loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 8 October 2019

loading...

नोबेल पुरस्कारांसाठी वैद्यकशास्त्रातील या तीन शास्त्रज्ञांची निवड
 • जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामधील वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
 • ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.
 • विल्यम जी.केलिन, सर पीटर जे. रेटक्लिफ, ग्रेग सेमेन्झा याना संयुक्तरित्या २०१९ नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
 • सोमवारी स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. अमिरेकेचे विलियम केलिन आणि ग्रेग सेमेन्जा आणि ब्रिटेनचे सर पीटर जे. रेटक्लिफ यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार दिला आहे.
 • भौतिकशास्त्रामधील आणि १४ ऑक्टोबर रोजी इतर सहा क्षेत्रामधील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

युगांडामध्ये ‘64वी राष्ट्रकुल संसदीय परिषद’ संपन्न
 • 64 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेची (CPC) वार्षिक बैठक 22 ते 29 सप्टेंबर 2019 या कालावधीत युगांडा देशाची राजधानी कंपाला येथे आयोजित करण्यात आली होती.
 • राष्ट्रकुल संसदीय संघटना (CPA) आणि युगांडा सरकार यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली होती.
 • ही परिषद राष्ट्रकुल या गटाच्या सदस्य देशांच्या खासदारांसाठी भरणार्‍या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे.
 • यावर्षी परिषद ‘अडोप्ट, एंगेजमेंट अँड इव्होल्युशन ऑफ पार्लिमेंट्स इन ए रॅपीडली चेंजिंग कॉमनवेल्थ’ या विषयाखाली पार पडली.
 • परिषदेत विविध देशांमधून आलेले जवळपास 500 हून अधिक खासदार, निर्णय घेणारे आणि इतर कर्मचारी एकत्रित आले होते.
 • राष्ट्रकुल संसदीय संघटना (Commonwealth Parliamentary Association -CPA) याची स्थापना 1911 साली ‘एम्पायर पार्लीमेंटरी असोसिएशन’ म्हणून करण्यात आली.

चेंजमेकर पुरस्कार :- पायल जांगिडे
 • पायल जांगिडे या 17 वर्षीय मुलीने वयाच्या 11 व्या वर्षी स्वतःच्या लग्नाविरूद्ध लढा दिला होता.
 • सध्या ती बालविवाहाला हतोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षणात ठेवण्यासाठी पालकांना उद्युक्त करण्यासाठी मोहीम राबवित आहे.पायल यांनी तिच्या गावातल्या मुलांच्या संसदेचे (बाल पंचायत) अध्यक्ष म्हणून काम केले.
 • तिने स्वत: च्या खेड्यातील आणि जवळपासच्या गावांमधील महिला& मुलांना सक्षम करण्यासाठी असंख्य फील्ड उपक्रम राबवले आहेत. मोर्चे आणि निषेधाचे आयोजन केले आणि तिच्या गावात व आसपासच्या खेड्यातल्या विविध महिला गट, युवा मंचांवर काम केले.

जागतिक बुद्धिबळ क्रमवारी : कोनेरू हम्पीची तिसऱ्या स्थानी झेप
 • भारताची महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने ‘फिडे’ या बुद्धिबळाच्या जागतिक संघटनेकडून जाहीर झालेल्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • आंध्र प्रदेशच्या ३२ वर्षीय हम्पीने तब्बल अडीच वर्षांनंतर दमदार पुनरागमन करत अलीकडेच रशिया येथे झालेल्या फिडे महिला ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. ग्रँडमास्टर किताब पटकावणाऱ्या हम्पीने या स्पर्धेतून १७ एलो रेटिंग गुणांची कमाई केली.
 • त्याचबरोबर २५७७ गुणांसह तिने तिसरे स्थान प्राप्त केले. आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी हम्पीने तब्बल दोन वर्षे विश्रांती घेतली होती. चीनची योऊ यिफान (२६५९ रेटिंग गुण) आणि जू वेनजून (२५८६) यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे.
 • खुल्या गटात, पाच वेळा जगज्जेता ठरलेला विश्वनाथन आनंद २७६५ गुणांसह नवव्या स्थानी आहे. नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसनने २८७६ गुणांसह अग्रस्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.

एफई बेस्ट बँक्स’ पुरस्काराने निपुणतेचा सन्मान
 • बँक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सोबती यांना एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’द्वारे   आयोजित सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांना ‘बँकर ऑफ द इयर’ने गौरविण्यात आले.
 • देशाच्या बँक, वित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजले जाणाऱ्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे वितरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते येथे झाले.
 • रमेश सोबती हे जीवनगौरव पुरस्काराचे तर बजाज समूहातील बजाज फिनसव्‍‌र्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे ‘बँकर ऑफ द इयर’चे मानकरी ठरले.
 • राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व विदेशी बँक गटात अनुक्रमे इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि एचएसबीसी बँक विजेत्या ठरल्या.
 • इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही लहान वित्त बँकांच्या गटातील तर बजाज फायनान्स व क्रेडिटएक्सेस ग्रामीण हे गैर बँकिंग वित्त कंपनी गटात अव्वल ठरले.