Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

पोलीस भरती स्पेशल - मराठी व्याकरण झाले सोपे व मजेशीर (भाग 3)

ads Code paste

या लेखात, मी तुम्हाला एकदम सोप्या पध्दतीने मराठी व्याकरण कसे अभ्यासतात ते सांगणार आहे. सुरवात करण्यापूर्वी तुम्हास आवर्जून सांगू इच्छितो की, सोप्या व सहज पद्धतीने मराठी व्याकरण शिकायचे असेल तर माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक नक्की वाचून पहा, जे की सर्व बुक सेंटर वर उपलब्ध आहे. ते नक्कीच तुम्हाला संजीवनी बनून यशस्वी बनवेल.

आज आपण अलंकार व त्यातील शब्दालंकार कसा सोप्या पद्धतीने केला जाऊ शकतो ते पाहणार आहोत. आपण प्रत्येक अलंकार हा त्याच्या अर्थनुसार एका व्यक्तीशी तुलना करून अभ्यासाला तर किती मजेशीर व सोपे होईल, ते पुढे वाचल्यानंतर समजून येईल.

अलंकार : कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार होय.

अलंकाराचे दोन प्रकार पडतात : शब्दालंकार व अर्थालंकार

शब्दालंकार : जेव्हा पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती होत असेल व त्यामुळे नादमाधुर्य निर्माण होत असेल, तेव्हा अशा शाब्दिक चमत्कृती साधण्यास शब्दालंकार असे म्हणतात.
( थोडक्यात - शब्दालंकारात शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती होते ).

शब्दालंकार याचे परत 3 प्रकार पडतात - यमक, श्लेष, अनुप्रास
❇ यमक : कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने परंतु उच्चारात समानता असेल व त्यामुळे नाद निर्माण होऊन कवितेच्या चरणाला सौंदर्य प्राप्त होत असेल तर यमक हा शब्दालंकार होतो.

★ यमक अलंकार याची तुलना आपण रामदास आठवले सर यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत त्यांच्या कविते सारखे चरणे विचारले की, डोळे झाकून आपण यमक अलंकार हा पर्याय निवडतोल.

यमक अलंकार ट्रिक्स : जसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक...!
जसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक...!!
तसेच समान उच्चाराचे शब्द आले की होतो यमक...!!
( रामदास आठवले सरांचे बोलणे हे नेहमी यमक अलंकारात असते )

❇ श्लेष : एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

★ श्लेष अलंकार याची तुलना आपण दादा कोंडके यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतील तर आपण डोळे झाकून श्लेष अलंकार हा पर्याय निवडतोल.

श्लेष अलंकार ट्रिक्स : दादा  कोंडके  यांचे  बोलणे  म्हणजे  श्लेष  अलंकार  असतो.
दादा कोंडके यांच्या बोलण्यातून जसे दोन अर्थ निघतात, तसेच श्लेष अलंकारात देखील एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो. (दादा कोंडकेंचे सिनेमा पहा म्हणजे श्लेष अलंकार केव्हाच विसणार नाहीत)   

❇ अनुप्रास : कवितेच्या चरणात किंवा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

★ अनुप्रास अलंकार याची तुलना आपण शाहरुख  खान यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असताना दिसली की, आपण डोळे झाकून अनुप्रास अलंकार हा पर्याय निवडतोल.

अनुप्रास अलंकार ट्रिक्स : शाहरुख  खान  बोलण्यास  प्रयास  करतो,  त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात (प्रयास = अनुप्रास) जसे अनुप्रास अलंकारात वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते व नाद निर्माण होतो, तसेच शाहरुख खान देखील एकच अक्षर परत परत बोलण्याचा प्रयास करत असतो. डर सिनेमातील शाहरुख खानचा डायलॉग :- क...क...क...क...किरण...!   

बाकी अलंकार अशाच मजेशीर स्वरूपात आपण पाहणार आहोत. अधिक माहिती साठी, तुम्ही माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक अभ्यासू शकता ज्यामध्ये सर्व घटक मजेशीर स्वरुपात समाविष्ट केलेले आहेत, पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आगामी पोलीस भरतीत आशा प्रकारे स्मार्ट पद्धतीने अभ्यास केलात तर, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालेल यात काहीच शंका नाही...!

क्लिक करून तुमच्या मित्रांना नवरात्रीच्या शुभेछा पाठवा..

✍ लेखक - राजेश मेशे सर
पुस्तक - शॉर्टकट मराठी व्याकरण

Post a Comment

1 Comments