loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 6 September 2019

loading...

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस.  यांनी आज पदभार स्वीकारला
 • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची  म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • राज्याचे मुख्य सचिव राहिलेले  हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. 
 • मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि  गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचे स्वागत केले.
 • आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल पूर्ण झाला.

राज्यातील 20 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर
 • राज्यभरातील तब्बल 20 हजार महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मागच्या पाच वर्षात राज्य शासनाने 19 मागण्यांपैकी एकाही मागणीचा विचार न केल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे.
 • अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहाय्यक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवणे या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून राज्यातील सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
 • ऐन निवडणुकांच्या तोंडावर या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

ब्रिटन संसदेत जॉन्सन पराभूत
 • जॉन्सन यांनी आपल्या विरोधातील २१ खासदारांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केलीकोणत्याही कराराशिवाय ब्रेग्झिट स्वीकारण्याचा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा प्रयत्न ३२९ विरुद्ध ३०० अशा बहुमताने पहिल्या फेरीत उधळला गेला आहे. त्यामुळे संसदेत जॉन्सन सपशेल पराभूत झाले आहेत.
 • जॉन्सन हे मध्यावधी निवडणुकीसाठीचा प्रस्ताव मांडतील, अशी शक्यता आहे. त्या ठरावास दोन तृतियांश बहुमत मिळाले, तरच तो संमत होईल. मात्र प्रमुख विरोधक असलेल्या मजूर पक्षाचा निवडणुकांना विरोध असल्याने तो ठरावही पराभूत होण्याचीच चिन्हे आहेत. त्यामुळे अवघ्या सहा आठवडय़ांचे जॉन्सन यांचे सरकार धोक्यात आले आहे.
 • स्वपक्षातील खासदारांच्या विरोधामुळे जॉन्सन यांनी मंगळवारी संसदेतील मताधिक्य गमावल्यानंतर ‘ब्रेग्झिट’वरून ब्रिटन संसदेतील राजकीय लढाई टोकाला गेली.  त्यानंतर जॉन्सन यांनी आपल्या विरोधातील २१ खासदारांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली.
 • आताच्या स्वरूपातील ब्रेग्झिटचा करार म्हणजे थेट शरणागती असून आपणास ती आपणास मान्य नाही, असे जॉन्सन यांनी सकाळीच संसदेत सांगितले होते.

स्वच्छ सेवा अभियान
 • ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या १०० दिवसात सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
 • यामध्ये तीन तलाक, अनुच्छेद ३७० रद्द करणे असे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असून, त्यानिमित्त स्वच्छ सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.

रशियन शस्त्रास्त्रांना भारतीय साथ; दोन्ही देशांत १५ करार
 • भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकीत रशियाच्या संरक्षण सामग्रीसाठी भारतीय बनावटीचे सुटे भाग वापरण्याचा निर्णय बुधवारी दोन्ही देशांनी घेतला; तसेच रशिया या उत्पादनांसाठीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित
 • व्लाडिव्होस्टॉकः भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकीत रशियाच्या संरक्षण सामग्रीसाठी भारतीय बनावटीचे सुटे भाग वापरण्याचा निर्णय बुधवारी दोन्ही देशांनी घेतला; तसेच रशिया या उत्पादनांसाठीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यातील चर्चेवेळी हा निर्णय घेण्यात आला. पौर्वात्य आर्थिक मंचाच्या (ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम) अधिवेशनासाठी पंतप्रधान येथे आले आहेत.

वॉशिंग्टनः न्यायाधीशपदी भारतीय वंशाची महिला
 • भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित शिरीन मॅथ्यू यांची अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या दक्षिण जिल्ह्याच्या अमेरिकन जिल्हा न्यायालयात न्यायाधीशपदासाठी नियुक्त केले आहे.
 • मॅथ्यू या पहिल्या आशियन पॅसिफिक अमेरिकन महिला ठरल्या आहेत.
 • तसेच, त्या अमेरिकेतील एका मोठ्या कायदा फर्म 'जोन्स डे'याच्याशी संलग्न आहे. यापूर्वी त्या कॅलिफोर्नियात एका सहायक संघीय वकील होत्या.
 • सॅन डिएगोमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या दक्षिणी जिल्हा संघीय न्यायालयात त्यांचे नामांकन बुधवारी व्हाइट हाऊसद्वारे घोषित करण्यात आले.
 • आता त्यांच्या नियुक्तीला सिनेटद्वारे अनुमोदन करण्यात आले आहे. अमेरिकेतील संघीय न्यायालयात ट्रम्प यांच्या द्वारे घोषित करण्यात आलेल्या नामांकनात मॅथ्यू या सहाव्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित नागरिक ठरल्या आहेत.
 • दक्षिण आशिया बार आसोसिएशन (साबा) चे अध्यक्ष अनिश यांनी याला ऐतिहासिक नामांकन म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments