षणिक धोरणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, की नवे शैक्षणिक धोरण नोकरी देणारे आहे.

ads Code paste
नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयी गोडी वाढेल व ज्ञानाची शक्ती वाढेल असे नरेंद्र मोदी म्हणतात.  नव्या शैक्षणिक धोरणामुळे देशभर तरुण हे भविष्यात आत्मनिर्भर होऊन नोकरी शोधणारा नसून  नोकरी देणारे या धोरणावर  भर असेल. 
 युवकांना आता नोकरी करायची नाही तर स्वतःही आत्मनिर्भर व्हायचे आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे लोकांची मानसिकता बदलणे आणि युवा पिढीला आत्मनिर्भर बनवण्याचा या नव्या शैक्षणिक धोरणाचा उपयोग होईल
 21 वे शतक ज्ञानाचे शतक असून वेगाने बदलणाऱ्या जगात आपल्यालाही  वेगात बदलावे  लागेल, नव्या शैक्षणिक धोरणातील त्रुटी दूर करण्यात आल्या  आहेत एखाद्याला गणित संगीत इतिहास असे एकत्र शिकायचे असेल तर त्याला त्याच्या मर्जीनुसार शिकता येईल.


 नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणामध्ये आपुलकी वाढेल

 नव्या शैक्षणिक धोरणामुळे पहिल्या टप्प्यामध्ये स्व भाषेमध्ये शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाविषयी गोडी वाढणार असल्याचे पंतप्रधान यांनी सांगितले  याचबरोबर नव्या धोरणामुळे भारताच्याच नव्हे तर जगाच्या ही भाषा वाढतील व भारताला समृद्ध भाषांची ओळख होईल याशिवाय भारताची ज्ञानाचे  मॉडेल बनेल .  व एकात्मता ही वाढेल असे नरेंद्र मोदी म्हनाले. 

Post a Comment

0 Comments