loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 4 September 2019

loading...

मोदी सरकारने ऑगस्ट 2019 महिन्यात 98,202 कोटी रुपयांचे GST संकलन झाले
 • ऑगस्ट महिन्यातले वस्तू व सेवा कर (GST) संकलन 1 लक्ष कोटी रुपयांखाली घसरले असून, त्यामुळे मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • ऑगस्ट महिन्यातले GST संकलन 98,202 कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते 4.51 टक्के अधिक असले, तरी मासिक एक लक्ष कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमी भरले.
 • जुलै महिन्यात केंद्रीय GST महसुलाची रक्कम 17,733 कोटी रुपये, राज्य GSTची रक्कम 24,239 कोटी रुपये आणि एकात्मिक (इंटिग्रेटेड) GSTची रक्कम 48,958 कोटी रुपये (आयातीवर मिळालेल्या 24,818 कोटी रुपयांसह), उपकर संकलनाची रक्कम 7,273 कोटी रुपये (आयातीवर मिळालेल्या 841 कोटी रुपयांसह) इतकी होती.
 • जून-जुलै 2019 या काळात GST संकलनातली तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना 27,955 कोटी रुपये अदा केले गेले.

मनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे
 • लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.
 • विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.
 • तसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
 • तर लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते.
 • 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.

भारताचे उपराष्ट्रपती (1952 ते 2019)
 • डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952 ते 1962)
 • डाॅ. झाकीर हुसेन (1962 ते 1967)
 • वराहगिरी वेंकट गिरी (1967 ते 1969)
 • गोपाळ स्वरूप पाठक (1969 ते 1974)
 • बसप्पा धनप्पा जत्ती (1974 ते 1979)
 • न्या. महम्मद हिदायतुल्ला (1979 ते 1984)
 • रामास्वामी वेंकटरमण (1984 ते 1987)
 • शंकर दयाल शर्मा (1987 ते 1992)
 • कोचीरिल रमण नारायण (1992 ते 1997)
 • कृष्ण कांत (1997 ते 2002)
 • भैरवसिंह शेखावत (2002 ते 2007)
 • महम्मद हमिद अन्सारी (2007 ते 2017)
 • वेंकय्या नायडू (2017 ते आजपर्यंत)

चंद्रिमा शहा : भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा
 • प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
 • याआधी त्या  दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.
 • या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
 • ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.

मानव संसाधन विकास HRD ने 'शगुन' पोर्टल सुरू केले
 • मानव संसाधन विकास मंत्रालयाने शागून नावाचे एक पोर्टल बाजारात आणले आहे, ज्याद्वारे शाळा, शिक्षण, शाळांमधील अभ्यासाची पातळी आणि इतर कोणत्याही प्रकारची माहिती देशभरात कुठेही मिळविता येईल .
 • या पोर्टलच्या मदतीने शालेय शिक्षणाशी संबंधित कोणतीही माहिती मिळू शकते आणि त्यासंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविली जाऊ शकते.आता पालक या पोर्टलद्वारे शाळेत सुरू असलेली कोणतीही माहिती सामायिक करण्यास सक्षम असतील.
 • रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की जगातील सर्वात मोठी शाळा मोहीम 'शगुन' पासून सुरू होत आहे.
 • शगुन पोर्टलने सीबीएसईच्या 2 कोटी विद्यार्थ्यांसह देशभरातील 25 कोटी विद्यार्थ्यांना जोडले आहे.
 • त्याचबरोबर 2 लाख 30 हजार वेबसाइट्सचे एक व्यासपीठ शगुन पोर्टल असेल.

Post a Comment

0 Comments