चालू घडामोडी : Daily Current Affiars 5 October 2019


4 ते 10 ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन
 • जगभरात दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.
 • मविप्र समाज संस्था व नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) नाशिक इंडिया चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंतराळ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
 • 2019 संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स”
 • कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.
 • देशाच्या प्रगतीसाठी आतापर्यंत इस्रोने १६८ मोहिमा केल्या असून त्यापैकी ४५ यानांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. २०१७ साली एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून संपूर्ण जगाचे लक्ष भारताने वेधले आहे.

ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल
 • ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला.
 • कायद्यातील कठोर तरतुदी शिथिल करण्याचा आदेश न्यायालयाने मागे घेतला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार तक्रारीतील तथ्यांची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा,असा निकाल दोन न्यायाधीशांच्या खंठपीठाने दिला होता.
 • केंद्र सरकारने याविरोधात फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने आज हा निकाल दिला.
 • सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदींसंदर्भात निकाल दिला होता. 20 मार्च 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला होता.
 • ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी तक्रारीतील तथ्य शोधण्यासाठी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने आधी तपास करावा.
 • संबंधित तक्रार बनावट किंवा सहेतूक नाही, याची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा, असे न्यायालयाने निकालात म्हटले होते.
 • या निकालाविरोधात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय घटनाविरोधी असल्याचे नमूद केले होते.

प्लास्टिक, थर्माकोलबंदीच्या सूचना केंद्राने केल्या प्रसिद्ध
 • केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी 2 आक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे.
 • एवढेच नव्हे, 51 मायक्रॉनवरील पिशव्यांवरही ही बंदी आहे. मात्र, प्लॅस्टिकच्या बाटल्यांना यातून वगळण्यात आले आहे.
 • तसेच या संदर्भात सर्व राज्यांसाठी एक आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक अशा दोन अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक उपक्रम, कंपन्या, खासगी कंपन्या, सर्व सरकारी व खासगी कंपन्या, कार्यालये यांचा त्यात समावेश
 • आहे.
 • सर्व सरकारी व खासगी कार्यालयांना प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • या बंदीमुळे यापुढे कोणत्याही आकाराच्या व जाडीच्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, स्ट्रॉ, सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरता येणार नाहीत.
 • सरकारी व खासगी कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोलची फुले, बॅनर्स, झेंडे, कुंड्या, बाटल्या, फोल्डर्स वा प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वस्तू न वापरण्याच्या सूचना आहेत.

“परिचय”: आसामध्ये NRCमधून वगळलेल्या लोकांच्या कायदेशीर मदतीसाठी विधी विद्यापीठांचा उपक्रम
 • आसाममधल्या लोकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (NRC) याच्या अंतिम यादीमधून वगळलेल्या व्यक्तींना कायदेशीर मदत देण्याकरिता भारतातली पाच राष्ट्रीय विधी विद्यापीठे एकत्र आली आहेत.
 • “परिचय” या नावाने एक कायदेशीर मदत केंद्र (legal aid clinic) स्थापन करण्यात आले आहे. हे केंद्र देशभरातल्या विद्यार्थी-स्वयंसेवकांच्या पथकांसोबत काम करणार आहे.
 • या उपक्रमाच्यातर्गत, अंतिम यादीतून वगळलेल्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी आणि वकील आणि कायदेशीर सेवा पुरविणार्‍यांना प्रशिक्षण देण्यात मदत करण्यासाठी देशभरातून स्वयंसेवकांनी तेथल्या सामाजिक संस्थांसोबत कार्य करणार आहेत.

CBDTचा नवा ‘कागदपत्र ओळख क्रमांक (DIN)’
 • 'डिजिटल इंडिया'कडे वाटचाल करीत असताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 ऑक्टोबर 2019 पासून संगणकाद्वारे निर्माण होणारा ‘कागदपत्र ओळख क्रमांक’ (Document Identification Number -DIN) देण्यास आरंभ केला आहे. या क्रमांकामुळे कर प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करता येणार आहे.
 • 1 ऑक्टोबर 2019 पासून लागू झालेली ‘कागदपत्र ओळख क्रमांक’ प्रणाली प्राप्तिकर विभागाकडून होणार्‍या सर्व प्रकाराच्या संपर्कांना लागू असेल.
 • मूल्यमापन, याचिका, चौकशी, दंड आणि सुधारणेशी संबंधित अश्या कोणत्याही कामासाठी तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजाला क्रमांक दिला जाणार.
 • या प्रणालीमुळे करदात्यांना बनावट सूचना आणि पत्र ओळखण्यास मदत होणार कारण विभागाच्या ई-फाइलिंग संकेतस्थळावर त्याची क्रमांकाद्वारे पडताळणी करता येणार.

बीडचा अविनाश साबळे चमकला, स्टीपलचेस शर्यतीत मिळवलं ऑलिम्पिक तिकीट
 • मुळचा बीडचा आणि सध्या भारतीय लष्करात हवालदार पदावर काम करणाऱ्या, अविनाश साबळेने दोहा येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत सर्वोत्तम वेळ नोंदवत टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.
 • अविनाशने आपला राष्ट्रीय विक्रम मोडत ८:२१:३७ अशी वेळ नोंदवली. ३००० मी. शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची अविनाशची गेल्या वर्षभरातली ही चौथी वेळ ठरली आहे.
 • अंतिम फेरीत अविनाश तेराव्या स्थानावर राहिला.
 • २०१८ साली जून महिन्यात गुवाहटी येथे झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ८:४९:२५ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.
 • यानंतर फेडरेशन कप आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत अविनाशने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.