loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 9 September 2019

loading...

​​खासदार सुप्रिया सुळे देशात पुन्हा 'उत्कृष्ट संसदपटू' म्हणून निवड
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा 'उत्कृष्ट संसदपटू' म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळे यांची निवड करण्यात आली आहे,
 • 2019 मध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सुळे यांनी बारामतीमधून विजय मिळवला होता.
 • संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुळे यांनी 34 चर्चासत्रांत भाग घेतला. चार खासगी विधेयके मांडली. 147 प्रश्‍न उपस्थित केले आहेत.
 • पहिल्या सत्रांमध्ये खा. सुळे यांची संसदेतील उपस्थिती 100 टक्के राहिली आहे.
 • गेल्या लोकसभेत सुळे यांनी 1181 प्रश्‍न विचारले होते, तर 22 खासगी विधेयके मांडली होती. 152 वेळा चर्चेत सहभाग नोंदवला होता. तसेच संसदेत 100 टक्के हजेरी लावली होती. गेल्या संसदेतमधील खासदारांची हजेरी 80 टक्के होती.

देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
 • महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
 • अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत नवव्या स्थानी: इप्सोस सर्वेक्षण
 • इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 • हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 28 जागतिक बाजारपेठांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे.
 • यादीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (86%) हे अग्रस्थानी असून जगातले सर्वात आनंदी देश ठरले आहेत.
 • त्यापाठोपाठ, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त राज्ये अमेरिका, सौदी अरब आणि  जर्मनी या देशांचा क्रम लागतो आहे. नवव्या क्रमांकावर भारत 77 टक्क्यांसह आहे.
 • वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षितता, मित्र आणि जीवनावर नियंत्रण असल्याची भावना ही भारतीयांची आनंदी राहण्याविषयीचे इतर प्रमुख कारक आहेत, असे नव्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

वॉशिंग्टनः न्यायाधीशपदी भारतीय वंशाची महिला
 • भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित शिरीन मॅथ्यू यांची अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या दक्षिण जिल्ह्याच्या अमेरिकन जिल्हा न्यायालयात न्यायाधीशपदासाठी नियुक्त केले आहे.
 • मॅथ्यू या पहिल्या आशियन पॅसिफिक अमेरिकन महिला ठरल्या आहेत.
 • तसेच, त्या अमेरिकेतील एका मोठ्या कायदा फर्म 'जोन्स डे'याच्याशी संलग्न आहे. यापूर्वी त्या कॅलिफोर्नियात एका सहायक संघीय वकील होत्या.
 • सॅन डिएगोमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या दक्षिणी जिल्हा संघीय न्यायालयात त्यांचे नामांकन बुधवारी व्हाइट हाऊसद्वारे घोषित करण्यात आले.
 • आता त्यांच्या नियुक्तीला सिनेटद्वारे अनुमोदन करण्यात आले आहे. अमेरिकेतील संघीय न्यायालयात ट्रम्प यांच्या द्वारे घोषित करण्यात आलेल्या नामांकनात मॅथ्यू या सहाव्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित नागरिक ठरल्या आहेत.
 • दक्षिण आशिया बार आसोसिएशन (साबा) चे अध्यक्ष अनिश यांनी याला ऐतिहासिक नामांकन म्हटले आहे.