loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 11 September 2019

loading...

​​पियुष गोयल थायलंडमध्ये आयोजित RECP च्या मंत्रिस्तरीय बैठकीत उपस्थित
 • दिनांक 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2019 या काळात थायलंड देशांची राजधानी बँकॉकमध्ये सातवी RCEP मंत्रिस्तरीय बैठक, सोळावी ASEAN-भारत आर्थिक मंत्री बैठक आणि सातवी पूर्व आशिया आर्थिक मंत्री शिखर परिषद 2019 हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
 • या कार्यक्रमांमध्ये भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग व रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित आहेत.

RCEP बद्दल
 • प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्या दरम्यानचा एक प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे.
 • नोव्हेंबर 2012 साली कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत RCEP वाटाघाटी औपचारिकपणे लागू झाली.
 • RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे.
 • या भागात 3.4 अब्ज लोकसंख्या असून एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP, PPP) 49.5 लक्ष कोटी डॉलर इतके आहे.

ASEAN बाबत
 • आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN) हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.  
 • याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी दिनांक 8 ऑगस्ट 1967 रोजी केली आणि याचे मुख्यालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.

न्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर
 • न्युझीलंडचे अर्थमंत्री ग्रांट रॅाबर्टसन यांनी ३० मे २०१९ रोजी गरीबी, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसा यासारख्या वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केला.
 • न्युझीलंड सरकाने हा अर्थसंकल्प देशातील असमानता, गरीबी या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सादर केला आहे.
 • या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकास दराला प्राधान्य न देता जनतेच्या कल्याणासाठी प्रधान्य देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे. आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते न्युझीलंडचा आर्थिक विकास दर २०१९ मध्ये २.५% वरून २०२० मध्ये २.९%पर्यंत वाढू शकेल असा अंदाज आहे
 • न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मानसिक आरोग्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी १.९ अब्ज न्युझीलंड डॉलर एवढा निधी राखून ठेवण्यात आला.
 • या अगोदर भूतान या देशाने जगात प्रथमच आनंद निर्देशांक (Happiness Index) ही संकल्पना मांडली होती. याआधारे देशातील किती लोक समाधानाने आयुष्य जगू शकता याचे मापन करण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात आला होता.

मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदारची हंगामी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
 • मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदारची दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी हंगामी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथम दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळतील.
 • दोन्ही संघात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेकरता अमोल दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देणार आहे. १९९४ साली मुंबईकडून रणजी क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदारने पदार्पण केले होते.
 • आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला प्रशिक्षण देण्यासोबतच अमोलने भारताचा १९ वर्षाखालील संघ, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या २३ वर्षाखालील संघालाही प्रशिक्षण दिलं आहे.
 • मध्यंतरी अमोलने नेदरलँडच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.
प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार
 • बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा प्रतिष्ठित 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार दिला गेला आहे. हा पुरस्कार सोहळा 3 सप्टेंबर 2019 रोजी इटलीमधील पापल बॅसिलिका ऑफ असिसी या ऐतिहासिक जागी झाला.
 • शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे. लोकांमध्ये शांतता आणि संवाद वाढविण्याकरिता एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.
 • 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार सर्वप्रथम 1981 साली पोलिश कामगार नेते लेच वालेसा यांना देण्यात आला होता. दलाई लामा, मिखाईल गोर्बाचेव्ह आणि अँजेला मर्केल हे इतर काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आहे.

​​​​अमेरिकन ओपन : नदालने पटकाविले 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद
 • स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याने कारकिर्दीतील एकोणिसावे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले.
  अमेरिका ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने डॅनील मेदवेदेव या रशियन आव्हानवीराला पाच सेटमध्ये हरवून बाजी मारली.
 • नदालने 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा विजय संपादन केला. हा सामना 4 तास 49 मिनिटे चालला.
 • दोन सेटच्या आघडीनंतर नदालने क्वचितच हार मानली आहे, तर मेदवेदेव याला पाच सेटमध्ये अद्याप या पातळीवर विजय मिळविता आलेला नाही. 
 • मेदवेदेवचा उत्तर अमेरिकन हार्डकोर्ट मोसमातील 23 सामन्यांतील हा तिसराच पराभव आहे. मोक्याच्या क्षणी मात्र नदालने त्याला आपला दर्जा दाखवून दिला.
 • नदालचे हे कारकिर्दीतील एकोणिसावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे.

Post a Comment

0 Comments