loading...

''सरावातून परिपूर्णतेकडे'' स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर फक्त 500 रू मध्ये (MPSC Combine Test Series 2020)

loading...

✍ आमची टेस्ट का लावावी :
 • आजपर्यंत तुम्ही खूप सराव पेपर दिले असतील पण आमच्या VIP सराव पेपरचा अनुभव एकदा नक्की घ्या.
 • अचूक, नियोजनबद्ध तयारीसाठी या सराव पेपरचा फायदा होईल.
 • यातून तुमचा आत्मविश्वास वाढून, येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

एकूण 7 टेस्ट (आयोगाच्या पॅटर्ननुसार)फी - 500 (टपाल खर्च सहित) प्रश्नपत्रिका + उत्तरपत्रिका + सखोल विश्लेषण (लिखित स्वरूपात स्पष्टीकरणे)
टेस्ट पेपर 7 मार्च नंतर संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच पोस्टाने पाठविले जातील.

✍ संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब' अभ्यासक्रमानुसार असे असतील अंदाजे प्रश्न :
 • इतिहास : 15 प्रश्न
 • भूगोल : 15 प्रश्न
 • राज्यव्यवस्था व पंचायत राज : 8 ते 12 प्रश्न
 • अर्थशास्त्र : 15 प्रश्न
 • सामान्य विज्ञान : 15 प्रश्न
 • अंकगणित व बुद्धिमापन : 15 प्रश्न
 • चालू घडामोडी (प्रादेशिक, राष्ट्रीय, जागतिक) : 15 प्रश्न

✍ पूर्व नाव नोंदणीसाठी संपर्क :
 • संपर्क - नी3 अहिरराव, सागर खुळे
 • मो : 8551975985, 9881148377, 8830201805

✍ घरपोच पोस्टल सुविधेसाठी:
 • आपले संपूर्ण नाव -
 • संपूर्ण पत्ता (पिनकोड सह) -
 • Whtsapp no -

✍ पैसे येथे पाठवा :
 • नितीन अहिरराव (Nitin Dilip Ahirrao)
 • मो - 8551975985 (फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे करु शकता. पेमेंट झाल्यावर स्क्रीनशॉट दाखविणे)❇ 500 रुपये फीस जास्त नाही वाटतं का ?
उत्तर : अजिबात नाही, तुम्ही एकत्रितरित्या पुण्यातील टेस्ट सिरीज ची फीस वाचली असेल किंवा माहिती असेल तर कळून जाईल. शिवाय आम्ही टेस्ट पेपर आयोगाच्या दर्जाचे प्रिंटेड स्वरूपातील, व चांगल्या quality चे प्रश्न देतोय कोणताही प्रश्न रिपीट नाही, कुठून तरी उचलला नाही, सर्वच्या सर्व प्रश्न आम्ही स्वतः सेट करतोय. एका प्रश्नपत्रिकेत साधारणतः २५ ते ३० पेज असतील, उत्तरपत्रिका 1 पेज व स्पष्टीकरणे साठी २५ ते ३० पेज असे एकूण ५५ ते ६० पानांची एक पूर्ण प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व स्पष्टीकरणे असा संच असेल...
उर्वरित 6 प्रशपत्रिकांचे संचही असेच असतील. आणि त्यात तुम्हांला कोणताही पोस्टल चार्जेस अतिरिक्त न घेता घरपोच केवळ ५००/- रुपयेला उपलब्ध केले जातील. म्हणजेच ना नफा ना तोटा या तत्त्वावरच हे काम चालू केलंय.❇ तुमचा कोणता क्लास आहे सर? कोण काढतेय टेस्ट सिरीज ? प्रश्न कसे असतील (Quality ?)
उत्तर : नाही, आमचा कोणताही क्लास नाही व भविष्यात क्लास सुरु करायची तयारी नाही. आमची टेस्ट सिरीज मी स्वतः (नी3) व सागर खुळे सर मिळून काढतोय. आम्ही याआधी पुण्यातील अनेक नामांकित क्लासेसला टेस्ट सिरीज काढून दिल्यात पण याचा बहुतांशी फायदा आम्हांला व विद्यार्थ्यांना न होता संबंधित क्लास'ला व्हायचा. फी जास्त असल्यामुळे अनेक शहरी व ग्रामीण भागातील गरीब, हुशार, अभ्यासू व होतकरू मित्र-मैत्रिणी इच्छा असूनही टेस्ट सिरीज लावू शकत नव्हते. म्हणून हा उपक्रम सुरू केलाय. आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रश्नांची रचना असेल वनलायनर, बहुपर्यायी, बहुविधानात्मक, जोड्या लावा, योग्य विधान ओळखा, चुकीचा पर्याय ओळखा असे संमिश्र स्वरूपाच्या प्रश्नांचा समावेश.

❇ प्रश्नपत्रिका साधारणतः किती दिवसांत मिळतील ?
उत्तर : आम्ही सध्या यावर पूर्ण मेहनत घेतोय 7 मार्च ला आम्ही 100 टक्के आमच्याकडून पोस्टाने पाठवू त्या तुम्हांला 9 ते 11 मार्चपर्यँत घरच्या किंवा आपण दिलेल्या पत्त्यावर मिळतील. (नाव व पत्ता व्यवस्थित देणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी असेल काही prblm आला तर याला आपण स्वतः जबाबदार असाल).

