जगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti

Jagannath Shankar Sheth Mahiti

मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे हे कुटूंब व्यावसायासाठी मुंबईत आले. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला. जनकल्यानाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गांमध्ये त्यांचा दबदबा होता. जगन्नाथ शंकरशेठ यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti

Jagannath Shankar Sheth Mahiti information in Marathi

शिक्षणाशिवाय लोंकांचा उदृधार होणार नाही हे ओळखून एफिन्स्टन यांच्या मदतीने ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन’ केली. या सोसायटीने मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाखा सुरू केल्या.

स्टुडंट लिटररी अ‍ॅण्ड सांयटिफिक सोसायटी च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपल्या राहत्या घरी शाळा सुरू केली.

त्यांनी पुढे एलफिन्स्टन कॉलेज सुरू केले. सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘बोर्ड आ‍ॅफ एज्युकेशन’ ची स्थापना केली. त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले.

मुंबई विद्यापिठाच्या स्थापनेतही नानांचा मोठा वाटा आहे. जनतेची दु:खे सरकारच्या निदर्शनास आणन्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. नानांली आपल्या अधिकाराचा आणि संपत्ती चा सढळ हाताने वापर केला.

नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. त्यामुळेच त्याना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. आचार्य अत्रे त्यांच्या विषयी म्हणतात कि, ‘नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते’. 31 जुलै 1865 रोजी त्यांचा मृत्यू झाला.