loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 5 September 2019

loading...
भारतातला सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा आंध्रप्रदेश राज्यात
 • 1 सप्टेंबर 2019 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आंध्रप्रदेश राज्यात देशातल्या सर्वाधिक लांबी असलेल्या विद्युतीकृत रेल बोगद्याचे उद्घाटन केले.
 • आंध्रप्रदेश राज्याच्या चेरलोपल्ली आणि रापुरू या स्थानकांच्यादरम्यान तयार करण्यात आलेला हा 6.6 किलोमीटर लांबीचा बोगदा ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम रेलमार्गाचा एक भाग आहे. हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरुन 'घोड्याची नाल'च्या आकारात बनविला गेला आहे. बोगद्याची उंची 6.5 मीटर एवढी आहे.
 • ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम दरम्यानच्या 112 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकृत रेल्वेमार्गामुळे प्रवासाची वेळ 5 तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या, गाडीला कृष्णापट्टनम बंदर ते ओबुलावरीपल्ली पर्यंत जाण्यासाठी 10 तास लागतात.

काश्मीरच्या विभाजना साठी मंत्रिगट स्थापन
 • जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांचा सर्वांगिण विकास तसेच तेथील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांकडे जातीने लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी मंत्रिगटाची स्थापना केली. हे नवे केंद्रशासित प्रदेश ३१ ऑक्टोबर रोजी अस्तित्वात येणार आहेत.
 • कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा या मंत्रिगटात समावेश आहे
 • जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर व राज्याचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यानंतर तेथील नेमकी स्थिती काय असेल, यावर हा मंत्रिगट लक्ष केंद्रीत करणार आहे.

विक्रम लँडरचा चांद्रयान २ ला निरोप
 • चांद्रभूमीवर उतरवण्यात येणाऱ्या विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरला मुख्य 'चांद्रयान-२' पासून विलग करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला सोमवारी यश आले.
 • सोमवारी दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी विक्रम लँडर 'चांद्रयान-२' पासून विलग झाल्याचा संदेश इस्रोला प्राप्त झाला. चंद्राच्या भूमीवर विक्रम लँडरला उतरवण्यासाठी आता फक्त चारच दिवसांचा कालावधी राहिला असून, मंगळवारी लँडरची चंद्राभोवतीची कक्षा आणखी कमी करण्यात येणार आहे.

नव्या टॅक्स स्लॅबची शिफारस
 • डायरेक्ट टॅक्स कोडवर स्थापन केलेल्या टास्क फोर्सने आर्थिक मंत्रालयाला सोपवलेल्या अहवालात करप्रणालीत फेररचना करण्याची शिफारस केली आहे. ● केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पॅनलने सरकारला पाच लाखांपासून 20 लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांच्या कराच्या दरात कपात करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
 • सध्या असलेला 5 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के टॅक्स स्लॅब हा 5 टक्के, 10 टक्के आणि 20 टक्के करावा, असं अहवालात म्हटलं आहे.
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे सदस्य अखिलेश रंजन यांच्या नेतृत्त्वाखालील टार्स फोर्सने 19 ऑगस्ट रोजी आपला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोपवला होता.

मलिंगाचा सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम
 • कॉलिन डी ग्रँडहोमला (४४) बाद करीत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.
 • श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने रविवारी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदवला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मलिंगाने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला.
 • २०११मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा मलिंगा जुलै महिन्यात कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
 • न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने पहिल्याच षटकात कॉलिन मुन्रोचा त्रिफळा उडवून आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी साधली. मग कॉलिन डी ग्रँडहोमला (४४) बाद करीत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.

सुरक्षित शहर निर्देशांक 2019
 • निर्देशांक जारी करणारी संस्था - The Economist Intelligence Unit
 • 5 खंडातील एकूण 60 देशांच्या शहरांचा अभ्यास
 • जगातील सर्वात सुरक्षित शहर - टोकियो (निर्देशांकात प्रथम स्थानी)
 • द्वितीय स्थान - सिंगापूर
 • तृतीय स्थान - ओसाका
 • चौथ्या स्थानी - अँम्सटरडॅम
 • 5 व्या स्थानी - सिडनी
 • मुंबई 45 व्या स्थानी
 • दिल्ली - 53 व्या स्थानी

Post a Comment

0 Comments