loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 6 October 2019

loading...
दिल्ली-कटरा एक्स्प्रेसमुळे काश्मीरच्या विकासाचा प्रवास सुरू
 • अनुच्छेद 370 हा जम्मू व काश्मीरच्या विकासातील अडथळा होता आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाचा प्रवास सुरू होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
 • तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत शहा यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवी झेंडी दाखवला.
 • अनुच्छेद 370 रद्द करणे आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात या दोन गोष्टींमुळे नवा भारत नव्या जम्मू-काश्मीपर्यंत येईल आणि या भागासाठी नवा इतिहास घडवला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.
 • तसेच येत्या दहा वर्षांमध्ये जम्मू व काश्मीर हा देशाच्या सर्वाधिक विकसित भागांपैकी एक राहील आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या सोबतीने विकासाचा प्रवासही सुरू झाला आहे.
 • या गाडीमुळे विकासाला, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असे शहा यांनी सांगितले.

MCC ​​एमसीसी अध्यक्षपदी संगकारा
 • ऐतिहासिक मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अध्यक्षपदाची सुत्रे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने स्वीकारली आहेत
 • या मानाच्या क्लबमध्ये अध्यक्ष होणारा संगकारा हा पहिला ब्रिटिशेतर खेळाडू ठरला आहे. गेल्या मे महिन्यातच मावळते अध्यक्ष अँथनी रेफर्ड यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत संगकाराच्या नावाची घोषणा केली होती.
 • ‘एमसीसीसारख्या अतिउच्च अन् मानाच्या क्लबचा अध्यक्ष होणे ही माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाची बाब आहे.
 • एमसीसीचे मावळते अध्यक्ष रेफर्ड म्हणाले, ‘सध्याच्या घडीला एमसीसीच्या अध्यक्षपदासाठी संगकारापेक्षा सरस व्यक्ती असूच शकत नाही.
 • क्रिकेट या खेळाची ताकद आणि या खेळाची प्रेक्षकांना बांधून ठेवणारी उत्कंठा संगकाराला ठाऊक आहे.
 • एमसीसीच्या मार्फत क्रिकेटच्या प्रसारासाठी जे कार्य सुरू असते, त्याचा ब्रँडअॅम्बेसिडर म्हणून संगाकारा योग्य व्यक्ती आहे’.
 • १३४ कसोटींमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४१ वर्षांच्या संगकाराचे एमसीसी क्लबशी असलेले नाते जुनेच आहे.

चेंजमेकर पुरस्कार :- पायल जांगिडे
 • पायल जांगिडे या 17 वर्षीय मुलीने वयाच्या 11 व्या वर्षी स्वतःच्या लग्नाविरूद्ध लढा दिला होता.
 • सध्या ती बालविवाहाला हतोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षणात ठेवण्यासाठी पालकांना उद्युक्त करण्यासाठी मोहीम राबवित आहे.
 • पायल यांनी तिच्या गावातल्या मुलांच्या संसदेचे (बाल पंचायत) अध्यक्ष म्हणून काम केले.
 • तिने स्वत: च्या खेड्यातील आणि जवळपासच्या गावांमधील महिला& मुलांना सक्षम करण्यासाठी असंख्य फील्ड उपक्रम राबवले आहेत. मोर्चे आणि निषेधाचे आयोजन केले आणि तिच्या गावात व आसपासच्या खेड्यातल्या विविध महिला गट, युवा मंचांवर काम केले.

बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन
 • जगातील सर्वात मोठा खाजगी पाया आहे. स्थापना 2000 [सिएटल, वॉशिंग्टन ]
 • ग्लोबल गोलकीपर पुरस्कार 2019 [ नरेंद्र मोदी] हा फाऊंडेशनचा खास पुरस्कार आहे.
 • तो अशा नेत्यास दिला जातो ज्याने त्यांच्या देशात आणि जागतिक स्तरावर प्रभावी कामांच्या माध्यमातून जागतिक उद्दीष्टांविषयीची वचनबद्धता दर्शविली आहे.

प्लास्टिक, थर्माकोलबंदीच्या सूचना केंद्राने केल्या प्रसिद्ध
 • केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी 2 आक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे.
 • एवढेच नव्हे, 51 मायक्रॉनवरील पिशव्यांवरही ही बंदी आहे. मात्र, प्लॅस्टिकच्या बाटल्यांना यातून वगळण्यात आले आहे.
 • या बंदीमुळे यापुढे कोणत्याही आकाराच्या व जाडीच्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, स्ट्रॉ, सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरता येणार नाहीत.
 • सरकारी व खासगी कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोलची फुले, बॅनर्स, झेंडे, कुंड्या, बाटल्या, फोल्डर्स वा प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वस्तू न वापरण्याच्या सूचना आहेत.

बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी
 • भारतीय स्टार महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक संघटना फिडेच्या नव्या क्रमवारीमध्ये तिसरे स्थान मिळवले. आंध्र प्रदेशच्या या ३२ वर्षीय खेळाडूने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले.
 • ग्रँडमास्टर हम्पीला यामुळे १७ इएलओ गुणांचा लाभ झाला. ती २५७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी दाखल झाली.
 • हम्पीने मुलगी अहानाच्या जन्मानंतर दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता.
 • जागतिक संघटना फिडेच्या नवी  क्रमवारी हाऊ यिफान  (चीन ), ज्यू वेनजिन   ( चीन ),कोनेरू हम्पीने ( भारत )
 • चीनची हाऊ यिफान २६५९ गुणांसह अव्वल स्थानी असून चीनचीच ज्यू वेनजिन (२५८६) दुसºया स्थानावर आहे.
 • खुल्या गटात दिग्गज विश्वनाथन आनंद २७६५ अंकांसह नवव्या स्थानी आहे.

CBDTचा नवा ‘कागदपत्र ओळख क्रमांक (DIN)
 • 'डिजिटल इंडिया'कडे वाटचाल करीत असताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 ऑक्टोबर 2019 पासून संगणकाद्वारे निर्माण होणारा. ‘कागदपत्र ओळख क्रमांक’ (Document Identification Number -DIN) देण्यास आरंभ केला आहे. या क्रमांकामुळे कर प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करता येणार आहे.
 • 1 ऑक्टोबर 2019 पासून लागू झालेली ‘कागदपत्र ओळख क्रमांक’ प्रणाली प्राप्तिकर विभागाकडून होणार्‍या सर्व प्रकाराच्या संपर्कांना लागू असेल.
 • मूल्यमापन, याचिका, चौकशी, दंड आणि सुधारणेशी संबंधित अश्या कोणत्याही कामासाठी तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजाला क्रमांक दिला जाणार.
 • या प्रणालीमुळे करदात्यांना बनावट सूचना आणि पत्र ओळखण्यास मदत होणार कारण विभागाच्या ई-फाइलिंग संकेतस्थळावर त्याची क्रमांकाद्वारे पडताळणी करता येणार.