❇ साधारणतः कसे पाठविणार प्रश्नपत्रिका घरपोच ?
उत्तर : मोठ्या शहरात शक्यतो प्रायव्हेट कुरियर ने व जिथं शक्य नसेल तिथे भारतीय टपाल पोस्ट ने कुरियर पाठवू.

❇ टेस्ट जॉईन करण्याची प्रोसेस काय असेल ?
उत्तर : आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता पिनकोडसह, संपर्क क्र. Whtsapp क्र इत्यादी सांगणे, त्यानंतर गुगल पे, अमेझॉन पे, फोन पे किंवा नेट बँकिंग'ने पैसे ट्रान्सफर करणे. पैसे आधी पाठविणे. त्यानंतर नाव नोंदणी केली जाईल. व आपल्याला ठरलेल्या तारखेनुसार प्रश्नसंच पाठविले जातील. बऱ्याच जणांचे msg येतात की सर आधी नाव नोंदवा आम्ही पैसे 7 तारखेला पाठवू. तर मित्रांनो आम्हांला प्रश्नपत्रिका प्रिंटिंग'ला द्यायचे आहेत जेवढी नाव येतील तेवढ्याचाच आम्ही विचार करू बऱ्याचदा मुलं नाव नोंदवतात व ऐनवेळी रद्द करतात मग ते अंगावर येत व ती रिस्क आम्हांला घ्यायची नाहीए.

यंदाचा हा पहिलाच प्रयोग. अचानक संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केलाय. त्यामुळे Quality देण्याचा आम्ही 100 % प्रयत्न करू.

❇ सर टेस्ट सिरीज लावण्याचा काय फायदा? याचा परीक्षेला नक्की फायदा होतो का? मला टेस्टला कमी मार्क मिळालेत तर नेगेटीव्हिटी तर नाही येणार? पुण्यातील बऱ्याच अकादमीच्या तर टेस्ट सिरीज आधीच झाल्यात?
उत्तर : हो, नक्कीच फायदा होतो. बऱ्याचदा काय होतय आपण खूप अभ्यास करतो, पण प्रश्नपत्रिकेचा सराव करत नाही आणि मग ऐनवेळी परीक्षेत गोंधळ होतोय. तुम्ही मित्रांच्या तोंडून खूप ऐकलं असेल वेळ पुरला नाही, एकाच उत्तरला डबल गोल झाले, आधी कोणता सेक्शन सोडावा हे नक्की सुचत नव्हतं. वेळ पुरला नाही, मी गणितच पाहिलेली नाही तेवढ्यात वेळ झाली वगैरे वगैरे. पण हे कधी होत सराव नसेल तेव्हाच? तुम्ही खूप हुशार आहात व अभ्यास केला आहे तुमची सर्व पुस्तके वाचून पूर्ण झालीत पण तुमचा प्रश्नपत्रिकेचा सराव नसेल तर हे सर्व शून्य असेल. सरावातूनच परिपूर्णता येते. तुम्ही कुठे चुका करता याची जाणीव तुम्हांला होते? तुम्ही कोणत्या विषयांत स्ट्रॉंग व वीक आहेत ते कळते मग आपल्याला पुढच्या अभ्यासाची दिशा ठरवता येते. आपण सात ही पेपर वेळ लावून इमानदारीपूर्वक सोडवले तर आपल्या मनातून परीक्षेची भीती कमी होते व ऐनवेळी परीक्षेच्या दिवशी आपला गोंधळ न होता आपण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातो. ज्या रेग्युलर सिली मिस्टिक होतात त्या होत नाहीत. PSI-STI-ASO ची पूर्व परीक्षा दिनांक 3 में ला आहे अजून दोन महिने आपल्या हातात आहेत. आपण मार्च महिन्यात सराव पेपर सोडवले तर आपल्यातील उणीवा व बेनेफीट कळतील. व आपण पुढील अभ्यासाचे उत्तम time mangement करू शकतो.

❇ बऱ्याच टेस्ट सिरीजचा असा दावा केला जातो? की आमच्या प्रश्नपत्रिकेतून आयोग प्रश्न विचारत किंवा अमुक अमुक प्रश्नपत्रिकेत आयोगाने . एवढे प्रश्न विचारले ? यात किती सत्यता आहे? व तुमचाही असाच दावा असेल का?
उत्तर : बिलकुल नाही, आमचा असा कुठलाही दावा नाही. टेस्ट हि फक्त सराव चाचणी असते आपला किती अभ्यास झालंय हे नेमकं यातून कळून येत. कोणी क्लासवाले टेस्ट सिरीज घेणारे आमच्या टेस्ट सिरीज मधून अमुक अमुक प्रश्न येतात असे दावे करत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण तो निव्वळ योगायोग असतो. त्यात फारशी सत्यता नसते. आमच्याही टेस्ट मधून काही प्रश्न आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत येऊ शकतात. पण तो एक निव्वळ योगायोग ठरेल.

❇ प्रश्नांसाठी काय संदर्भ वापरणार ? त्याची अधिकृत सत्यता किती ? कुठले संदर्भ पुस्तके वापरणार ?
उत्तर : स्टेट बोर्ड, NCERT, लोकराज्य, योजना, केंद्रीय अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र व भारत
 इतर परीक्षेच्या विषयनिहाय अभ्यासक्रमानुसार पुस्तके.

धन्यवाद....!
नी3 अहिरराव, पुणे

Post a Comment

0 Comments