loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 9 October 2019

loading...
जेम्स पीबल्स, मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांचा सन्मान

जेम्स पीबल्स, मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांचा सन्मान
 • महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • विश्वाचा वेध घेणारे हे अतिशय क्रांतिकारी संशोधन असल्याचे नोबेल निवड समितीने या तिघांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे.
 • विश्वाच्या उत्क्रांत अवस्थांचा अभ्यास पीबल्स यांनी केला असून मेयर व क्वेलॉझ यांनी १९९५ मध्ये दूरवर सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध लावला होता त्यानंतर आतापर्यंत चार हजारहून अधिक बाह्य़ग्रहांचा शोध लावण्यात यश आले आहे.
 • रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली असून नऊ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर्सच्या रकमेतील निम्मा वाटा जेम्स पीबल्स यांना मिळणार असून इतर दोघांना उर्वरित रक्कम सारखी वाटून दिली जाणार आहे.
 • जेम्स पीबल्स हे न्यूजर्सी येथील प्रिन्स्टन विद्यपीठात प्राध्यापक असून त्यांनी विशची उत्क्रांती व पृथ्वीचे विश्वातील स्थान यावर संशोधन केले. महाविस्फोटानंतरच्या वैश्विक सूक्ष्म लहरी म्हणजे सीएमबीआरचे अस्तित्व त्यांनी पहिल्यांदा वर्तवले होते.

बालाकोट हवाई हल्ल्यातील स्क्वॉड्रन पदकांनी सन्मानित
 • बालाकोट हल्ल्यात सहभागी असलेले दोन स्क्वॉड्रन आणि भारतीय हवाई दलाच्या एका युनिटला मंगळवारी येथे पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
 • भारतीय हवाई दल दिनाच्या निमित्ताने हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी ५१ स्क्वॉड्रन आणि ६०१ एक युनिट व नऊ स्क्वॉड्रन यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यातील सहभागाबद्दल पदके प्रदान करून सन्मानित केले.
 • बालाकोट हल्ल्यातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि अन्य वैमानिकांनी या वेळी हवाई कसरतींमध्ये भाग घेतला. पाकिस्तानसमवेत झालेल्या लढाईच्या वेळी वर्धमान यांनी शत्रुपक्षाचे विमान पाडले होते.
 • हवाई दल दिनानिमित्त भदौरिया यांनी बालाकोट हल्ल्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व स्क्वॉड्रननी असामान्य धैर्य, निर्धार आणि व्यावसायिकता दाखवून भारताचा विजय निश्चित केला.

विष्णू नंदन: सर्वात मोठ्या आर्क्टिक मोहिमेमध्ये सहभागी झालेला भारतीय.
 • केरळचे 32 वर्षीय ध्रुवीय संशोधक विष्णू नंदन हे ‘मल्टीडिसीप्लिनरी ड्रिफ्टिंग अब्जर्वेटरी फॉर द स्टडी ऑफ आर्क्टिक क्लायमेट’ (MOSAiC) या अभ्यास मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलेले एकमेव भारतीय ठरले आहेत.
 • पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणात होणार्या बदलांविषयी अभ्यास करण्यासाठी यंदा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
 • ‘वैश्विक तापमानवाढ’चे केंद्र म्हणून आर्क्टिक प्रदेशाचे बारीक निरीक्षण करणे आणि जागतिक हवामान बदलांविषयी अधिक चांगले आकलन व्हावे त्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मूलभूत गोष्टींबाबत अंतर्दृष्टी प्राप्त करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
 • जगातल्या 300 शास्त्रज्ञांची चमू हा अभ्यास करणार आहे.हवामान बदलांचा होणारा परिणाम आणि जागतिक हवामानाविषयी करण्यात येणारा अंदाज सुधारण्यात यामुळे मदत होऊ शकणार.
 • जर्मनीचा ‘अल्फ्रेड वेगेनर इन्स्टिट्यूट’ नामक शास्त्रज्ञांच्या संघाच्या नेतृत्वात ही मोहीम संपूर्ण वर्षभर चालवली जाणार आहे. हिवाळ्यातल्या परिस्थितीमुळे पूर्वी कमी कालावधीतच अभ्यास केला गेला आहे.

28 वा सरस्वती पुरस्कार
 • उपाध्यक्ष, मी.  व्यंकय्या नायडू यांनी २०१ in मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सादर करताना तेलगू साहित्यिक डॉ.  के शिवा रेड्डी यांना त्यांच्या प्रसिद्ध कवितासंग्रह 'पक्काकी ओटगीलिटाईट' च्या निर्मितीसाठी 28 वे सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आला.
 • सरस्वती सन्मान हा भारतीय संविधानाच्या अनुसूची आठवीमध्ये सूचीबद्ध असलेल्या 22 कोणत्याही भाषांमधील उल्लेखनीय गद्य किंवा काव्यात्मक साहित्यिक कृतींसाठी वार्षिक पुरस्कार आहे.
 • हे भारतीय ज्ञानाच्या देवीच्या नावावर ठेवले गेले आहे आणि हे भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक मानले जाते.