loading...

नवीन शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीचा समावेश नाही असे असेल नवीन शिक्षण

loading...
 केंद्र सरकारने काल नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली, या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये दहावी बोर्ड व  बारावी बोर्ड परीक्षा वगळण्यात आली आहे. तसेच या नवीन शैक्षणिक धोरणात एकूण चार टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये अंगणवाडी ते पहिले पर्यंत आवडीच्या विषयानुसार मातृभाषेत शिक्षण देण्यात येईल, याच बरोबर आता या शैक्षणिक धोरणात व्यावसायिक अभ्यासक्रमाचाही समावेश असेल. या आधी 34 वर्षापूर्वी राजीव गांधी यांच्या कार्यकाळात शैक्षणिक धोरण आखण्यात आले होते. यानंतर आज शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. 

महाविद्यालयांना स्वतःचा अभ्यासक्रम तयार करता येणार.


loading...
 या नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये महाविद्यालयाची स्वायत्तता अबाधित राखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, यामध्ये महाविद्यालयांना स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. याच बरोबर परदेशी विद्यापीठांना आपली महाविद्यालय व विद्यापीठ भारतामध्ये स्थापन करण्यासही ही परवानगी देण्यात येईल असे असे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments